अणुचाचणीची सगळी तयारी झालेली पण देवेगौडा यांनी ऐन टायमाला परवानगी नाकारली

भारताने आज अंतराळ क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी लहान- मोठ्या अणुचाचण्यापासून पार मंगळावर जाण्यापर्यंत आज अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आपल्या या यशस्वी कामगिरींमुळे भारताची आज जगभरात दखल घेतली जाते.

यात सगळ्यात जास्त श्रेय जातं ते अर्थातचं शास्त्रज्ञांना, पण त्या त्या काळच्या सरकारांनी दिलेला पाठिंबा सुद्धा नमूद करणं गरजेचा आहे. पण फार कमी लोकांना माहित असेल कि, एच.डी. देवेगौडा सरकारनं अणुचाचणीच्या परवानगीला नकार दिला होता. ज्याचा खुलासा आजपर्यत झाला नव्हता.

मात्र आता माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या जीवनावर प्रकाशित होणाऱ्या ‘Furrows in a Field’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केलाय. ज्यात देवेगौडा यांनी अणुचाचणीच्या परवानगीला नकार दिल्याचं स्पष्ट केलं, पण सोबतच त्यांनी त्यामागची करणे सुद्धा सांगितली.

तर ही घटना आहे १९९७ सालची. जेव्हा देवेगौडा पंतप्रधान होते. या दरम्यान भारतीय शास्त्रज्ञांनी अणुचाचण्या करण्यासाठी एक रविवारची तारीख निश्चित केली होती. याची तयारी कित्येक दिवस आधीपासून सुरु होती.

फेब्रुवारी १९९७ मध्ये अणुऊर्जा आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष राजगोपाल चिदंबरम आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देवेगौडा यांची त्यांच्या कार्यालयात अणुचाचण्यांच्या मंजुरीसाठी भेट घेतली. तेव्हा देवेगौडा त्यांना म्हणाले,

 ‘मी तुम्हाला परवानगी देईल आणि आणखी पैसे सुद्धा देईन, पण कृपया एक वर्ष थांबा’.

पंतप्रधानाच्या म्हणण्यानुसार हा निर्णय घेण्यामागे तीन कारणे होती. पाहिलं म्हणजे सर्वसमावेशक अणू चाचणी बंदी करार (CTBT) वर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिकेचा दबाव,  दुसरा पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा हेतू आणि तिसरं कारण होत त्यावेळची आर्थिक परिस्थिती.

तत्कालीन पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना स्पष्टपणे सांगितले की,

‘सीटीबीटीबाबत माझ्यावर खूप दबाव आहे. पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी संबंध सुधारण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. चाचणीमुळे आमचे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील. त्याचबरोबर आर्थिक स्तरावर स्थैर्य आणण्यासाठी आपल्याला आणखी काही वेळ हवा आहे. मला निर्बंधांची भीती वाटत नाही पण मला वेळ हवा आहे.

देवेगौडा यांच्या या निर्णयावर शास्त्रज्ञ नाराज होते. त्यांच्या टीमने पंतप्रधानांना सांगितले कि, या अणुचाचणीने संपूर्ण जगाला कळेल कि, भारत एक शक्तिशाली देश आहे. पण पंतप्रधानांना या गोष्टीचा अंदाज होता. त्यांना माहित होते कि, आपले शास्त्रज्ञ दुसऱ्याच दिवशी चाचणी करू शकतील आणि देवेगौडा सांगतात कि, ‘मी चाचण्यांच्या विरोधात नव्हतो. पण मला माझ्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि त्यासाठी मला त्यांच्याकडून किमान एक वर्षाचा वेळ हवा होता.

सीटीबीटी करारात जगभरातील देशांमधील करार, ज्याद्वारे विविध राष्ट्रांना अणुचाचण्या करण्यापासून रोखता येईल. ज्यावर सही करण्यासाठी भारतावर अमेरिकेकडून दबाव येत होता.

देवेगौडा यांच्या म्हणण्यानुसार, वाजपेयींना माहित होते की ते राजकीय अनिश्चिततेने वेढले गेले होते कारण जयललिता यांचा AIADMK एक अविश्वसनीय सहयोगी सहकारी होता. देवेगौडा यांनी श्रीनिवासराजू यांना सांगितले की, “वाजपेयींनी चाचण्यांना राष्ट्रवादीच्या घोषणेमध्ये बदलून टाकलं, जे दुर्दैवी होते. जेव्हा पाकिस्तानने अणुचाचणी केली तेव्हा पाच कोटी पाकिस्तानी आणि ९० कोटी भारतीय समान पातळीवर होते. भारताने आपली सामरिक ताकद गमावली आहे.

देवेगौडा यांनी आपल्या चरित्रात सांगितलं कि, अणुचाचणी पुढे ढकलण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यावेळी सरकारची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. अणुचाचणी साठी ताबडतोब पैशाची व्यवस्था करणं जरा कठीण होत म्हणून मी अणुचाचणीची तारीख पुढं ढकलण्याचं ठरवलं. 

अखेर अणुचाचणी पुढे ढकलीचं. ज्यांनंतर वायपेयींचं सरकार आलं आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर सुमारे सात आठवड्यांनी २ मे १९९८ साली पोखरण अणुचाचण्या  झाल्या.

हे ही वाचं भिडू :

English Summary: The nuclear tests Pokhran-II were finally conducted in May 1998 after Atal Bihari Vajpayee became Prime Minister. To this Gowda said that Atal Bihar Vajpayee knew the political uncertainty between him and J Jayalalithaa. He converted the tests into a nationalist slogan which was unfortunate.

WebTitle: Nuclear test:preparations for the nuclear test was ready but Deve Gowda refused

Leave A Reply

Your email address will not be published.