ज्या अॅपमधून तुम्ही म्हातारपणाचे फोटो करताय ते खाजगी माहिती चोरतायत.

सध्या सगळ्यांना अनलिमिटेड मोबाईल डेटा मिळत असल्याने तो संपवण्यासाठी काय करू अन काय नाय अस होतं प्रत्येकाच. अशात मग काय करावं ते सुचत नसलं की, सोशल मीडियावर स्क्रोल करत बसतात. यात व्हाट्सऍप, इंस्टाग्राम कितीही वापरत असले तरी फेसबुक हे जुनं अन अधिक लोकप्रिय आहे. अनेक अॅप्स टाईमपासच्या नावाखाली फेसबुकला कनेक्टेड असतात. जसे की, तुमच्या नावाचा अर्थ काय होतो, तुमच्या स्वभावावरून तुम्ही कोणते प्राणी दिसता, तुमच्यात कोणत्या व्यक्तीचे गुण असे ढिगाने ऍप्स फेसबुकवर आहेत.

हे अॅप टाईमपास म्हणून एकदा वापरतात आणि परत कधी ढुंकूनही त्याकडे कुणी बघत नाही. पण लोकं हे विसरतात की, तुम्ही ऍप्सला तुमचा डेटा वापरण्याची परमिशन फेसबुकच्या माध्यमातून दिलेली असते. म्हणजे त्या ऍप्स त्यांना वाटेल तेव्हा, हवा तसा तुमचा डेटा वापरू शकतात आणि तुम्हाला त्याची काहीच भनक लागत नाही.

याशिवाय फेसबुकवर कायमच नवनवीन ट्रेंड येत असतात, आणि मग सगळेच त्या ट्रेंडला धरून काही न काही पोस्ट्स करतात. तर सध्या असाच एक #FaceApp चा ट्रेंड चालला आहे. यात faceapp नावाचे एक अँप्लिकेशन आहे. ज्यात तुम्ही स्वतःचा फोटो अपलोड करून स्वतःला म्हातारे किंवा जवान बनवू शकता. इतर ऍप्स सारखेच हे सुद्धा तुम्हाला फेसबुक मार्फत लॉगिन करण्यास सांगते. लॉगिन केल्यानंतर फेसबुकवर तुमचे जितके फोटो असतील तितके सगळे faceapp मध्ये दिसतात. म्हणजे एकप्रकारे इथे ऍप ने तुमच्या सगळ्या डेटाचा एॅक्सेस मिळवलेला असतो.

सध्या #FaceApp चा ट्रेंड जोरात आहे. जो-तो आपला फोटो faceapp चे ओल्ड एज फिल्टर वापरून आपण म्हातारपणी कसे दिसू ते बघत आहेत आणि मोठ्या मजेत ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. तर एकीकडे हा ट्रेंड चालला असतांना अमेरिकेत यावर केस दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेतील सिनेटचे सदस्य चक श्यूमर यांनी ही केस दाखल केली आहे.

श्यूमर यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट केले असून त्यात ते म्हणाले आहेत,

“या अॅपने अमेरिकेतील नागरिकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात असून तो परकीय शक्तीच्या हाती लागून ते त्याचा वापर अमेरिका विरोधात करू शकतात.”

अलीकडेच रशियातील एका कंपनीने तयार केलेल्या ऍप मार्फत घुसलेल्या व्हायरसने धुमाकूळ घातला होता. याने राष्ट्राचा गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे आता श्यूमर यांनी faceapp ची तपासणी fbi मार्फत व्हावी अशी मागणीही आपल्या पत्रात केली आहे.

“मी एकत्रित केलेल्या डेटाच्या अँप ने वापरलेला युजर डेटा संरक्षित आहे का, आणि याबद्दल युजर्सना किती माहिती आहे, याची मला चिंता वाटते.”

अमेरिकेत २०२० मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांनी आणि प्रचारकांनी हे अँप वापरू नये असं इशारा डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीने दिला आहे. सुरक्षा अधिकारी बॉब लॉर्ड यांनी वृत्तपत्रांशी बोलतांना सांगितले की,

या अॅपने राष्ट्रीय गोपनीयतेला कुठला धोका असल्याचे अजून स्पष्ट झाले नसले तरी, गोपनीयतेबाबत रिस्क न घेता त्याचा वापर टाळणेच योग्य असेल.

दुसरीकडे FaceApp ने होत असलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय या अॅपचे जगभरात 8 करोड ऍक्टिव्ह युजर असल्याचा दावाही केला आहे. यावर सेंट पिटर्सबर्ग मधील वायरलेस लॅब या कंपनीने म्हटले आहे की,

हे अॅप तुमचे फोटोज किंवा इतर कुठलाच डेटा कायमस्वरूपी सेव्ह करत नाही. केवळ युजरने सिलेक्ट केलेले मोजकेच फोटो त्यावर अपलोड होत असतात.

याआधी २०१७ मध्येही या कंपनीने बनवलेल्या faceswapp वर असेच आरोप झाले होते. त्यावेळी या अँप मध्ये चेहऱ्याचा वर्ण बदलण्याचे फिल्टर होते. युजर्सनी त्यातून वर्णभेद होत असल्याची तक्रार केल्यानंतर कंपनी ते अॅप मागे घेतले होते.

याच वादग्रस्त कंपनीने डेटा चोरी केल्यामुळे हे अॅप चर्चेत आले. आज प्लेस्टोरवरच सगळ्यात जास्त डाऊनलोड होणारं हे अॅप आहे. Data is new oil असं म्हटल जाणाऱ्या दिवसात जगभरातल्या १०० कोटी लोकांची अगदी वैयक्तिक माहिती फेसअॅपने आपल्या डोळ्यादेखत चोरीला गेली आहे. आपण स्वतःचं अॅप डाऊनलोड करताना त्यांना हे खुल लायसन देऊन बसलोय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.