शार्क टॅन्कच्या या जजनं त्यानं किती इन्व्हेस्ट केले याचा नेमका आकडा सांगितलाय.

‘शार्क टॅंक’ बऱ्याच दिवसांनी टीव्हीवर जर बघण्यासारखा रिऍलिटी शो आला.  नाच गाण्यांच्या त्याच त्याच रिऍलिटी शो ला कंटाळलेल्या भारतीय प्रेक्षकांनी पण हा शो चांगलाच उचलून धरला. यंग इंडियाचं यंग स्पिरिट हा शो बरोबर ओळखतो अशा शब्दात या शोची तारीफ करण्यात आली. शोचे मीम तर भारत सरकारच्या काही ऑफिशियल पेज वर  पण दिसले आहेत.

यंग एंट्रीप्रेनेओर आपली बिझनेस आयडिया शो मध्ये पीच करतात आणि जर त्यांची आयडिया, त्यांचं डेडिकेशन आवडली तर शोचे सेव्हन शार्क म्हणजे सात जज त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात.

एकतर ते त्यांच्या फंडींगच्या बदल्यात इक्विटी मागतात किंवा कर्जाचाही पर्याय देतात.

बऱ्याच वेळा कर्ज आणि इक्विटी या दोघांचाही समावेश हे शार्क स्पर्धकांना डील ऑफर करताना करतात. त्यामुळे मोठ्या मोठ्या बिझनेसचे यशस्वी फाउंडर असेलेले हे शार्क नक्की किती इन्व्हेस्टमेंट करतात याची प्रेक्षकांना उत्सुकता असायची. 

आता शोचा पहिला सिझन संपल्यानंतर शार्क अनुपम मित्तल याने आपण या पहिल्या शोमध्ये किती गुंतवणूक केली याची माहिती दिली आहे. 

मित्तलने संगितल्यानुसार त्याने २४ कंपन्यांमध्ये ५.४ करोडची गुंतवणूक केली आहे. यातील ७०% हे यंगप्रेन्युअर्स, ५०% वुमनप्रेन्युअर्स आणि ३०% कपल्स आणि फॅमिली यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये आहेत. #IncredibleIndia च्या उत्साही उद्योजकांच्या बिझनेसमध्ये योगदान दिल्याचा मला सार्थ अभिमान आहे असं हि तो म्हणाला आहे.   

याचबरोबर शो मध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांबद्दलची एक इंटरेस्टिंग आकडेवाडीही त्याने दिली आहे.

या हंगामात १९८ पैकी ६७ व्यवसायांना शार्क टँकमध्ये डील मिळाले आहे.त्यापैकी -५९ [८७%] हेIIT/IIM सारखी डिग्री नसलेले संस्थापक होते. ४५ [६७%] स्टर्टअप्स अशे होते ज्यांचा किमान एक सह-संस्थापक २५वर्षांपेक्षा कमी वय असलेला होता. ४० [६०%] स्टर्टअप्स असे होते ज्यांना पूर्वी कधीही निधी दिला गेला नव्हता. २९ [४३%] स्टर्टअप्समध्ये किमान एक महिला सह-संस्थापक होती. तसेच
२० [३०%] स्टार्टअप्स हे टियर II/III म्हणजेच छोटी शहरे आणि ग्रामीण भारतातील होते. १८ [२७%] स्टार्टअप्स हे असे होते ज्यात सह-संस्थापक म्हणून जोडपे/कुटुंब होते.

त्यामुळं वय, पैसे, गाव  याचे सगळे अडथळे पार करून हे स्टार्टअप्स यशस्वी होण्याच्या मार्गवर आहेत. 

त्यामुळे तुमच्याकडे आयडिया असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्तिथीत यशस्वी होऊच शकताय याचे आकड्यासहित प्रात्येक्षिक मित्तलने दिले आहे.

ह्या अशा शोमधून भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारी प्रतिभा पाहिल्यास डोळ्यापुढे हेच गाणं येतं जे अनुपम मित्तलने आपल्या पोस्टमध्ये पण शेअर केले आहे ते म्हणजे.

“छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी। नए दौर में लिखेंगे हम मिलकर नई कहानी।

आज पुरानी जंजीरो को छोड़ चुके हैं, क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं!

नया खून है, नई उमंग है… हम है नई जवानी!” ❤️ 

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.