राव म्हणाले, आर्थिक सुधारणा हिट झाल्या तर क्रेडिट दोघांचं, फेल झाल्या तर तुमच्या एकट्याचं… 

मनमोहन सिंग यांना एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणून ओळखल जातं. पण ते फक्त एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नव्हते तर एक्सिडेंटर अर्थमंत्री देखील होते. मनमोहन सिंग यांच्या पाच पुस्तकांचा संच २०१९ साली प्रकाशित करण्यात आला. 

चेंजिंग इंडिया नावाच्या या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले होते.

याचवेळी त्यांनी नरसिंह राव यांनी त्यांना देशात आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कशाप्रकारे जबाबदारी दिली होती तो किस्सा सांगितला होता. 

अर्थमंत्री म्हणून नरसिंहराव यांची पहिली पसंती मनमोहनसिंग या नव्हतीच. राव यांनी आयजी पटेल यांची निवड अर्थमंत्री म्हणून केलेली होती. पण आयजी पटेल यांनी नकार दिला.

त्यानंतर एकदिवस राव यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी डॉ. अलेक्झांडर मनमोहन सिंग यांच्या घरी आले. मनमोहनसिंग तेव्हा UGC चे चेअरमन होते. अलेक्झांडर यांनी मनमोहन सिंग यांच्यासमोर अर्थमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. पण मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री होण्याबाबत विशेष इंटरेस्ट दाखवला नाही.. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वत: नरसिंहराव UGC च्या ऑफिसमध्ये आले आणि अलेक्झांडर यांच्या प्रस्तावावर काय विचार केला असं मनमोहनसिंग यांना विचारलं. तेव्हा मनमोहन सिंग यांच उत्तर होतं, 

देश आर्थिक संकटात आहे. यावर खूप कठोर निर्णय घ्यावे लागतील. काम करत असताना मला फ्री हॅण्ड द्यायला हवा. हे शक्य असलं तरच जबाबदारी घेता येईल. 

यावर नरसिंह राव यांच उत्तर होतं, 

मंजूर आहे, मी तूम्हाला फ्री हॅण्ड दिला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं व्यवस्थित झालं तर क्रेडिट दोघांच पण फेल झालं तर जबाबदार तुम्हाला ठरवलं जाईल.. 

राव यांच्या या वाक्यावर मनमोहनसिंग अर्थमंत्रालयाची जबाबदारी घेण्यास तयार झाले. 

Screenshot 2022 03 12 at 4.41.07 PM

याचदरम्यान त्यांनी रुपयाचं अवमुल्यन कस एक्सिडेंटली झालं हे देखील सांगतलं होतं.

त्यांनी सांगितलं की लोकांच्या प्रतिक्रीय पाहण्यासाठी पहिल्या टप्प्यात खूप छोट्या प्रमाणात रुपयाचं अवमुल्यन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे रुपयाचं अवमुल्यन करण्यात आलं. पण या निर्णयावर जोरदार टिका झाली. या टिकेवरून नरसिंहराव टेन्शनमध्ये आले. त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि पुढच्या टप्प्यातील अवमुल्यन थांबवाव अस सांगितलं.

मी तात्काळ रिझर्व बॅंकेचे चेअरमन सी रंगराजन यांना फोन करुन पुढच्या टप्प्यातील रुपयाचं अवमुल्यन थांबवण्याबाबत सुचना केल्या पण तोपर्यन्त वेळ गेली होती. रंगराजन यांनी दुसऱ्या टप्प्यातील रुपयाच्या अवमुल्यनाची घोषणा केली होती. मनमोहनसिंग सांगतात दुसऱ्या टप्प्यातील हे अवमुल्यन खऱ्या अर्थाने एक्सिडेंटल अवमुल्यन होतं. 

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्यांनी इंदिरा गांधींना दिलेल्या सल्ल्याची देखील आठवण सांगितली होती.

जनता पक्षाचे सरकार जावून इंदिरा गांधींचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर इंदिरा गांधींनी देशाला संबोधून भाषण करणार होत्या. लिखित स्वरूपात असणाऱ्या भाषणाचा ड्राफ्ट मनमोहन सिंग यांना पाठवण्यात आला. मनमोहन सिंग यांनी ते भाषण वाचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यात एक ओळ खोटी आहे.. 

“जनता पार्टी सरकार ने विदेशी मुद्रा भंडार खाली कर दिया” 

अशी ती ओळ होती. मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली व त्यांना फॅक्ट सांगितली. ते म्हणाले या वाक्यात तथ्यच नाही. वास्तविक जनता पक्षाच्या काळात परकिय गंगाजळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जनता पक्षाच्या बाबतीत तुमची मते काहीही असोत पण त्यांनी जाताना परकिय गंगाजळीत मोठ्या प्रमाणात पैसे ठेवले आहेत. 

मनमोहन सिंग यांचा सल्ला इंदिरा गांधींनी त्वरीत मान्य केला आणि आपल्या भाषणातून हे वाक्य काढून टाकलं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.