आजही केम्ब्रिज विद्यापीठात मनमोहन सिंग यांच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आठवणी फेमस आहेत
जगभरातील विद्यार्थ्यांचे स्वप्न असत केम्ब्रिज विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्याचे. मात्र हे सगळ्यांचा जमत नाही. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण झालं. त्यांचे नावाने स्कॉलरशिप सुद्धा सुरु करण्यात आली आहे. अजूनही केम्ब्रिज विद्यापीठात मनमोहन सिंग यांच्या आठवणी सांगितल्या जातात.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९३२ रोजी आताच्या पाकिस्तान मधील ‘गाह’ नावाच्या छोट्याश्या गावात झाला. देशाच्या विभाजनानंतर मनमोहन सिंग यांचे कुटुंब भारतात आले. फाळणीची झळ सोसली. ते लहानपणापासूनच हुशार होते.
पंजाब महाविद्यालयातून बीएचं शिक्षणपूर्ण झाल्यानंतर १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणी मिळवत पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर १९६२ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या न्यूफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्राची डॉक्टरेट पूर्ण केली. सर्वात मानाचा गोल्ड मेडल सुद्धा जिंकले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे इतर राजकारण्यापेक्षा उजवे ठरण्याचे अनेक कारणे आहेत. त्यातील त्यांचे शिक्षण ही मोठी बाब आहे.
मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान भारताचे अर्थमंत्री होते. तर २००४ मध्ये ते पंतप्रधान झाले. सलग १० वर्ष त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभाग सांभाळला. त्यांनी देशाला लावलेल्या आर्थिक शिस्तीबद्दल त्यांचे अजूनही नाव घेण्यात येते.
२०१० मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाच्या सेंट जॉन कॉलेजने पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. मनमोहन सिंग स्कॉलरशिप सुरू केली आहे. ३५ हजार पौंडांची ही शिष्यवृत्ती आहे. सेंट जॉनमध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी, अर्थशास्त्र, सोशल सायन्सेस या विषयांत पीएचडी करु इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली होती.
२०१४ मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचे कुलगुरू लेसजेक बोरिसीवीच्ज हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या बद्दल भरभरून सांगितले होते. एवढेच नाही तर त्यांनी विद्यापीठाला भेट द्यायला हवी आम्ही त्यांचे स्वागताला तयार असल्याचे सांगितले होते. विद्यापीठाला भेट दिल्याने तेथील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढेल असे सांगितले होते.
तसेच केम्ब्रिज विद्यापीठात मनमोहन सिंग यांच्या बरोबर शिक्षणाऱ्या घेणाऱ्या अर्थतज्ञ जगदीश भगवती यांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. त्यात भगवती यांनी सांगितले की,
मी आणि मनमोहन सिंग केम्ब्रिज विद्यापीठात सोबत शिक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांच्या मुलगा केम्ब्रिज विद्यापीठात शिकायला आल्याने त्यांच्या बद्दल आमच्यामध्ये विशेष आकर्षण होते. तसेच ते पहाटे ४ वाजता उठून थंड्या पाण्याने अंघोळ करत. ब्रिटन मध्ये पहाटे थंड्या पाण्याने अंघोळ करणे सोपी गोष्ट नव्हती.
त्याचं वेळी लक्षात आले होते की, मनमोहन सिंग पुढे जाऊन मोठे व्यक्ती होणार. अशा प्रकारेचे मनमोहन सिंग यांचे किस्से अजूनही केम्ब्रिज विद्यापीठात सांगितले जातात.
हे ही वाच भिडू
- हे संग्रहालय मनमोहन सिंग आणि अडवाणी यांच्या आवाजात फाळणीच्या वेदनांचे स्मरण करणार
- पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या मनमोहन सिंग सरकारने ३७७ कलम का हटवलं नाही ?
- मनमोहन सिंग यांच्या आदेशावरून शशी थरूर युनो जिंकायला निघाले होते