बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावरून दवाखान्यात नेणाऱ्या ताईंनी यापूर्वी अनेकांचे जीव वाचवलेत..

कोणतेही पोलीस ऑफिसर पहिले कि, त्यांच्या पर्सनॅलिटीवर, त्यांच्या युनिफॉर्म वर नजर खिळून राहते. त्यांच्याकडे पाहून एक आदराची भावना आणि तितकाच अभिमान वाटून जातो. अश्याच एका अभिमान वाटेल एक महिला इन्स्पेक्टर सोशल मिडीयावर फेमस झाल्यात…बरं त्या एका रात्रीतून फेमस नाही झाल्यात तर याआधी देखील त्यांचं कौतुक सोशल मिडियावर होतच असते. 

त्यांचं म्हणजे, तामिळनाडूच्या महिला इन्स्पेक्टर इ. राजेश्वरी !!!!

त्यांचं कौतुक म्हणजे त्यांच्या कामाची स्टाईल,  महिला इन्स्पेक्टर राजेश्वरी या बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला रस्त्यावरून उचलून खांद्यावर हॉस्पिटलमध्ये भरती केले, आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवला.  

यावर प्रतिक्रिया देताना चेन्नईचे पोलिस आयुक्त शंकर जिवल म्हणाले, ‘इन्स्पेक्टर राजेश्वरी नेहमीच अश्याच स्टाईलमध्ये काम करत असतात”.

ते म्हणतात ना सोशल मिडियावर आजकालचे ऑफिसर वर्दीचे प्रदर्शन करून सिलेब्रेटी बनत आहेत. पण असेही काही ऑफिसर सिलेब्रेटी असतात पण ते अगदी मन जिंकून घेणारी असतात. ना त्यांना प्रसिद्धीची भूक असते ना सोशल मिडिया स्टार बनण्याची धडपड असते….अशाच प्रामाणिक लोकांचे कौतुक जनता आणि प्रशासन करत असते..

इन्स्पेक्टर राजेश्वरी यांच्या कामाची पोचपावती देखील त्यांना मिळाली आहे. त्याचं झालं असं कि, त्यांच्या या कामाचे कौतुक म्हणून तामिळनाडू पोलिसांनी इन्स्पेक्टर राजेश्वरी यांचा व्हिडीओ ट्विट करून राजेश्वरीचे कौतुक केले आहे.

या  ट्विटनुसार, तामिळनाडूच्या सखल भागात पावसात वाहून गेलेल्या एका इसमाला बेशुद्धावस्थेत पोलिसांनी पाहिलं. कुणीही त्याच्या जवळ जात नव्ह्त पण तो व्यक्ती अशा अवस्थेत इन्स्पेक्टर राजेश्वरी यांना दिसला. पाहताचक्षणी इन्स्पेक्टर राजेश्वरी यांनी त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांचे प्राण वाचवले.

Tamil nadu police tweet

इन्स्पेक्टर राजेश्वरी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये इन्स्पेक्टर राजेश्वरी एका व्यक्तीला खांद्यावर घेऊन पाणी आणि चिखलाने भिजलेली दिसत आहे. ती त्याला गाडीवर झोपवण्याचा प्रयत्न करते, पण त्या गाडीत बसणे अवघड वाटल्याने लगेचच त्याला थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या ऑटोमध्ये नेऊन बसवायला लावते, त्यानंतर गाडीत बनवून त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहचवलं, 

आता तुम्ही म्हणाल हा प्रसंग घडलाच कसं काय ?? तर तामिळनाडूतील चेन्नईमध्ये सद्या मुसळधार पाऊस पडतोय. निर्माण झालेल्या परिस्थितिमुळे तेथील विमानांचे आगमन पुढे ढकलण्यात आले आहे विशेष म्हणजे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे चेन्नईला जाणाऱ्या विमानांचे आगमन संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.