सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, उत्तम आहार, योगासन तरीही ब्लड कँसर कसा काय झाला ?

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्यांची यादी काढली तर त्यात आमटे कुटुंबाचं नाव अग्रस्थानी येईल. आज त्यांची तिसरी पिढी या सामाजिक कार्यात गुंतली आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी तर आदिवासींच्या आरोग्य आणि विकासाच्या प्रश्नांसाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी लोक बिरादरी’ हा प्रकल्प सुरू केला आहे. दरवर्षी इथे जवळजवळ ५० हजार रुग्णांना आरोग्यसुविधा पुरविल्या जातात. समाजसेव करण्यात स्वतःला झोकून देणारे प्रकाश आमटे यांच्यावर एक संकट कोसळलं होतं. 

डॉ. प्रकाश आमटे यांना ल्युकेमिया आजार असल्याचं समोर आलेलं.  ‘ल्युकेमिया’ म्हणजेच ‘रक्ताचा कँसर’.

गेल्या दीड महिन्यापूर्वी त्यांना खोकल्याचा आणि तापेचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासण्या झाल्या अन तपासण्यांमधून ल्युकेमियाची सुरुवात असल्याचं समोर आलेलं.

त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाल्यापासूनच त्यांच्यावर गेल्या ४५ दिवसांपासू पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. या दीड महिन्याच्या काळात त्यांच्यावर ५ कीमोथेरेपी झाल्यात. त्यानंतर कुठं त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आमटेंना कर्करोगाचं निदान झाल्याची बातमी येताच अनेकांना प्रश्न असा पडलाय कि, ल्युकेमिया या आजाराची कारणे पाहता नैसर्गिक आरोग्यावर भर देणारे, आरोग्यदृष्ट्या तंदरुस्त असणारे डॉ आमटे यांना हा आजार होऊच कसा काय शकतो ?

ल्युकेमिया म्हणजे काय ?

ल्युकेमिया म्हणजे थोडक्यात ब्लड कँसर. ब्लड कॅन्सरमध्ये पांढऱ्या रक्त पेशींची संख्या अतिरिक्त प्रमाणात वाढते. या पेशी अस्थिमज्जामध्ये वाढत असतात आणि निरोगी असणाऱ्या रक्ताच्या पेशींची वाढ रोखतात. त्यावर लवकरात लवकर उपचार केले नाही तर माणूस मृत्यूच्या दाढेत ओढला जाऊ शकतो. 

त्याची लक्षणं म्हणजे, ताप येणे, सारखं घाम येणे, भूक कमी होणे, चक्कर येणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, नाकातून आणि हिरड्यातून रक्त येणे, डोके दुखणे, फिटस् येणे, सतत जंतुसंसर्ग होणे, पोटाचा आकार वाढणे,  मान, काख, जांघ येथील लसिकाग्रंथींचा आकार वाढणे इत्यादी गंभीर लक्षणे आढळतात.

प्रकाश आमटे यांना ल्युकेमिया आजार कसा काय होऊ शकतो असा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणजे हा आजार होण्यामागची कारणं – 

ती अशी आहेत की, रक्तधातू व पित्तदोष यांच्या गुणकर्मात बरेच साम्य आढळून येत असल्याने पित्तदोषाला दूषित करणारा आहार म्हणजे तुमच्या जेवणात आंबट, खारट आणि अतिशय तिखट चवीचा, उष्ण आणि तिखटाचं कॉम्बिनेशन जे जळजळ निर्माण करतं. तसेच दही किंव्हा शिळे पदार्थ, आणि सर्वात गंभीर प्रकार म्हणजे विरुद्धान्न. विरुद्ध आहार ज्यामुळे अनेक आजारांना आपण आमंत्रित करतो. 

असा प्रकारचा आहार अधिक प्रमाणात व वारंवार घेणे रक्तात दोष निर्माण करण्याचं काम करत असते या सगळ्या गोष्टी ल्युकेमिया या आजाराला कारणीभूत ठरतात. ज्या कारणांनी या व्याधी निर्माण त्या गोष्टी टाळणे गरजेचे असते..

हे कारणं बघता, कायमच निरामय आयुष्य जगणारे प्रकाश आमटे या आजाराला कसे काय बळी ठरले हा प्रश्न निर्माण होतो.

त्यांचे ४५ सेकंद श्वास रोखून पाण्यात शीर्षासन केल्याचे व्हिडीओही आपण पहिले असणारेत..व्यायाम, योगासन इतकंच नाही तर आहाराबाबत देखील त्यांचे विचार खूप साधे सरळ सोपे आणि आरोग्यसाठी फायदेशीर होते.

व्यक्तीचं खानपान कसं असावं याबाबत खुद्द प्रकाश आमटे यांनी मॅगसेसे पुरस्कार सोहळ्यात सांगितलं होतं की, साध्या राहणीसाठी प्रत्येकाला काही तत्त्वे आणि नियम असायला हवेत, सर्वांनी गरजेनुसार जीवनशैली जपावी.

आहाराबाबत ते सांगतात कि, लोकांनी आपल्या चवींवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे तसेच दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी जाण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे.

ते जे सांगतात त्याचं अनुकरण देखील ते करत असतात. आता डॉ. प्रकाश आमटे यांच्या दैनंदिन आयुष्यातील खाण्यापिण्याच्या गोष्टी जवळून जरी माहिती नसतील तरी, 

याबाबत आम्ही अधिक जाणून घेण्यासाठी बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्यासोबत काम केलेले डॉ. अशोक बेलखोडे यांच्याशी चर्चा केली. बेलखोडे १९८४ पासून आनंदवनाशी आणि आमटे कुटुंबाशी निगडित आहेत.

त्यांनी दोन्ही भारत जोडो यात्रेमध्ये बाबा आमटेंसोबत काम केलंय. तसेच काही कॅम्पचे संयोजक म्हणून बेलखोडे यांनी जबाबदारी सांभाळलीये. अजूनही ते आनंदवन, अशोकवन, हेमलकसा या सगळ्यांसोबत ते अजूनही कार्यरत आहेत. 

त्यांनी प्रकाश आमटेंसोबत देखील काही काळ घालवलाय, ते सांगतात कि प्रकाश आमटे यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीच्या बाबतीत अगदी कडक शिस्तीचे आहेत. मसाले, तेलकट पदार्थ ते कायमच विरोध करत असतात.

याबाबत विकासभाऊ आणि प्रकाशभाऊ हे दोन टोकाचे व्यक्तिमत्व म्हणावे लागेल, विकास आमटेंना अतिशय तिखट पदार्थ खायला आवडतात. ते अख्या कच्च्या मिरच्या खात असत,

विकास आमटेंबद्दल सुहास कुलकर्णी अनुभव नावाच्या मासिकात ‘आमटेवृक्षाच्या छायेत’ या लेखात लिहितात…

“विकासभाऊंचं जेवण म्हणजे मात्र अजब काम. ताटातले सगळे पदार्थ एकत्र करणार आणि गारा करून खाणार. ‘ही कुठली पद्धत जेवण्याची?’ असं विचारलं तर म्हणणार “नाही तरी पोटात गेल्यानंतर सगळे पदार्थ एकत्रच मिसळणार. मग कशाला वेगवेगळं जेवायचं?” म्हणजे वेगवेगळ्या चवी यांच्या जीवनातून हद्दपारच म्हणायच्या.

“विकासभाऊंच्या जिभेला ओळख एकाच चवीची- तिखटाची. तीही भयानक म्हणावी अशी. जेवताना ताटात ‘आरडीएक्स’ हवंच! हा त्यांचाच शब्द. आरडीएक्स म्हणजे नाना प्रकारची तिखटं-चटण्या-लाल-हिरवे ठेचे यांचं मिश्रण. त्याचा गोळा मटकावणार. या तिखट खाण्याचा त्यांना मोठा अभिमान. ‘मला कोणताही आजार नाही ते या तिखटामुळे’ असं सांगायलाही ते कमी करणार नाही.

मात्र याच्या उलट प्रकाश आमटे होते,

सुपारीचं एक खांड देखील ज्या व्यक्तीला वर्ज्य आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आमटे. 

यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याच्या आजारामुळे बाधा झाली असं म्हणता येणार नाही. कोणताही कँसर फक्त आहारामुळे होतो असं म्हणणं  मात्र त्यांना कँसर असण्याचं एक कारण असं असू शकतं असं म्हणणं चूक ठरेल. मात्र त्यांच्या मते,

प्रकाश आमटेंना कँसर होणं हे जेनेटिक असेल अशी शक्यता आहे. 

९९३-९४ च्या दरम्यान बाबा आमटेंना देखील ब्लड कँसरचा त्रास सुरु झाला होता. 

त्यामुळे त्यांना कायमच ब्लड द्यावं लागायचं. त्यामुळे प्रकाश भाऊंना हा कँसर होणं जेनेटिक असू शकतं. त्यांना गेल्या वर्षभरापासूनच अशक्तपणा, भूक कमी झालेली असा त्रास सुरु झालेला मात्र याआधीच्या तपासण्यामधून कॅन्सरचं निदान होत नव्हतं आता मात्र त्यांचा कँसर डिटेक्ट झालेला आहे. 

बदलत्या काळानुसार विज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, जगात अनेक उपचार उपलब्ध आहेत त्यामुळे ते लवकरच बरे होतील, ते नक्कीच या कँसरवर मात करतील”, अशा शबदात बेलखोडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यांची प्रकृती सद्या उत्तम आहे. त्यांनी गेल्या दीड महिन्याच्या काळात उपचारांना  चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे लवकरच कॅन्सरवर मात करतील. 

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.