‘जन-गण-मन’ सुरु होतं तरी गांधीजी बसून होते

‘जन -गण-मन’ आपल्या देशाचं राष्ट्रगीत. ज्याची साधी म्युझिक जरी कानावर पडली तरी प्रत्येक भारतीय अभिमानाने आणि आपलं कर्तव्य म्हणून ताडकन आहे त्या जागेवर उभा राहतो. पण तसा नियमही आहे आपल्यात. ज्यानुसार, जर कोणी राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहील नाही, तर तो  अपमान समजला जाईल आणि त्यावर कारवाई केली जाते. 

आपण बघतो कि बऱ्याचदा राष्ट्रगीताचा अपमान केला म्हणून अनेक नेत्यांना, दिग्गजांना ट्रोल केलं जात नाही तर त्यातून नवा वाद तरी सुरु होतो. पण तुम्हाला माहितेय स्वतः राष्ट्रपिता महात्मा गांधी हे राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहिले नव्हते. 

आता हा किस्सा सांगण्याच्या आधी आपण थोडं सुरुवातीपासून पाहुयात. तर नोंदीनुसार रवींद्रनाथ टागोर यांनी १९०८ च्या दरम्यान या कवितेचा पहिला ड्राफ्ट तयार केला होता. जो बंगाली भाषेत होता. पुढे ती ‘भारत भाग्य विधाता’ या नावाने कविता म्हणून तत्त्वबोधिनी नावाच्या एका मॅगझीनमध्ये पहिल्यांदाच छापली गेली.

ते पहिल्यांदा गायलं गेलं एका शाळेत  यानंतर २७ डिसेंबर १९११ च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पहिल्यांदा अधिकृतपणे गायले गेले.  त्यावेळी जॉर्ज  पंचम राजा झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतभेटीवर आला होता. बंगालची फाळणी संपवून ओरिसा हे वेगळे राज्य तयार करण्याच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिलेली. याच कारणामुळे काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांचे स्वागत आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

आता जस कि आधीच सांगितलं अधिवेशनात भारत भाग्य विधाता गायलं गेलं, पण राष्ट्रगीत म्हणून नाही तर देवाची प्रार्थना म्हणून. जर दुसऱ्या दिवशी अशी अफवा पेटली कि, रवींद्रनाथ टागोर यांनी ही कविता ब्रिटिश राजाच्या सन्मानार्थचं लिहिली होती. त्यावेळी ट्रोलिंग तर झालचं, पण यावर टागोरांना दोन वेळा स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं कि, 

‘जॉर्ज चौथा असो नाहीतर पाचवा, मी त्याच्याबद्दल कशाला लिहू? हा देश स्वतः आपला भाग्य विधाता आहे. त्यामुळे अश्या प्रश्नाचे उत्तर देणं सुद्धा माझा अपमान आहे.

पुढे १९४२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी युरोपमध्ये फ्री इंडिया सेंटरचे उद्घाटन करताना  काँग्रेसचा तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आणि जन मन गण हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून घोषित केले.आणि त्याचाच मान ठेवून काँग्रेसने १९५० मध्ये संविधान सभेचे काम पूर्ण झाल्यावर सगळ्यांच्या सहमतीने जन गण मनाला राष्ट्रगीताचा दर्जा दिला.

यानंतर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होणार होता. महत्वाचं म्हणजे संविधान लागू होणार होत. आणि याच मुहूर्तावर राष्ट्रगीत सुद्धा अधिकृतरीत्या घोषित होणार होत. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या दोन दिवस आधीच तयारीला लागले. राष्ट्रगीताला म्युझिक देण्यासाठी ते हर्बर्ट म्युरिल या त्या काळातील तज्ञ आणि प्रसिद्ध संगीतकाराला भेट दिली.  नेहरूंनी हर्बर्टला राष्ट्रगीत ऐकवलं आणि त्याच्या म्युझिकवर त्यांचं मत मांडायला सांगितलं.

म्युरिल यांनी हे थोडे स्लो असल्याचं म्हणतं, नेहरूंच्या परवानगीनेच फ्रेंच राष्ट्रीय गीत ‘ला मार्सिले’ च्या धर्तीवर त्याचा थोडा टेम्पो वाढवला. हा आता त्यात पुढे बदल होत गेले.

या दरम्यान, हिंदू-मुस्लिम दंगली पेटलेल्या, ज्या थांबवण्यासाठी गांधी कोलकात्याला पोहोचले होते. त्यावर चर्चा म्हणून महात्मा गांधी यांनी एक सभा बोलावली. ज्यात हिंदू मुस्लिम नेते उपस्थित होते. चर्चा सुरु होती, गांधीजी आमरण उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यांचं म्हणणं होत होत कि, एकतर दंगली तरी शांत होतील नाहीतर मी मरेन तरी. दोनपैकी एकच काहीतरी होईल. 

नंतर सभा संपली, आणि आपल्या प्रथेप्रमाणे सभा संपल्यावर शेवटी राष्ट्रगीत गायलं जात. राष्ट्रगीत सुरु झालं, सगळेच नेते उभे राहिले. पण गांधीजी मात्र बसूनच राहिले. सगळेजण उभे होते, पण मनातल्या मनात गांधींनी असं का केलं याचाच विचार करत होते. पण डायरेक्ट बोलण्याची कोणाची हिम्मत.

शेवटी राष्ट्रगीत संपल्यावर लोकांनी विचारले, ‘बापू, तुम्ही राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहिले नाहीत?.

तेव्हा गांधीजींनी थोड्या वेळ शांत राहून उत्तर दिल, ‘आमच्याकडे आदर देण्यासाठी उभं राहण्याची प्रथा नाही. या युरोपियांची पद्धत आहे.

आता असं नाही कि, गांधीजींनी राष्ट्रगीताचा अपमान केला. पण त्यांचं स्पष्ट मत होत कि, राष्ट्रगीत हे देशाचं प्रतीक आहे, जे तिथल्या लोकांपासून बनलेलं आहे. आणि आपल्या लोकांची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही पद्धतीबद्दल आपल्याला निष्ठा नसेल तर काही उपयोग नाही. 

त्यांच्या या मतावर पुढे कोणी काही बोललं नाही, कारण गांधीजींच्या बद्दल सगळ्यांनाच आदर होता.

हे ही वाच भिडू :

Webtitle : Mahatma gandhi : Gandhiji was sitting even though jana-gana-man-was starting

Leave A Reply

Your email address will not be published.