हिटलरला विरोध करण्यासाठी महिला मुद्दाम लाल लिपस्टिक लावायच्या

सद्या मेकअपमधील लिपस्टिकवरून सोशल मिडियावर चर्चा चालू आहे. त्यावरून एक जुना मुद्दा आठवणीत आला तो म्हणजे,  या लाल लिपस्टिक वापरून महिला या अडोल्फ हिटलरच्या अजेंड्याचा विरोध करायच्या….तुम्ही म्हणाल कि, हिटलरचा विरोध करण्यासाठी रेड लिपस्टिकची  असली कसली आयडिया होती ?

त्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. पण त्या आधी त्यामागचा इतिहास जाणून घ्या.

हा काळ अर्थातच दुसऱ्या महायुद्धादरम्यानचा होता….जे जे देश हिटलरच्या विरोधात होते, त्या-त्या देशात लाल लिपस्टिक महिलांमध्ये प्रतिकाराचे प्रतीक बनली होती. 

हिटलर जर्मनचा प्रमुख होता. दुसरे महायुद्ध सुरु होण्यामागे असलेल्या प्रमुख हिटलरची गणना केली जाते.तेच पहिल्या महायुद्धात हिटलरने सैनिक म्हणून काम केलेले आहे. काही दिवसानंतर जर्मनची सत्ता त्यांनी हस्तगत केली आणि आपल्या बुद्धिचातुर्याने वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा हुकूमशहा झाला. त्यावेळेस जर्मनीला सगळ्यात शक्तिशाली देश बनविण्याची त्याचे स्वप्न होते. म्हणून त्याने त्यासाठी खूप प्रयत्न केले व जर्मनीच्या विकासाला चालना दिली.पण कितीही काहीही असले तरी तो शेवटी हुकूमशहाच होता. 

इतका कि, त्याने नाझी विचारधारेला सोडून इतर कोणत्याच विचारधारेला मान्यता दिली नव्हती. त्याचाच भाग म्हणून त्याने हजारो साहित्यिकांवर बंदीआणली होती, तसेच त्याच्या नाझी विचारधारेच्या विरोधात आव्हानं देणारी पुस्तकं देखील जाळून टाकली गेली होती.  अगदी आदर्श साहित्य कस असावं हे लोकांना सांगण्यासाठी त्याने काही लेखकांना दबावाखाली पुस्तकं लिहायला लावली होती.

हिटलर विरोधाचे एक शस्त्र म्हणजे लिपस्टिक, विशेषत: लाल लिपस्टिक पण का ?

या दुसऱ्या युद्धादरम्यान, अन्न, पेट्रोल या वस्तूंसह सर्व आवश्यक वस्तू कार्डद्वारे वितरित केल्या गेल्या. त्यात  सौंदर्यप्रसाधने, विशेषत: लाल लिपस्टिक सारखी विशिष्ट वस्तू जीवनासाठी महत्त्वाची मानली जात होती, कारण ते स्त्रियांच्या सौंदर्याला प्राधान्य देतात..तसेच महिलांच्या मेकअप चा तो विशेष भाग होता त्यामुळे कार्ड प्रणाली त्याला लागू होऊ नये, असं महिलांचं म्हणणं होतं. 

इंग्लंडमध्ये, विन्स्टन चर्चिल आणि ब्रिटीश सरकारने या पद्धतीचे समर्थन केले होते. त्याकाळी व्होग मासिकाच्या ब्रिटीश आवृत्तीतअसं लिहिलं देखील होतं कि, “स्त्रियांसाठी सौंदर्यप्रसाधने तितकीच महत्त्वाची आहेत जितकी पुरुषांसाठी तंबाखू महत्वाची आहे.”

युद्धाच्या काळात सौंदर्यप्रसाधनांवर उच्च कर लावले गेले होते. आणि मग महिलांनी यावर उपाय म्हणून अनेक महिलांनी ओठांना रंग देण्यासाठी बीटचा रसलावायला सुरुवात केली आहे.

सौंदर्यप्रसाधनांवर असलेल्या नियमांमागे आणखी एक कारण म्हणजे, स्वतः हिटलरला रेड लिपस्टिक तिरस्कार होता.  तसेच आणखी एक कारण म्हणजे, सौंदर्यप्रसाधनांमध्ये काही प्राण्यांचे घटक असल्याने कट्टर शाकाहारीअसलेल्या हिटलरने चमकदार लाल लिपस्टिकवर बंदी आणली होती. 

दुस-या महायुद्धादरम्यान प्रत्येक कुटुंबातील पुरुष हे युद्धात लढण्यास गेले होते त्यामुळे या पुरुषांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करणे गरजेचे झाले होते. 

स्त्रियांनी नोकर्‍या घेतल्यामुळे त्या पारंपारिक स्त्रीत्व जपून नोकरी करत असत. तसेच त्या कामावर जाताना मेकअप करताना लिपस्टिकलावायला प्राधान्यदेत असायच्या. पण जेंव्हा हिटलर ने त्यावर अधिक कर लावले आणि त्यावर बंदी आणली. 

हाच धागा पकडून या महिलांनी हिटलर चा विरोध करण्यासाठी मुद्दामून लाल लिपस्टिक लावणे सुरु केले. लाल लिपस्टिकबद्दल आपली नाराजी व्यक्त करणाऱ्या हिटलरच्या विरोधात हे एक हत्यारच बनले होते. 

त्यानंतर स्त्रीवादाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेमुळे स्त्रियांमध्ये लिपस्टिकची लोकप्रियता कमी झाली.  कारण दुसऱ्या लाटेने लिपस्टिक आणि मेकअपचा निषेध केला होता. कारण स्त्रीने सुंदर आणि आकर्षक दिसावं म्हणून स्त्रिया जर मेकअप करत असतील त्या स्त्रियांच्या सौंदर्याला स्त्रीवादाने पितृसत्तेची साधन मानले जात होते. 

असो पण नंतर युद्ध संपले होतेतरीही लाल लिपस्टिक स्त्रियांसाठी एक रिव्होल्यूशनरी सिम्बॉल म्हणून ऍक्टिव्ह होती. अर्थात, लाल लिपस्टिक फार मोठे युद्ध करू शकली नसली तरीही काही प्रमाणात का होईना क्रांतीचे प्रतीक बनली होती. 

 

English Summary: According to Fedler, Adolf Hitler “famously hated red lipstick.” Madeleine Marsh, author of Compacts and Cosmetics explained“The Aryan ideal was a pure, un-scrubbed face. [Lady] visitors to Hitler’s country retreat were actually given a little list of things they must not do: Avoid excessive cosmetics, avoid red lipstick, and on no account ever [were] they to color their nails.

Web title: women used red lipstick to oppose Hitler.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.