वसंतदादा, “तुम्ही जेल फोडला तेव्हा मी कृष्णाकाठी डबा घेवून संडासला बसलो होतो.” 

टायटल वाचून दचकलात काय ? तर मग किस्सा देखील तसाच आहे. अगदी मज्जेशीर टाईपमधला. 

या घटनेचं वर्णन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे विनायकदादा पाटील यांनी आपल्या “गेले लिहायचे राहून” या पुस्तकात केला आहे. 

हा किस्सा आहे वसंतदादा पाटील आणि त्यांना भेटायला आलेल्या मराठी कथाकार व शासकिय अधिकारी श्री.दा पानवलकर यांचा. 

श्री. दा पानवलकर मराठीतले उत्तम साहित्यिक त्यांनी लिहलेला “सुर्य” या कथेवरच “अर्धसत्य” नावाचा सिनेमा आला होता. त्याचबरोबर ते सेंट्रल एक्साईज खात्यात नोकरीस देखील होते.  त्यांच्या निवृत्तीला जेमतेम एकवर्ष राहिलं होतं निवृत्त झाल्यानंतर सांगलीला आपल्या मुळ गावी जायचं असा त्यांनी बेत देखील आखला होता. पण महत्वाचा प्रश्न होता तो सांगलीतल्या घराचा.  

सांगलीत असणार त्यांच घर त्यांनी कृषीखात्याला भाड्याने दिलं होतं आणि कितीही विनंती अर्ज केले तरी कृषीखातं ते घर सोडण्यास तयार होतं नव्हत. आत्ता निवृत्त होवून देखील बेघरच राहणार म्हणून कोणत्याही परस्थिती आपलं घर परत मिळवण्याच्या तयारीत पानवलकर होते. मात्र कृषी खात्याचा शुन्य प्रतिसाद त्यांच टेन्शन वाढवतच होता. 

एक दिवस आमदार ना.ग. नांदे पानवलकरांना म्हणाले, “एक उपाय सुचवू का ? तुम्ही वसंतदादा पाटलांना भेटा” 

यावर पानवलकर म्हणाले, माझी दादांशी ओळख नाही वो ! 

तात्काळ नांदे म्हणाले अहो, मी तुमच्यासोबत येतो आपण दोघे मिळून जावू तात्काळ काम होवून जाईल. 

ठरलं ना.ग. नांदे आणि पानवलकर हे दोघे मिळून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या केबिनमध्ये गेले. 

नांदे म्हणाले, “दादा, हे पानवलकर सांगलीचे आहेत.” 

अरे व्वा !!! म्हणत दादांनी लगेच चहाची ऑर्डर दिली. दादा म्हणाले, “हे तर आमचे गाववाले आहेत.”

पानवलकरांनी लगेच दादांना कामाच स्वरुप सांगितलं. दादांनी फोन केला, आणि १५ दिवसांच्या आत कृषीखात्याकडून पानवलकरांच घर खाली करण्यात यावं आणि पंधरा दिवसात तुम्ही घर खाली केलं का नाही हे मला कळवायचं अस संबधीत अधिकाऱ्याला सांगत फोन ठेवून दिला. 

महत्वाच काम झाल्यामुळे पानवलकर, आमदार नांदे आणि वसंतदादांच्या गप्पा रंगात आल्या. दादांनी त्यांना विचारला काय हो पानवलकर तुम्ही हे कथालेखनाकडे कस काय वळला. 

तेव्हा पानवलकर म्हणाले, 

“मी आयुष्यातली पहिली कथा लिहली, ती तुम्ही ब्रिटीशांच्या काळात तुरूंगाच्या भितींवरुन उडी मारुन फरार झाला त्याची. आपले दोन सहकारी गोळीबारत मारले गेले. आपल्या खांद्यालाही गोळी लागली. या घटनेवरच मी पहिली कथा लिहला”. 

दादांनी इंटरेस्ट घेताच पानवलकर पुढे म्हणाले, 

“ दादा, अहो मी तेव्हा डबा घेवून कृष्णाकाठी संडासला बसलो होतो.कैद्यांची पळापळ व पोलिसांचा गोळीबार पाहून माझ्या अंगात उठून पळून जाण्याइतकी शक्ती देखील राहिली नव्हती. मी घाबरलो होतो. गुमान डोळे उघडे ठेवून पाहत राहिलो. जे पाहिलं, ते तसच्या तस लिहून वृत्तमानपत्राकडे पाठवलं. लेख छापून आला. सगळ्यांना आवडला. खूप कौतुक झालं माझं. असा मी कथालेखक झालो.”

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.