एका पुणेकर भिडूमुळे थायलंडच्या पोरींनी पाकिस्तानला हरवलंय…

साधारण २०१९ ची गोष्ट आहे, पुण्यातल्या पीवायसी क्रिकेट ग्राऊंडवर एका कामासाठी जाणं झालं. तिथं महाराष्ट्राच्या मुलींची मॅच सुरु होती, काही ओव्हर्स बघाव्यात म्हणून निवांत बसलो आणि मॅच बघता बघता लक्षात आलं की, ज्या टीमसोबत महाराष्ट्राची मॅच सुरु आहे ती टीम आहे थायलंडच्या मुलींची.

फिल्डिंग करताना त्या एकमेकींना त्यांच्या भाषेत मेसेज देत होत्या, एखाद दुसरा सिक्स खाल्ला तरी चिअर करत होत्या, पार जीव तोडून खेळत होत्या. या सगळ्याला आज ३ वर्ष उलटली आणि नुकतंच महिलांच्या एशिया कपमध्ये या थायलंडच्या पोरींनी बलाढ्य पाकिस्तानला हरवलं. पण पाकिस्तानला कसं हरवलं यासोबतच दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे थायलंडचं महिला क्रिकेट इथवर पोहोचलं कसं ? आणि त्यांच्या या प्रवासात एका पुणेकर क्रिकेटरनं दिलेलं योगदान. 

हे समजून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ शेवटपर्यंत बघा…

 

Leave A Reply

Your email address will not be published.