निशाणा चुकला नसता तर मुशर्रफ आणि नवाज शरीफ कारगिल युद्धावेळीच इतिहासजमा झाले असते.

साल होतं १९९९. पाकिस्तानी अतिरेक्यांनी बॉर्डर ओलांडून भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. यावरूनच काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात भारत-पाकिस्तान मध्ये सशस्त्र संघर्ष होऊन युद्ध छेडले गेले होते. हे युद्ध १९९९ मध्ये मे ते जुलै दोन महिने चालले होते. या युद्धात भारताने चालवलेल्या ऑपरेशनला विजय नाव देण्यात आले होते.

पण तुम्हाला माहित आहे का, भारत पाकिस्तान मध्ये कारगिल युद्ध सुरु असतांना एक वेळ अशी आली होती की भारताच्या साहसीवीरांनी पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ यांना टिपले असते. 

२४ जून १९९९ रोजी सकाळी ८:४५ ला कारगिल मध्ये युद्धाने उग्र रूप धारण केले होते. गोळ्या आणि बॉम्बच्या आवाजाने भाग दणाणून सोडला होता. अशात भारतीय वायुसेनेच्या एका जग्वार फायटर प्लेनने LoC वरून उडाण भरले. या जग्वारचे एकच काम होते, पाकिस्तान मधील ठिकाणांवर लेजर गाईडेड सिस्टीम द्वारे बॉम्ब हल्ला करण्यासाठी टार्गेटवर निशाणा साधायचा. त्यानंतर मागून येणारे दुसरे जग्वार त्या टार्गेटवर हल्ला करायचे.

पण झाले असे की, जग्वारचा निशाणा चुकला आणि टार्गेट असलेल्या ठिकाणच्या अलीकडेच बॉम्ब पडला. ज्या ठिकाणाला टार्गेट बनवले होते त्या गुलटेरी या कॅम्पवर पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि सेना प्रमुख जनरल मुशर्रफ उपस्थित होते.

जर त्यादिवशी जग्वारचा निशाणा चुकला नसता तर आज नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ एक इतिहास झाले असते. मात्र नशीब बलवत्तर म्हणून निशाणा चुकून ते वाचले.

या हल्ल्याने पाकिस्तानची चांगलीच हातभर फाटली होती म्हणून त्यांनी ही घटना सार्वजनिक करणे टाळले होते. पण काही गोष्टी जास्त काळ लपून राहत नाही, एक न एक दिवस ती उघड होतेच. भारत सरकारच्या दस्तएवजानुसार २४ जून रोजी जग्वारने पॉइंट ४३८८ वर निशाणा साधला होता. पण निशाणा चुकल्याने बॉम्ब चुकीच्या ठिकाणी पडला होता. पण नंतर असे समोर आले की, त्याठिकाणी नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ उपस्थित होते.

त्या दस्तएेवजात असेही सांगितले आहे की, तेव्हा भारतीय सैनिकांना माहित नव्हते की त्यांनी निशाणा साधलेल्या ठिकाणी नवाज शरीफ आणि परवेज मुशर्रफ उपस्थित होते.

कारगिल युद्धात पाकिस्तान सेनेला रसद पुरवणारे गुलेटरी हे मुख्य ठिकाण होते. हे ठिकाण LoC पासून ९ किलोमीटर आत येत. भारतीय वैमानिकांनी तिथे घुसून हल्ला करण्याची परवानगी मागितली होती. तेव्हा भारतीय वायुसेनेचे ऑफिसर कमांडिंग इन चीफ राहिलेले विनोद पटनी त्यांना रोखले. कारण भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सीमेच्या आत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे गुलेटरी वर हल्ला करणे हे विरोधात होते.

पण समजा चुकून जरी त्या टार्गेटवर बॉम्ब पडला असता तर कारगिल युद्धाच्या इतिहासात एक पान आणखी वाढलं असत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.