मुंबईत सापडलेलं 1400 कोटींचं म्याऊ म्याऊ ड्रग काय असतं?

म्याऊ म्याऊ..

अनेक जण अशी हाक मांजराला देतात. मात्र म्याऊ म्याऊ नावाचं एक ड्रग सुद्धा आहे. मुंबईतील बहुतांश ड्रग्ज ॲडिक्टेड तरुण म्याऊ म्याऊचा नशा करतात आणि आता मुंबईसह अनेक ठिकाणी या ड्रग्जचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.

मुंबई पोलिसांच्या वरळी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं नालासोपारा परिसरातील औषध निर्मिती प्लांटवर छापा टाकला. मुंबई पोलिसांनी या छाप्यात १४०० कोटी रुपयांचे ७०० किलो माऊम्याऊ ड्रग जप्त केलं आहे.

मुंबई पोलिसांच्या पाठोपाठ पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने सुद्धा पुणे स्टेशन परिसरात १७ लाख रुपयांचं म्याऊ म्याऊ ड्रग जप्त केलय. तसेच यातील दोघा जणांना ताब्यात घेतलं आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेला हा म्याऊ म्याऊ ड्रग नेमका आहे काय?

या म्याऊ मटवू ड्रगचं खरं नाव मेफेड्रोन आहे. परंतु याला बऱ्याचदा व्हाईट मॅजिक, ड्रोन, पार्टी ड्रग  किंवा म्याऊ म्याऊ म्हणून ओळखलं जातं. हा स्टिम्युलेटिंग साठी तयार करण्यात आलेला अँफेटामाईन आणि कॅथिनोन स्टिम्युलेटर आहे.

मेफेड्रोन हा नैसर्गिकरित्या तयार होणारा केमिकल आहे. जो डोक्याची सेंट्रल नर्व्ह सिस्टीम प्रभावित करतो. या म्याऊ म्याऊचे परिणाम कोकेन आणि एमडीएमए सारखे असतात. मेफेड्रोन घेतल्याने दात कुडकुडतात म्हणून मेफेड्रोन अनेकांचं आवडतं ड्रग आहे. 

मेफेड्रोन असतो कसा आणि वापरतात कसा?

मेफेड्रोनची पावडर पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाचा असते. मेफेड्रोन पावडरच्या स्वरूपात असतो आणि  गोळ्यांच्या किंवा कॅप्सुलच्या स्वरूपात असतो.

मेफेड्रोन गिळून खाता येतो, नाकातून ओढत येतो किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून इंजेक्ट सुद्धा केला जाऊ शकतो. काहींच्या मते मेफेड्रोनची चव मेटलसारखी असते. तर काहींच्या मते त्याची चव धुरासारखी असते. 

आज इतक्या फेमस असलेल्या म्याऊ म्याऊची मागणी २००७ मध्ये  सगळ्यात जास्त वाढली होती.

पूर्वी म्याऊ म्याऊ वर बंदी नव्हती त्यामुळे २००७ मध्ये म्याऊ म्याऊ ऑनलाईन विकायला सुरुवात झाली होती. ऑनलाईन विक्री होत असल्यामुळे सगळीकडे याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली होती. ब्रिटिश रॅव्हस दरम्यान याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. 

ऑनलाईन विक्री होत असल्यामुळे लवकरच म्याऊ म्याऊ अमेरिकेत  मध्ये पोहोचला. याचा वापर वाढल्यांनंतर अमेरिकेच्या ड्रग इन्फोर्समेंट डमिनिस्ट्रेशनने यांच्यासंबंधी तपस करायला सुरुवात केली. 

त्यांनतर २०१० मध्ये युनायटेड किंग्डमने मेफेड्रोनवर बंदी आणली होती तर लगेच दुसऱ्या वर्षी अमेरिकेने सुद्धा यावर बंदी घातली.

ड्रग इन्फोर्समेंट डमिनिस्ट्रेशननुसार २०११ मध्ये मेफेड्रोन हे शेड्युल १ ड्रॅग होतं. त्यामुळे इंटरनेट, स्मोक शॉप, हेड शॉप, जनरल स्टोर्स मध्ये सामान्यपणे विकला जात होता. त्यासोबतच अडल्ट पुस्तकांची दुकानं, गॅस स्टोर, रिसर्च केमिकल आणि अंघोळ करण्याची पावडर म्हणून मेफेड्रोन विकण्यात येत होता.  

इतर ड्रगच्या तुलनेत म्याऊ म्याऊ चा वापर का केला जातो?

मेफेड्रोन बाकी ड्रग्जच्या तुलनेत स्वास आहे. साधारणपणे १००० ते १५०० रुपये ग्रामप्रमाणे याची विक्री केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनची खरेदी केली जाते आणि नाश करण्यासाठी याचा वापर केला जातो. 

मुंबईच्या धारावी आणि सिद्धार्थ नगरातील टिन एज मुलांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे तेथील तरुण या म्याऊ म्याऊ ड्रगच्या विळख्यात अडकलेले आहेत.

तज्ज्ञांच्या मते मुंबईतील जवळपास ८० टक्के तरुण या म्याऊ म्याऊचे व्यसन करतात. यात कोणता तरुण म्याऊ म्याऊने ॲडिक्टेड आहे हे सहजासहजी लक्षात येत नाही. जोपर्यंत ही मुलं ड्रग साठी मोठ्या प्रमाणावर पैसे मागत नाहीत तोपर्यंत याचा पत्ता लागत नाही.

भारतात २०१५ पर्यंत या ड्रगवर बंदी नव्हती.

युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेने २०११ पर्यंत या म्याऊ म्याऊ वर बंदी घातली होती परंतु भारतात मात्र याच्यावर बंदी नव्हती. २०१० च्या दशकात मेफेड्रेनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागला. अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये मेफेड्रेन मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात येऊ लागला.

याची दाखल घेत २०१५ मध्ये मेफेड्रेनला नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थांच्या यादीत टाकण्यात आलं.

या मेफेड्रेनमुळे रोमांचकारी अनुभव येतात.

शहरातील बहुतेक तरुणांना मेफेड्रेनचं व्यसन जडलं आहे. मेफेड्रेनचं सेवन केल्यामुळे तरुणांना ऊर्जा मिळते तसेच रोमांचकारक अनुभव येतात त्यामुळे तरुण मुलं याकडे वळतात.

मेफेड्रेन घेतल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, उत्साह येतो आणि सभोवतालच्या लोकांच्या बाबतीत अतिशय प्रेमळ भावना वाटायला लागतात.

मात्र मेफेड्रेनमुळे अनेक परिणाम होतात.

मेफेड्रेन घेतल्यानंतर हृदयाचे ठोके वाढतात आणि ब्लड प्रेशर वाढतो. चिंता वाढते आणि बंडखोर प्रवृत्ती वाढते, स्नायू ताणतात आणि डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर, घाम येते, छाती दुखायला लागते, मळमळ होते, भूक मंदावते, वारंवार सौच लागते आणि दात कुडकुडायला लागतात.

या समस्यांसोबतच अनेक घातक समस्या सुद्धा निर्माण होतात. त्यामध्ये मनोविकार, झोपेची समस्या, चिडचिड, मतिभ्रंश असे गंभीर परिणाम दिसून येतात.

हे तर निव्वळ परिणाम झाले मात्र कॉकटेल केल्यास मृत्यू सुद्धा होऊ शकतो….

निव्वळ मेफेड्रेन घेतल्यास वरील परिणाम होतात मात्र मेफेड्रेन सोबत दारू आणि गांजा घेतल्यास मळमळ आणि उलट्या होतात. तर मेफेड्रेन सोबत बर्फ घेतल्यास मृत्यू होऊ शकतो असे तज्ज्ञ सांगतात. 

घातक परिणाम असलेला हा म्याऊ म्याऊ ड्रग स्वस्त आहे.  याचं सेवन केल्यामुळे एक्साईटमेन्ट आणि उत्साह वाटतो. त्यामुळे अनेक तरुण म्याऊ म्याऊचे सेवन करतात व याच्या विळख्यात अडकतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.