स्री आणि पुरुषांची लैंगिक ओळख सांगणारी हि चिन्हे नेमकी आली तरी कुठून ?

वरती दिसणारी चिन्हे तुम्ही अनेदा पाहिली असतील. सार्वजनिक शौचालयापासून ते स्त्री आणि पुरूषांच्या संबधांबाबत चर्चा करणाऱ्या अनेक लेखांमध्ये या चिन्हांचा उपयोग केला जातो. हि चिन्ह पाहीली की प्रश्न पडतो तो की यातलं एकही चिन्ह महिला आणि पुरूषांच्या कुठल्याचं अवयवाच्या जवळपास देखील जातं नाही. इतकं की यातलं पुरूषांच चिन्ह कोणतं आणि महिलांच चिन्ह कोणतं ते ओळखणं देखील कष्टांच काम आहे. इतकं कष्टाच की, अनेकांनी आपआपल्या मनाप्रमाणचं या चिन्हांचा अर्थ लावला आहे.

आपल्या हक्काच्या या चिन्हांचा अर्थ समजावा म्हणूनच हा लेख.

जगभरातल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या ग्रीक संस्कृतीनं जगाला दिलेली देणगी म्हणजे ही दोन चिन्हे.

ग्रीक संस्कृती ही भारतीय संस्कृतीच्या जवळपास असणारी संस्कृती म्हणून ओळखली जाते. अनेक प्रतिकं आणि देवता या भारतीय आणि ग्रीक संस्कृतीमध्ये समान असल्याच्या जाणवतात. मुळात ग्रीक संस्कृतीचा पाया देखील गृह तारे आणि त्यांच्या पायावर मांडलेले खगोलशास्त्र होता.

Screen Shot 2018 06 07 at 10.09.09 PM

आज आपण ज्या गृहांना युरेनस, व्हिनस, मार्स, ज्युपिटर या नावांनी ओळखतो अशी नावं गृहांना ग्रीक संस्कृतीत देण्यात आली होती. याचबरोबरीने या गृहांना एका विशिष्ट धांतूबरोबर देखील जोडण्यात आलं होतं. जस की सुर्याला सोन्याबरोबर आणि मंगळ गृहाला लोखंडा बरोबर जोडण्यात आलं. तर शुक्र गृहाला तांब्यासोबत जोडण्यात आलं होतं. याच महत्वाच कारण अस की मंगळ या गृहाला कठोर अशा पुरूषीपणाचं तर शुक्राला मऊ अशा स्त्रीचं प्रतिक मानण्यात आलं होतं.

मंगळ म्हणजेच मार्स ला पुरूषांच प्रतिक आणि व्हिनस अर्थात शुक्राला स्रीचं प्रतिक म्हणून ग्रीक संस्कृतीच्या कलाजीवनात स्थान देण्यात आलं होतं. या दोन गृहानां सांकेतिक चिन्ह देखील देण्यात आलं होतं.

याच चिन्हांमध्ये कालांतराने रुपांतर होतं गेलं. मध्ययुगीन काळात युरोपीयन रसायनशास्त्रज्ञ लीनीयस याने एका झाडाच्या पुरूष व स्त्री अंगाना दाखवण्यासाठी या चिन्हांचा उपयोग केला. कालांतराने हि चिन्हे वापरली जावू लागली व त्यानंतरच्या काळात याच चिन्हांचा जगभर प्रसार झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.