चकमकीत ७ जणांना गुडघ्याच्या खाली एकाच ठिकाणी गोळ्या लागल्या, हे कसं काय

उत्तर प्रदेश पोलीस नेहमीच चर्चेचा विषय असतात. ही चर्चा सरकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची असते. म्हणजे एखाद प्रकरणं दोन दिवस माध्यमांत आलं, तर दुसरं तयारचं असत. आताही युपी पोलीस चर्चेत आलंय, ते आपल्या हटके एन्काऊंटरमुळे.

हा एन्काउंटर म्हणजे ७ वेगवगेळ्या लोकांना  एकाच ठिकाणी गोळी मारण्याचा. 

तर झालं असं कि, तीन दिवसांपूर्वी सलीम पहेलवान यांचा मुलगा आदिल याने पोलिसांना माहिती दिली की, त्याने अमीर नावाच्या व्यक्तीला भंगाराच्या कामासाठी एक गोदाम भाड्याने दिले होते. मात्र अमीर आणि त्याचे साथीदार रद्दीच्या नावाखाली प्राण्यांची कत्तल करत आहेत.

आता ही माहिती मिळाल्यावर पोलीस लगेचचं कामाला लागली. त्यात काल गुरुवारी परत खबर मिळाली कि, संध्याकाळी ६.४५ वाजता गोदामात जनावरांची कत्तल सुरु आहे. पोलिसांनी लगेच गाड्या काढल्या आणि आदिलसोबत गोदामावर पोहोचली.

तिथं पोहोचताच समोरचं चित्र पाहून पोलिसांनी गोळीबार सुरु केला. यावर आरोपींनी सुद्धा गोळीबार केला. आरोपी आणि पोलिसांमध्ये फिल्मी स्टाईलने चकमक सुद्धा झाली. जी सध्या चर्चेचा विषय बनलीये. 

आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन पोलीस आणि आरोपींमधली चकमक काय नवीन विषय आहे होय? पण भिडू जरा रुको सबर करो. 

कारण या चकमकी दरम्यान पोलिसांनी १३ गोळ्या झाडल्या. या १३ गोळ्यांपैकी सात गोळ्या सात आरोपींच्या बरोबर गुडघ्याच्या खाली पायात एकाच ठिकाणी लागल्या. 

आता प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरांनी सुद्धा सात गोळ्या झाडल्या. पण त्याचा निशाणा हुकला. फक्त एक गोळी पोलिसांच्या गाडीला लागली.  या चकमकीनंतर पोलिसांनी गुरांची कत्तल करणाऱ्या सातही तस्करांना अटक केली. 

या चकमकीची माहिती पोलिसांनी ट्विटरवरून दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपींकडून ७ अवैध बंदुक, १२ जिवंत आणि ७ शेल काडतुसे आणि तस्करीसाठी वापरलेली उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

यावेळी  हनिफ, शोकीन, पप्पू, युनूस, नाझीम, युनूस, इस्लाम अश्या या जखमी झालेल्या ७ आरोपींची नाव आहेत. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चकमकीदरम्यान भुरा आणि दानिश नावाचे दोन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. 

चाकाशी दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी भंगार कामाच्या बहाण्याने गोदाम भाड्याने  घेतला होता. पण इथं जनावरांची कत्तल सुरू होती. आरोपी हे रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या जनावरांना टेम्पोमध्ये भरून रात्रीच्या वेळी गोदामात आणायचे. आदिलच्या गोदामात, जिथे प्राण्यांची कत्तल केली जात होती, तिथे मोठ्या प्रमाणात जुने सर्जिकल ग्लोव्हज  सुद्धा  होते. हे जुने सर्जिकल ग्लोव्हज धुऊन पुन्हा पॅक करून बाजारात विकले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

आता या अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्हेगारी इतिहासाचीही माहिती गोळा करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.