प्रमोद महाजन एकेकाळी थेट जयललितांना नडले होते

जयललिता

त्यांना तामिळनाडूच्या सर्वेसर्वा म्हंटल तर वावगं ठरू नये. त्यांनी वाजपेयी सरकार मध्ये सामील होऊन वाजपेयींना कसा त्रास दिला होता हे जगजाहीर आहे. त्याचे बरेचसे किस्से ही पुस्तकांमध्ये सापडतील.

जसं की,

जयललिता यांनी पहिल्या दिवसापासूनच अटलबिहारिंना त्रास द्यायला सुरुवात केली होती. ज्या इतर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाही पदच्युत करा अशी मागणी जयललितांनी लावून धरली होती.

आपल्याविरोधातले सगळे खटले मागे घेण्यात यावे आणि तामिळनाडूतील करुणानिधी सरकार बरखास्त करावं, अशी जयललिता यांची मागणी होती. इतकंच नाही तर सुब्रमण्यम स्वामी यांना अर्थमंत्री करावं, अशीही त्यांची मागणी होती. मात्र, वाजपेयींनी यापैकी कुठलीही मागणी मान्य केली नाही हे विशेष.

पण याचं जयललितांच भाजपच्या प्रमोद महाजन यांच्याशी वाजलं होत हे तितकंसं कुठं सापडत नाही, म्हणूनच हा किस्सा.

त्याकाळात कोणतंही कारण काढून जयललिता वाजपेयी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेऊ म्हणून तंबी द्यायच्या. या तंब्याना वैतागून भाजप नेते प्रमोद महाजन हे जयललिता यांचे प्रतिस्पर्धी डीएमके या पक्षाकडे पाठिंबा मागण्यासाठी गेले होते.

यातूनच एक डाव खेळला गेला. तो म्हणजे कार्यवाही अभियानाचे अध्यक्ष एम. के. बेझबारूआ, अर्थ सचिव मॉंटेकसिंग अहलुवालिया, महसूल सचिव एन. के. सिंग आणि अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

त्यावेळी बेझबारूआ हे फेरा कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी होते. आणि टाइम्स ग्रुपची तेव्हा सीबीआय मार्फत चौकशी सुरू होती. आणि याचंमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात असं जयललितांच म्हणणं होतं.

या अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्या स्थगित करण्यात याव्यात अशी जयललिता यांची मागणी होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी परदेश दौऱ्यावर होते. त्यामुळे मुख्य सचिव ब्रजेश मिश्रा यांनी स्वतः या रस्सीखेचीत मध्यस्थी करणं भाग पडलं.

जयललितांच म्हणणं होतं की,

तमिळनाडूमधील शक्तिशाली बातमी संस्थेनं (टाइम्स) बेझबारूआ यांच्या बदलीसाठी प्यादी हलवली होती. जयललिता तसा लेखी आरोप, प्रमोद महाजनांच्या नावानिशी करू शकत नव्हत्या. तसं पत्रात म्हंटलच होत.

आपल्या पत्राला वाजपेयी कडून उत्तर येईल अशी जयललिता यांची अपेक्षा होती. परंतु ब्रजेश मिश्रा यांनी उत्तर पाठवल्यामुळे त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका पक्ष कार्यकर्त्यांच्या हस्ते उत्तर धाडलं आणि अशी प्यादी हलवली याचा पुरावा पाठवून दिला.

त्यात त्यांनी टाइम्सच्या जैन यांना प्रमोद महाजन भेटले होते आणि त्यामधून बेझबारूआंची बदली झाली हा आक्षेप घेतला. पंतप्रधानांशी त्यांची असलेली जवळीक, त्यात खुद्द वाजपेयी- जैन सलोख्याचे संबंध हेही येथे उपयोगी पडले असतील असा जयललितांचा होरा होता.

या दुसऱ्या पत्राचा परिणाम प्रमोद महाजन यांनी जयललिताला यांना उघड आव्हान दिले.

जयलालितांनी केलेल्या आरोपाप्रमाणे, दोघांच्यांत केवळ भेटाभेटी झाली की व्यवहार झाला हे जयललिताने सिद्ध करायचे होतं. प्रमोद महाजन यांनी वार्ताहर परिषदेत भेट झाल्याचे मान्यच केल होत.

‘राजकारणात फेरा कायद्याचे ज्यांनी उल्लंघन केले आहे ते तुम्हांला भेटावयास येतात किंवा तुम्ही त्यांना भेटायला जाता’ असे उद्गार प्रमोद महाजन यांनी काढले. टाइम्सनेच प्रमोद महाजनांच्या बातमीला अग्रस्थान दिले. यावरून दोघांची भेट सिद्ध तर होतेच, आणि ती फेरा प्रकरणाबाबत होती हेही स्पष्ट झालं.

बेझबारूआंची बदली करण्यापूर्वी अण्णा द्रमुकच्या मंत्र्याची संमती घेतली नाही, अण्णा द्रमुकचे मंत्री या बदल्यांच्या खात्याशी संबंधित होते. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या निर्णयात असे घडावे हे बरोबर नाही. जयललितांसारख्या करामती शोधणाऱ्या स्त्रीला हे पुरेसे झाले.

या सर्व प्रकरणात बेझबारूआंची बदली प्रमोद महाजनांमुळे झाली. त्यामुळे वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी जयललिता यांना अजून एक कारण सापडलं होत.

 

WebTitle: BJP Leader Pramod Mahajan and tamilnadu’s chief minister Jaylalita rivalry

Leave A Reply

Your email address will not be published.