आत्ता चर्चा असली तरी या बाईने जवळपास नव्वद वर्षांपूर्वी मेन्स्ट्रुअल कपचा शोध लावलाय!

मासिक पाळी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आज देखील या विषयावर मोकळेपणाने बोलले जात नाही. त्याविषयी बोलताना मनात संकोच बाळगला जातो मासिक पाळी नंतरचे सुरुवातीचे काही दिवस स्त्रियांसाठी तारेवरची कसरत असते.  या काळात हार्मोन्समध्ये होणारे बदल हे शरीर आणि मनावर परिणाम करतात. देशाच्या अनेक भागात आजही या विषयाला अपवित्र विषय मानला जातो. वास्तविक ते एक नैसर्गिक चक्र आहे आणि त्याकडे एक नैसर्गिक गोष्ट म्हणून बघणे गरजेचे आहे.

आजही ग्रामीण भागात मासिक पाळी दरम्यान स्त्रिया आपल्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष करतात. मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणाऱ्या साधनांची त्यांच्याकडे उपलब्धता नसते. काळानुसार पारंपरिक साधने बाजूला पडून काही नवीन साधने बाजारात आली तरी आजही ग्रामीण भागातील स्त्रिया एकच कापड वारंवार वापरतात आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम करून घेतात.

आज बाजारात सनिटरी पॅड्स, मेंस्ट्रुअल कप, टेम्पॉन अशी विविध साधने आली असताना देखील देशाच्या अनेक भागात याबद्दल जागरूकता नाही. या साधनांनी स्त्रीचे त्या काही दिवसातील जगणे सुसह्य केले आहे. मेंस्ट्रुअल कप हे त्यापैकीच एक.

मेंस्ट्रुअल कप चा आज बोलबाला आपल्याला ऐकायला मिळतो परंतु आपल्याला ऐकून विश्वास बसणार नाही कि मेंस्ट्रुअल कप चा शोध हा ६० वर्षांपूर्वीच लागला आहे. तो एका स्त्रीने लावला होता आणि ती स्त्री म्हणजे अमेरिकन अभिनेत्री, लेखिका आणि संशोधक लिओना चाल्मर्स (Leona W. Chalmers). मेंस्ट्रुअल कप ची आयडिया त्यांच्या सुपीक डोक्यातून निर्माण झाली. त्यांनी आपल्या आयुष्यात इतरही काही शोध लावले परंतु मेंस्ट्रुअल कप च्या शोधामुळे त्यांना जास्त ओळखले जाते.

इतर साधनांपेक्षा कमी खर्चिक आणि पुन्हापुन्हा वापरण्याजोगा हा पर्याय होता.

मेंस्ट्रुअल कप च्या निर्मिती पूर्वी चाल्मर्स यांनी (catamenial sacks) ची निर्मिती केली होती परंतु ते गैरसोयीचे आणि त्रासदायक असल्यामुळे स्त्रियांच्या पसंतीस उतरले नाही. म्हणून त्यांनी रबरापासून कप निर्माण केले. १९३७ साली सर्वप्रथम त्यांनी याचे पेटंट करून घेतले. जागतिक महायुद्ध दरम्यान रबराच्या तुटवड्यामुळे त्यावेळेला याची निर्मिती शक्य झाली नाही. कोणताही नवीन शोध स्वीकारायला  लोक अनुत्सुक असतात. मेंस्ट्रुअल कपच्या शोधाबद्दल देखील असेच झाले. स्त्रियांनी सुरुवातीला याला स्विकारले नाही. १९५९ मध्ये या कप च्या निर्मितीचे अधिकार चाल्मर्स यांनी रॉबर्ट ओ प्रेक यांना विकले. प्रेक यांनी tasette inc. नावाची कंपनी स्थापन केली.

त्या काळात या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. महिलांना या उत्पादनाच्या वापराबद्दल मनात भीती होती. १९७३ ला ही कंपनी बंद पडली. २५ वर्षानंतर पुन्हा हे उत्पाद बाजारात आले  आणि याचा स्वीकार महिलांनी करण्यास सुरुवात झाली . असे म्हटले जाते की एक मेंस्ट्रुअल कप २८०० हुन जास्त सॅनिटरी पॅड कचऱ्यात जाऊन पर्यावरणाला हानी पोहचवण्यापासून वाचवते.

काय आहे मेंस्ट्रुअल कप?

मासिक पाळी दरम्यानच्या दिवसांमध्ये होणारा रक्तस्राव हा स्त्रियांसाठी डोकेदुखी असतो. मेंस्ट्रुअल कप द्वारे हा रक्तस्राव तेथेच थांबवला जातो.  हा कप भरल्यावर त्याला रिकामं करता येते. त्यासाठी या कपला एका विशिष्ट पद्धतीने योनिमार्गात ठेवायचे असते. कपच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे लवचिक असते. त्यामुळे ते सहज वापरता येते.

थोडक्यात हा मेन्स्ट्रुअल कप परवडणारे असतात. टॅम्पन्सपेक्षा सुरक्षित आहे. पॅड किंवा टॅम्पन्सपेक्षा जास्त रक्त शोषून घेऊ शकतो. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने हे कप वापरणे चांगले आहे. 

 

कोणत्याही नवीन वस्तूच्या वापराबाबत असणारा टॅबू, योग्य माहिती नसणे, मार्गदर्शन न मिळणे, यामुळे आजही अनेकजणी मेन्स्ट्रुअल कप वापरायला घाबरतात. मात्र, वारंवार सॅनिटरी पॅड बदलावे लागणे, पॅडच्या कडांमुळे अ‍ॅलर्जी किंवा रॅश उठणे, घराबाहेर वावरताना अडचणी येणे अशा अनेक त्रासांमुळे कायमची सुटका होऊ शकते, अशा भावना मेन्स्ट्रुअल कप वापरत असलेल्या अनेक महिलांनी व्यक्त केल्या…

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.