प्रशांत किशोर आता ममता दीदींसाठी कर्नाटक, तेलंगणामधील नाराज नेते शोधत आहेत.

प्रशांत किशोर….कोणी दलाल म्हणतंय तर कोणी चाणक्य.  पण राजकीय जाणकार प्रशांत किशोरांचा  भारताच्या राजकारणातल्या रोलबद्दल सांगताना एक इंटरेस्टिंग लाइन वापरतात ‘YOU CAN HATE HIM OR YOU CAN LOVE HIM BUT YOU CAN’T IGNORE HIM’.  मोदींना केंद्रात बसवण्यापासून सुरवात केलेल्या प्रशांत किशोर यांनी काँग्रेस,समाजवादी पार्टी, द्रमुक, वायएसआर काँग्रेस अशा जवळपास सगळ्याच प्रमुख पक्षांबरोबर काम केलंय.

सध्या ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलसाठी काम करतायत.

बंगालमध्ये ममतांना एक हाती सत्ता मिळवून दिल्यांनतर किशोरांनी आता ममतांना दिल्लीत खुर्ची मिळवून देण्याचं आव्हान घेतलंय.

याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेस गोवा, त्रिपुरा या राज्यांच्या निवूडणुका लढत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतायत.

आता या छोट्या राज्यांनंतर प्रशांत किशोरांनी आपला मोर्चा वळवलाय साऊथ मधल्या कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांवर. इथंही भाऊंचं पाहिलं टार्गेट आहे काँग्रेस. आता काँग्रेसचं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर २०२४ मध्ये मोदींविरोधात ममता अशी निवूडणूक प्रशांत किशोरांना करायची आहे असं उत्तर राजकीय जाणकार देतात. त्रिपुरा,गोवा या राज्यांत प्रशांतभाऊंनी काँग्रेसला जे धक्के दिलेत ते याच रणनीतीचा भाग असल्याचे बोललं जातंय.

आता कर्नाटकात पुन्हा ते हेच करायच्या तयारीत आहे. त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री
सिद्धरामैया, कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष एम. बी. पाटील यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. आता हे नेते मात्र याचा इन्कार करतायत. पण अशा भेटी प्रशांतभाऊंच्या एक फिक्स पॅटर्नचाच एक भाग असल्याचं सांगण्यात येतंय.

 जोपर्यंत नेत्याला पार्टीमधून फोडत नाहीत तोपर्यंत ते त्याची भेट घेतच राहतात असा  आजपर्यंतचा अनुभव असल्याचं पत्रकार सांगतात.

काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतले नाराज नेतेही प्रशांत किशोरांच्या रडारवर असल्याचं सांगितलं जातंय.

आता हे प्रशांत किशोर नाराज नेते शोधतात तरी कसे?

तर यासाठी भाऊ पूर्ण यंत्रणाच कामाला लावत्यात. ही यंत्रणा आहे त्यांच्या ‘आय-पॅक’ या इलेक्शन मॅनेजमेंट कंपनीची. हि कंपनी ग्राउंड वर कोणता नेता नाराज आहे?कोणता पक्षाला नारळ देऊ शकतो याचा अंदाज घेत असते. मग अशी लिस्ट येते प्रशांत भाऊंकडे आणि मग भाऊ करतात एकेकाचा  करेक्ट कार्यक्रम.

भाऊंकडे आलेल्या अशाच लिस्ट मध्ये आहेत भाजपचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा. ज्याप्रकारे येडियुरप्पा यांना घरी बसवलंय त्यामुळं पक्षावर ते चांगलेच नाराज आहेत. प्रशांत किशोरनं त्यांचीसुद्धा भेट घेतली आहे. मात्र इथंही सेम पॅटर्न आहे. येडियुरप्पानी असली कोणतीही भेट झालं नसल्याचं म्हटलंय.

पुढील वर्षभर प्रशांत किशोर जर दोन महिन्यांनी कर्नाटकला भेट देणार आहेत . त्यामुळं काँग्रेस आणि भाजपा  दोन्ही पक्ष पुढील वर्षभर तरी गॅसवर असणार आहेत.

तेलंगणावरही भाऊ लक्ष ठेवून आहेत. नेते फोडण्यामागेही भाऊंचा एक क्रायटेरिया आहे. भाऊंना इन्स्टंट नेते पाहिजे असतात.  

माजी खासदार, माध्यमांमध्ये चर्चेत असणारे नेते , राज्यातील मोठ्या जातीचे नेते यांच्यावर प्रशांत किशोर लक्ष ठेवून असतात.

तेलंगणात त्यांना असाच एक नेता भेटलाय. माजी खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी. 

मागच्या लोकसभा निवूडणुकीत कोंडा शेठ देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उमेदवार होते.

टीआरएस मधून काँग्रेस मध्ये आलेल्या रेड्डी यांनी आता काँग्रेस सदस्यसत्वाचाही राजीनामा दिलाय.  तेलंगणातील विरोधी पक्ष तेलंगणा जनसमितीचे संस्थापक आणि एकेकाळी मुख्यमंत्री केसीआर यांचे निकटवर्तीय असलेले प्रो. कोदंडराम यांनाही  प्रशांतभाऊ तृणमूलमध्ये ओढणाच्या तयारीत आहेत.

आता किती नेत्यांना प्रशांत किशोर फोडतात हे येणाऱ्या काळात कळेलच पण त्यांचा इथून पुढचा  कर्नाटक आणि तेलंगणाचा दौरा खळबळ माजवणारा असणार एवढं नक्की.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.