मोदींचचं काय ओबामाचं पण ट्विटर हॅक झालेलं, पोरानं एक लाख डॉलर कमावले होते

नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. भारत सरकारनं ५०० बिटकॉइन विकत घेतलेत आणि आता तुम्ही पण दिलेल्या लिंकवरनं बिटकॉइन घ्या असं ट्विटमध्ये लिहलं होतं . आता देशाच्या पंतप्रधानाचं अकाऊंट हॅक झालंय म्हटल्यावर कोणतातरी मोठा आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांचा ग्रुप असणार,  अशा कायतरी मोठया बाता  हाणण्याच्या आधी ही एक स्टोरी नीट वाचा.

‘ कोवीड-१९ मुळं मी उदार झालोय. दिलेल्या लिंकवर तुम्ही जेवढे बिटकॉइन पाठवाल त्याच्या डबल बिटकॉइन मी तुम्हाला परत पाठवनाराय. म्हणजे तुम्ही $१००० चे बिटकॉइन पाठवले तर मी तुम्हाला $२००० चे बिटकॉइन परत करीन. पुढच्या फक्त ३० मिनीटं मी असं करणारय ‘

असं ट्विट इलॉन मस्कच्या ट्विटर हँडेलवरून करण्यात आलं होतं. आता ही स्किम  हेराफेरीमधल्या ‘इक्किस दिन मे पैसा डबल’ पेक्षा बंडल होती. मात्र ट्विट होतं मस्कशेठच्या ऑफिशिअल ट्विटर हॅण्डलवरून. त्यात जगातला सगळ्यात श्रीमंत तरी अतरंगी अशी मस्कशेठची इमेज. त्यामुळं लोकांनी पटापट ट्विटमधल्या लिंकवर पैसे टाकण्यास  सुरवात केली.

मात्र मस्कशेठचं अकॉऊंट हॅक करून असं ट्विट करण्यात आलायं असं जेव्हा बाहेर आलं तेव्हा ३० मिनटात पैसे डबल होण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांची तोंडं बघण्यासारखी होती. 

इलॉन  मस्क बरोबरच  अमॅझॉनचे जेफ बेझोस , वॉरेन बफे यांच्याही अकाऊंटवरणं अशी ट्विट्स करण्यात आली होती. 

एव्हडंच काय तर माजी राष्ट्रअध्यक्ष बाराक ओबामा, साध्याचे जो बायडन यांनाही हॅकर्सनि सोडलं नव्हतं. 

त्यामुळं मोदींच्या आधीपण बऱ्याच मोठ्या नेत्यांची अकाउंट हॅक करण्यात आलेत. 

हॅक झालेले अकाउंट सस्पेंड करेपर्यंत लोकांनी लाखो रुपये गमावले होते. थोडं थोडके नाहीतर $१,००,००० पेक्षा जास्त बिटकॉइन हॅकर्सच्या लिंकवर पाठवले होते. जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैके एक असणाऱ्या ट्विटरची यामुळे नाचक्की झाली होती. सुपर पॉवर म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेच्या प्रेसिडेंटचचं अकाऊंट हॅक झाल्यानं जगभर अमेरिकेचं हसू होत होतं.

आता अमेरिकेच्या अब्रूचा प्रश्न होता. खुद्द प्रेसिडेंटणं सारी यंत्रणा कामाला लावली.  चीन ,दक्षिण कोरिया ,इराण ते रशिया सगळीकडे हॅकर्सचा शोध घ्यायला सुरवात झाली.

पण अखेर हॅकर निघाला अमेरिकेचाच . अवघं १७ वर्षे वय असलेल्या ग्रॅहम इव्हान क्लार्क यानं हे कांड केलं होतं.

झटपट पैसे कमवायचे आणि मग निवांत लास वेगास मध्ये उडवायचे फक्त एव्हढयासाठीच त्यानं हे केलं होतं.आता लास वेगास ज्यांना कळलं नाही त्यांनी गोवा नजरेसमोर आणा. पुढे ग्रॅहम क्लार्कला ३वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली.

पण ही ट्विटर अकाउंट्स हॅक होतात तरी कशी? 

ग्रॅहमनं ट्विटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फिशिंग स्कीमनं  गंडवलं होतं. म्हणजे जसं आपल्याला तुम्ही लाख रुपयाचं बक्षीस जिंकलाय आणि तेय घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा अशे मॅसेज येतात अगदी तसं. मग ट्विटवरच्या कर्मचाऱ्याने अश्या लिंकवर क्लिक केल्यांनतर ग्रॅहमनं या कर्मचाऱ्यांचा फोन हॅक केला. 

अश्याच एक ट्विटरच्या सपोर्ट टीम मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोन हॅक करून ग्रॅहमनं तब्बल १३० अकाऊंट हॅक केले होते.

मोदींच्या ७० मिलियन फॉलवर्स पैकी किती लोकांना त्यांचं  ट्विटर अकाउंट हॅक करून केलेल्या ट्विटमुळं चुना लागलाय हे तर अजून बाहेर आलं नाहीए. या आधीही २०२० मध्ये मोदींचा एक ट्विटर अकाउंट हॅक झाला होतं. पण आता ट्विटर ही तर अमेरिकन कंपनी.  त्यामुळं यासाठी ट्विटरला नोटीस देण्यापलीकडे भारत सरकार काय करतंय का हे पाहवं लागणार आहे. बाकी ग्रॅहम सारख्याच कोणी हे कांड केलं असेल तर त्याची स्टोरी घेऊन भिडू तुमच्यापुढं येइलंच. 

      

 

Leave A Reply

Your email address will not be published.