भक्तांनो क्षमस्व ! जग्गनाथ आजारी आहेत !

पुरी जगन्नाथ येथे भरणाऱ्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील मूर्ती आजारी पडते, अशी परंपरा आहे. यावेळी मंदिरातील कुठलेही विधी पार पाडले जात नाहीत. आजारी पडल्यानंतर त्यांची सेवा केली जाते, आजारी माणसाप्रमाणे काळजी घेतली जाते.

दरवर्षी वर्षातील पंधरा दिवस ही आजारपणाची सुट्टी असते.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी १०८ पितळी भांड्यांमधून जगन्नाथ, त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा या कुटुंबियांना आंघोळ घातली जाते. आंघोळीसाठी मंदिरातीलच सोनेरी विहिरीतून पाणी घेतलं जातं. या आंघोळीदरम्यान मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित असतात. या विधीस उपस्थित राहिल्याने पाप धुतली जातात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

या आंघोळीनंतर हे कुटुंब आजारी पडत.

त्यांना ताप येतो आणि मग डॉक्टरकडून त्यांचा इलाज केला जातो. वैद्यकीय उपचारांच्या दरम्यान मंदिरातील सर्व विधी बंद असतात. मंदिरातील घंटा देखील वाजवली जात नाही. कारण त्यामुळे विश्रांतीमध्ये अडथळा येतो, असं मानलं जातं.

झोपण्यापूर्वी शीतल लेप लावण्यात येतो आणि गोड दुध देखील अर्पण करण्यात येतं. रतन वेदी परंपरेनुसार मंदिरातील छोट्याशा खोलीमध्ये वैद्यकीय जातात. रथयात्रेच्या ठीक आदल्या दिवशी या मूर्तींचा आजार ठीक होतो. त्या दिवशी या मूर्ती मंदिरात आणल्या जातात आणि रथयात्रेस सुरुवात होते. आजार ठीक झाल्याच्या आनंदात रथयात्रा भरविण्यात येते. या रथयात्रेस देशभरातून मोठी गर्दी होते.

नेमकं कशासाठी, शरद जोशींनी देशातील एकमेव सीतेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराची जबाबदारी घेतली होती.

 झक मारली आणि महाराष्ट्र भूषण दिला…

रथयात्रेदरम्यान भक्तांना दर्शन दिलं जातं. सगळीकडे भक्त देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात परंतु इथे मात्र स्वतः देव रथावर स्वार होऊन भक्तांना दर्शन देतो.

या रथयात्रेतून जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा मावशीच्या घरी जातात. यालाच जगन्नाथ यात्रा म्हणतात. यावर्षीची रथयात्रेस १४ जुलै रोजी सुरुवात झाली होती.

हे ही वाचा –

उत्तर प्रदेशातील गावात दलित समाजाने बांधलय ‘इंग्लिश देवी’चं मंदिर !!!

या महाराजांना सटरफटर नाव का पडलं ?

छत्रपती शाहू : फक्त महाराज नव्हे तर डॉक्टर पण..!!!

Leave A Reply

Your email address will not be published.