जयसूर्या पॉन्टिंगच्या बॅटमधल्या स्प्रिंगा राहिल्या बाजूला, नाइकीच्या बुटावरुन वाद रंगलाय

तुम्हाला १९९६ चा क्रिकेट वर्ल्ड आठवतो का? सगळ्या क्रिकेट फॅन्समध्ये एकच चर्चा होती, ती म्हणजे पहिल्या १०-१५ ओव्हर्समध्ये समोरच्या टीमचा बाजार उठवणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची. जयसूर्याची हाणामारी इतकी वाढीव असायची, की अफवा उठली जयसूर्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे. आजही त्या पिढीतल्या पोरा-पोरींचा या अफवेवर विश्वास आहेच.

जयसूर्या झाल्यावर ही अफवा आणखी एका प्लेअरबद्दल उठली, २००३ मध्ये. सगळ्या स्पर्धेत लय वाढीव खेळून भारतानं फायनल गाठली. तिकडं आपली गाठ पडली, बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. त्यांचा कॅप्टन रिकी पॉंटिंगनं आपल्याला लय हाणलं आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप घेऊन गेली. पुढचा सगळा आठवडा फक्त एकच चर्चा होती, पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे, त्याची बॅट चेक केली जाणार आणि वर्ल्डकप फायनल परत एकदा होणार.

आता या दोघांच्या बॅटमधल्या स्प्रिंगची सध्या आठवण येण्याचं कारण म्हणजे नाईकीचे बूट आणि केनियाचा धावपटू एल्यूड किपचोग.

नक्की काय विषय झालाय?

तर दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये एक मॅरेथॉन स्पर्धा झाली. किपचोगनं ही स्पर्धा १.५९.४० असल्या भारी वेळेत पूर्ण केली. खरंतर दोन तासांच्या आता मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणं म्हणजे एकदम डीप विषय. पण या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे नियम लागू नव्हते. त्यामुळं हा विक्रम नोंदवला गेला नाही. मात्र किपचोगनं एवढा फास्ट स्पीड कसा पकडला यावरुन बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. फिरुन फिरुन विषय आला, किपचोगच्या शूजवर. 

पहिला आरोप झाला, की त्याच्या शूजमध्ये स्प्रिंग आहेत म्हणून हा भिडू एवढा जोरात पळतोय.

आधी ज्याच्याविषयी गप्पा हाणतोय, तो किपचोग कार्यकर्ता कोण आहे हे पाहूयात. एल्यूड किपचोग हा केनियाचा लॉंग डिस्टन्स धावपटू आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भावानं गोल्ड मेडल जिंकलं. याआधी ब्राझीलमध्येही त्यानं गोल्ड मारलं होतं. जगातल्या मेजर मॅरेथॉन बद्दल बोलायचं झालं, तर २०१४ पासून भावानं आठ मॅरेथॉन जिंकल्यात. गडी लय वर्ष झाली, दुसरा आलाच नाहीये. 

थोडक्यात काय, तर नाद करा पण भावाचा कुठं?

आता गडी एवढा भारी पळतोय, म्हणल्यावर शूज भारी घालत असणारच की. किपचोगसाठी फेमस ब्रँड नाईकीनं कस्टम शूज बनवलाय. त्याच्या या शूजला कार्बन प्लेट्स आहेत. जगात भारी कुशनिंग आहेत, प्रेशर रिलीज करता येईल अशी सोय आहे. पण विषय असा झालाय, की याच शूजमुळं वाद पेटलाय.

वाद म्हणलं की कसं वाचायला इंटरेस्ट वाढतोय

केपीचोगच्या या शूजमध्ये कार्बन प्लेट्स आहेत, त्यामुळे त्याचा पळण्याचा स्पीड वाढतो, अशी चर्चा आहे. स्प्रिंग मशीनमुळे मिळेल तशी पॉवर त्याला मिळतिये. हा इतर धावपटूंवर अन्याय आहे, असं म्हणत माजी ऑलिम्पिकपटू रायन हॉल यांनी यावर आक्षेप घेतला. सोशल मीडियावरुनही या विषयावर चर्चा होत होती.

आता जागतिक थलेटिक्सनं या प्रकरणात लक्ष घातलं आणि थेट नियमावलीच काढली. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रत्येक धावपटूला नियमात बसणारे शूजच घालावे लागणार आहेत.

काय असणार नवे नियम-

सगळ्या धावपटूंना सारखी संधी मिळावी म्हणून जगातिक थलेटिक्सनं नवे नियम आखले आहेत. सध्या थलीट जे शूज वापरतात त्यांचा सोल असतो २५ मिलीमीटरचा. पण पॅरिस ऑलिम्पिकनंतर हे सोल २० मिलीमीटरचे असणार आहेत. रेस संपली की धावपटूंचे शूजही चेक करण्यात येणार आहेत.

याआधी जयसूर्या आणि पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग कशी बसणार यावर विचार करण्यात आपण लय रात्री घालवल्या, त्यात आता या किपचोगच्या शूजची भर पडलीये.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.