आफ्रिकन म्हणून चेष्टा होणारे सिद्दी भारताला ऑलिंपिकमध्ये गोल्ड मिळवून देतील?

आपले इंडियन प्लेअर ऑलंपिक मध्ये मेडल मिळवायला खूप कमी पडतात. कोण म्हणत आपल्या खेळाडूंकडे पैसा नाही. पण पैसा तर आफ्रिकन देशांकडे पण नाही तरी त्यांच्याकडे ढिगानं मेडल्स आहेत. कोण म्हणत ते ना अंगापिंडाने तगडे असतात. शेगावच्या गजानन महाराजांची कचोरी खाणारा ख्रिस गेल खरच भारताचा असता तर? आपण पण पोत्याने मेडल्स आणले असते.

तर आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो,

भारतात सुद्धा ख्रिस गेल, उसेन बोल्टच्या तोंडात मारतील असे तगडे खेळाडू आहेत आणि तेही आफ्रिकन वंशाचे.

सिद्दी त्यांचं नाव. जंजिरावाले सिद्दी.

मूळचे हे लोक पूर्व आफ्रिकेतल्या बंतु जमातीचे. ७ व्या शतकात भारतात व्यापारी, कामगार आणि गुलाम म्हणून आले. खतरनाक लोक. भारताच्या इतिहासात पण मोठा वाटा उचलला आणि नाव पण कमावला. अहमदनगरचा काळजीवाहू मलिक अंबर सिद्दीच होता. आणि तो रझिया सुलतान स्पेशिअल वाला याकूत जमाल उद्दीन याकूत वो भी सिद्दीच. बाकी नवाब तो वो लोग थेच. वरून गव्हर्नर्शीप, मिलिटरी कामंडर्शीप पण भूषवले.

तेव्हा काही गुलामांनी स्वतःला स्वतंत्र करून घेतला आणि जंगलात जाऊन स्वतःची कम्युनिटी बनवून राहू लागले, मस्त खुद के नशे मे खुद के स्टाइल से. गुजरात कर्नाटक महाराष्ट्र आंध्रप्रदेश ह्या लोकांनी आपलासा केला. स्पेशिअली महाराष्ट्र गोवा कर्नाटकची किनारपट्टी. गेल्या हजारभर वर्षात ते भारतीय झाले, कोकणी झाले अन मराठीपण झाले पण अजूनही आपला आफ्रिकन रांगडेपणा घालवला नाही.

तर झालं काय तर आपण जस म्हणतोय तसं तेव्हा कोणाच्या तरी लक्षात हे जंगलात राहणारे आफ्रिकन वंशाचे सिद्दी आले. 

१९८७ साली भारत सरकारने ठरवलं की एक प्रोजेक्ट सुरु करायचा. Special Area Games Program. बस फक्त नॅचरल अॅथलेटीक्स शोधायचे, पोर खेळवायची आणि गोल्ड लुटायचा. नावाला हा आदिवासी मुलांसाठीचा प्रोग्रॅम होता पण मेन टार्गेट सिद्धी होते.

सरकारने त्यांची पोरं नेली. त्यांना खाऊपिऊ घातल. राहायला चांगले हॉस्टेल दिले. मोठमोठ्या कोचच्या मदतीन ट्रेनिंग सुद्धा सुरु केलं. पहिल्यांदाचं हे इंडियन्स ऑल ओव्हर इंडीया लै फेमस झाले. मस्त खेळले रेकॉर्ड बीकॉर्ड बनवला. मेडल्स पण आणले. खुश कर दिया सबको.

पण अचानक १९९३ ला त्यांना सांगितलं की अब सबकुछ बंद. SAGP फिनिश. अपना अपना समान लेलो, पॅक करो, टाटा बाय बाय.

असं म्हणतात की, हा राजीव गांधीनी आणलेला प्रोग्रॅम होता. त्यांच्या अकाली निधनानंतर याकडे दुर्लक्ष झालं. आणि नवीन सरकारे आली, त्यांना वाटलं की हा वायफळ खर्च नको. भारताचं ऑलंपिकचं फ्युचर असणारी ही मुलंमुली परत जंगलात आपापल्या वाड्यावस्तीमध्ये परतली.

आजमात्र उनकी हालत खराब है. जुजे सिद्दी म्हणून एकजण आहे. १९८७ चा स्पोर्ट वाला. बाकी सिद्दी घरी परतले हा मुंबईतच राहिला. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जॉब करतो. पण लाईफ इतर बाबु लोकांसारखी नाही.

एकदा लोकांनी टुरिस्ट समजून कॉलर पकडली आणि शिस्तीत राहायचा म्हणून सांगितलं. राहायला सहज घर मिळत नाही, शेजारच्या बिल्डिंग मधले अंकल त्याच्या पोराला चिम्पाझी म्हणतात, लोकल मध्ये ट्रॅव्हल करताना त्याच्या रंगावरून दिसण्यावरून लोक फालतू कंमेंट पास करतात. त्यांना वाटत याला काही कळत नसेल पण अन्फॉरचुनेटली याला सगळं कळत. अपनाच तो आदमी है ना वो भाई. आफ्रिकन लोक बदनाम आहेत म्हणून लोक मला वाईट समजतात पण त्यांना कळत कसं नाही की मी इथलाच एक आहे अशी खंत व्यक्त करतो.

दुसरी खेळाडू सिद्दी कमलाताई रेकॉर्ड ब्रेकिंग परफॉर्मन्स दिलाय तिनं पेंटथलोन मध्ये. भारताचा झेंडा असलेला कोट अभिमानानं दाखवून सांगते,

” मेले तरी हा कोट कोणाला देणार नाही. आयुष्यातल्या सगळ्यात इम्पोरटंट गोष्टींमधली एक आहे”.

या दोघांची पण  एक डॉक्यूमेंट्री युट्यूब वर आहे. यु मस्ट वॉच. हे दोघेपण मूळ कर्नाटकच्या कारवार भागातले. यांच्या डॉक्युमेंटरी मध्ये एक कोकणी भाषेतला गाणं चालू आहे मस्त मराठी फील येतो. त्याच डॉक्युमेंटरी मध्ये शेवटी असा सांगितलंय की SAGP परत सुरू झालय. २०२४ साली ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून तिथं परत एकदा आपले हे स्पोर्टपर्सन खेळातील परत एकदा फेमस होतील आणि इस बार आपल्याला त्यांना आपलंसं करायची अजून एक संधी देतील.

  • भिडू सुस्मित शिर्के

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.