वाचणाऱ्या पिढ्या म्हाताऱ्या झाल्या पण ‘प्लेबॉय’ मॅगझीन अजून चिरतरुण आहे..

पिढ्यान् पिढ्या होस्टेलच्या गादीखाली लपवून ठेवून, बाजूला कोणी नसताना एकटक त्या मॅगझिनच्या पानावर असलेल्या त्या सुंदरांना न्याहाळत मोठी झालेली पिढी आज निदान निदान साठीला तरी टेकलीच असेल. पण मॅगझीन मात्र चिरतरुण आहे बरं..

अर्थातच ‘प्लेबॉय’

जगातलं सर्वाधिक विक्री होणारं, स्त्री पुरुष या दोघांनाही आवडणार असं हे मॅगझीन. एक काळ  असा होता जेव्हा या मॅगझीनने एका महिन्यात ७ दशलक्ष प्रती विकल्या होत्या.

नक्की काय असतं त्यात आणि कोणी काढलंय हे मॅगझीन, जरा बघूयाच ..

प्लेबॉय ची सुरुवात करणारे हेफनर यांचा जन्म शिकागोत ९ एप्रिल १९२६ चा. त्यांनी सुरुवातीला अमेरिकन सैन्यात लेखक म्हणून काम केले, त्यानंतर मानसशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं. प्ले बॉयसाठी १९५३ मध्ये, हेफनरने त्याच्या आईकडून त्याने एक हजार डॉलर्स उसने घेतले होते. कसे बसे ८००० डॉलर्सच कर्ज जमवून त्याने ‘प्लेबॉय’ चा पहिला अंक प्रकाशित केला.

पहिल्याच पानावर त्यानं लिहिलं होत की,

हे मॅगझीन १८ ते ८० वर्षाच्या पुरुषांसाठी आहे.

त्याला त्याच मॅगझीन विकलं जाईल की नाही याच टेन्शन होत म्हणून त्याने प्ले बॉयच्या पहिल्या अंकात प्रकाशनाची तारीखच टाकली नव्हती.

मात्र, मासिकाच्या पहिल्या अंकात त्याने तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मनरोचा न्यूड फोटो छापला होता.

हेफनरने हा फोटो २०० डॉलर्सला विकत घेतला होता. त्यानंतर प्लेबॉयची लोकप्रियता इतकी वाढली की स्त्रिया त्यांचे न्यूड फोटो कव्हर पेजवर यावे यासाठी हेफनरच्या दाराचे उंबरे झिजवायच्या. 

डर्टी मॅगझीन

हे मॅगझीन नेहमीच पुरुषांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिल .त्यामुळं त्याची विक्री चांगली झाली. यात मार्टिन ल्यूथर किंग आणि जिमी कार्टर यांच्यासुद्धा मुलाखती छापल्या. पण याच डर्टी लेबल कधीच गेलं नाही. या मॅगझीनला घरात कधीही जागा मिळाली नाही, त्याची जागा नेहमीच गादीखाली राहिली.

त्यावेळी अमेरिकेत असं म्हंटल जायचं की, जर मॅगझिनच्या फ्रंट पेजवर  एखाद्या अभिनेत्रीचा फोटो छापून आला तर तिला रातोरात प्रसिद्धी मिळायची. त्यामुळं बर्‍याच अभिनेत्रींनी त्यांची बुडणारी नाव किनाऱ्याला लावण्यासाठी प्लेबॉयची मदत घेतली.

याच्या कव्हर पेजवर त्यावेळचे अनेक अमेरिकन सेलिब्रिटी झळकले. त्यात जेन मॅन्सफिल्ड, पामेला अँडरसन, बो डेरेक, किम बासिंगर, फराह फॉवकट आणि मॅडोना यांचा समावेश आहे.

 

प्लेबॉयनं जगभरात लोकप्रियतेच्या सीमा ओलांडल्या होत्या. आणि विशेष म्हणजे भारतात या मॅगझीनला बंदी असताना सुद्धा ते भारतात खूप फेमस होत. भारतातली लोकप्रियता लक्षात घेऊन, प्लेबॉयने आपल्या मॅगझीन मध्ये भारतीय महिलांना स्थान देण्याचा विचार केला.

यात बाजी मारली शर्लिन चोप्रानं. शर्लिन ही पहिली भारतीय महिला होती जी प्लेबॉयच्या फ्रंट पेजवर झळकली होती. सन २०१२ मध्ये स्वत: शर्लिनने याबाबत माहिती दिली होती. तिने या मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केलं होत.

हेफनरने शिकागो मध्ये पहिला प्लेबॉय क्लब सुरु केला. तिथ ‘प्लेबॉय’चा लोगो म्हणजे ‘बनी’ हेअरबेल्ट घातलेल्या वेट्रेस होत्या. त्यानंतर हेफनरने यूकेमध्ये तीन प्लेबॉय कॅसिनो सुरू केले. गोव्यात पण हे क्लब सुरु करण्याची परमिशन त्याने मागितली होती. पण गोव्याच्या सरकारने ती नाकारली.

पुढं मॅगझिनची विक्री जसजशी वाढत गेली तसतसे धार्मिक गट आणि फेमिनिस्ट गटांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच तिखट झाला. तरुण पिढीची दिशाभूल, महिलांचे शोषण केल्याचा आरोपही मॅगझिनवर लावण्यात आला.

वयाच्या ८७ व्या वर्षी हेफनर म्हंटले होते की,

“मी एक हजाराहून अधिक महिलांशी लैंगिक संबंध ठेवले आहेत परंतु माझ्या तीन पत्नींसोबत विश्वासघात केला नाही.”

आज इंटरनेटवर पॉर्न सहज उपलब्ध असल्याने असं वाटलं की प्लेबॉयचे दिवस आता भरले. पण मॅगझीन आता बर्‍याच अवतारांमध्ये दिसतंय. डिजिटल, टेलिव्हिजन, फॅशनमध्ये सगळीकडं. प्लेबॉयचे कपडे आणि परफ्यूम भारतासह अनेक देशांमध्ये अंदाधुंदपणे विकले जातात.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.