यूपीचे बाहुबली ज्यांना तुरूंगातून सोडवण्यासाठी मुलायमसिंह यांनी सत्ता बदलून टाकली

उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, त्यामुळे सगळ्याचं पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. आता निवडणूका म्हंटलं की, उमेदवार प्रचार, रॅली, आश्वासनांची कागदपत्रे, सभा, मोठ- मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटी ह्या सगळ्याचं गोष्टी चर्चेत असतात.

पण या निवडणुकीच्या धामधुमीत सगळ्यात जास्त चर्चा असते ती नेतेमंडळी आणि त्यांच्या चर्चेत किस्स्यांची. अशाच यूपीच्या बाहूबली नेत्यांच्या यादीतलं चर्चित नाव म्हणजे रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैय्या.

उत्तर प्रदेशाच्या कुंडा विधानसभा मतदारसंघाये आमदार राजा भैया हे जनसत्ता दल लोकतांत्रिकचे सुप्रीमो सुद्धा आहेत. यावेळी सुद्धा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राजा भैय्या सपासोबत युती करतील अशा चर्चा रंगल्यात. कारण काही दिवसांपूर्वी राजा भैया यांनी सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून राजा भैय्याच्या ‘सपाच्या जवळीकतेबाबत अटकळ बांधली जात आहेत.

पण सपाची सुत्र सांभाळणाऱ्या अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना राजा भैय्या यांना ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे जास्तचं कन्फ्यूजन वाढलयं. पण तसं पाहिलं तर उत्तर प्रदेशच्या राजकारणात राजा भैया आणि मुलायमसिंह यादव यांच्यातल्या नातेसंबंधांचे अनेक किस्से आहेत.

आधी राजा भैय्या यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचे तर ते 1993 पासून कुंडा येथून आमदार आहेत. त्यांच्यावरही आरोप झाले. तुरुंगातही गेले. राजा भैय्याने आपल्या घराच्या तलावात मगर पाळल्याचे सांगितले जाते. त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतात.

राजा भैया यांनी 2018 मध्ये जनसत्ता दल लोकतांत्रिकची स्थापना केली. पुढील वर्षी होणाऱ्या यूपी विधानसभा निवडणुकीतही ते आपली ताकद दाखवणार आहेत. उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार असल्याचा दावा राजा भैय्या यांनी केला आहे. राजा भैया कोणाशी युती करणार की नाही? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

नोव्हेंबर 2002 मध्ये मायावती यांनी प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथील अपक्ष आमदार राजा भैय्या यांना भाजप आमदार पूरण सिंह बुंदेला यांच्या तक्रारीवरून तुरुंगात टाकले होते. राजा भैय्या यांच्यावर सरकारने दहशतवादविरोधी कायदा (पोटा) लागू केला होता. राजा भैया, त्यांचे वडील उदय प्रताप सिंग आणि चुलत भाऊ अक्षय प्रताप सिंग यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अपहरण आणि धमकावल्याचा आरोप होता.

त्यावेळी भाजप आणि मायावती यांच्यात अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी सुरू होती. राजा भैया यांच्यासह २० आमदारांनी तत्कालीन राज्यपाल विष्णुकांत शास्त्री यांच्याकडे मायावती सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष विनय कटियार यांनी राजा भैय्यांवरून पोटा काढून टाकण्याची मागणी केली होती.

पण मायावतींनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. एकीकडे भाजप आणि बसपामधील संबंध कमकुवत होत होते. त्याच वेळी, ताज कॉरिडॉरच्या वादावरून केंद्र आणि मायावती सरकारमध्ये खळबळ सुरूच होती.

हा वाद वाढतच गेला आणि ऑगस्ट 2003 मध्ये मायावतींनी राज्यपालांकडे विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केली. लालजी टंडन यांनी बसपाचा पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र राज्यपालांना सुपूर्द केले. पण पाठिंबा काढून घेण्याचे पत्र राज्यपालांना आधीचं मिळाल्याचा दावा केला गोला. त्यामुळे राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केली नाही.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळात मुलायम सिंह यादव यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. एवढंच नाही तर बसपाच्या 13 आमदारांच्या पाठिंब्याबाबत ही ते बोलले. बसपच्या बंडखोर आमदारांवर पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी मायावतींनी केली. जे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलं नाही. मुलायम सिंह यादव यांच्या समर्थनार्थ अनेक अपक्ष आमदारही पुढे आले आणि नेताजींनी ऑगस्ट 2003 मध्ये तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

पण शपथविधीच्या अर्ध्या तासानंतर मुलायमसिंह यादव यांनी राजा भैय्यांवर लागू केलेला दहशतवाद प्रतिबंधक कायदा (पोटा) मागे घेण्याचे आदेश दिले. पोटा लागल्यानंतर राजा भैय्या यांनी दहा महिने तुरुंगात काढले होते. राजा भैय्याला तुरुंगातून लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. वाटेत राजा भैय्याने पहिल्यांदा आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा पाहिलेला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.