नानासाहेब पेशव्यांच्या मुस्लिम कारभाऱ्याने भारताचं पहिलं राष्ट्रगीत लिहिलं..

अज़ीमुल्ला ख़ान हा माणूस आज आपल्या ओळखीत नाही. बाकीच्या कितीक लोकांना आपण ओळखतो. पण मराठा सत्तेसाठी लंडनपर्यंत जाऊन धडक मारणाऱ्या या माणसाला आज देश विसरला आहे.

त्याहून महत्त्वाचं म्हणजे या माणसानं आपल्या देशाचं पहिलं वाहिलं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे.

शरलॉक होम्स हे पात्र लिहिणार माणूस म्हणजे सर ऑर्थर कानन डायल. या माणसाच्या चुलत्याने म्हणजे रिचर्ड डायल यांनी अजीमुल्ला खान याचं चित्र काढलं होतं.

सध्या त्यांचं उपलब्ध असलेलं सर्वात विश्वासार्ह चित्र हेच आहे. हे चित्र त्यांनी लंडनमध्ये असताना बनवलं होतं.

हा मुसलमान माणूस कोणत्या कामासाठी लंडनला गेला असेल?

अजून भारतात कंपनी सरकारच्याच अखत्यारीत सर्व खाती होती. त्या काळात इंग्लंडला जाणे ही भारतीयांसाठी फार दुर्मिळ गोष्ट होती.

अजीमुल्ला हे त्याकाळी नानासाहेब पेशवे यांचे दिवाण म्हणून काम बघत होते. कारभारी या नात्याने हिशोबाची सर्व खाती त्यांच्याकडे होती. त्यात काही बिघाड होऊ नये म्हणून ते काटेकोर होते.

नानासाहेब पेशवे यांची पेन्शन कंपनी सरकारने थकवली होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कोणत्याही अधिकाऱ्याने यात हस्तक्षेप केला नाही.

म्हणून मराठ्यांचा पक्ष लढवण्यासाठी हा माणूस थेट लंडनला जाऊन पोहोचला होता.

या काळात इंग्लंडला जाणाऱ्या बोटावर मोजता येतील अशा काही लोकांमध्ये अजीमुल्ला यांचा समावेश होता. लँडला जाऊन त्यांना तात्यांची पेन्शन सुरू करण्यात अपयश आले. पण तेथे त्यांना त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाची गोष्ट मिळाली – ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा ध्यास.

तात्या टोपे यांच्याप्रमाणेच त्यांनीही हातातून इंग्रजांना हाकलून लावण्याची योजना बनवली जर त्यांची योजना प्रत्यक्षात उतरली असती तर आज भारताचा इतिहास आणि भूगोल कदाचित फार वेगळा झाला असता पण ती योजना साकार होऊ शकली नाही. काळाच्या ओघात आपणही अजीमुल्लाखान यांचे नाव विसरलो आहोत पण याच माणसाने भारताचं पहिलं राष्ट्रगीत सुद्धा लिहिलं आहे. या राष्ट्रगीतामधून भारताच्या आहे का त्याची आणि भारताच्या अखंड त्याची प्रेरणा मिळते. मुस्लिम समाज तेव्हापासूनच भारताची किती एकनिष्ठ होता आणि हिंदुस्तान ला आपली पुण्यभूमी मानत होता याचे प्रतीक म्हणजे त्यांचे हे राष्ट्रगीत आहे.

कुणालाही सारे जहासे अच्छा या गीताची आठवण यावी इतक्या स्पष्ट भाषेत त्यांनी हे राष्ट्रगीत लिहिले आहे

अजीमुल्लाखान यांचा जन्म सन १७ सप्टेंबर १८३० मध्ये कानपूर शहरांमध्ये झाला. कानपूर शहराजवळ इंग्रजांची मोठी छावणी होती. त्याच्याजवळच एक मोठे परेड मैदान म्हणून ओळखले जाणारे सैन्याच्या संचलनाचे मैदान होते.

येथील एक छोटेसे गाव म्हणजे पटकापूर. या गावातच अजीमुल्लाखान यांचे वडील नजीब हे मोलमजुरी करायचे.

एका कष्टकरी कुटुंबात असल्याने अजीमुल्लाखान यांना लहानपणापासूनच श्रमाची आणि अंगमेहनतीची ओळख झाली. घरांमध्ये अठराविश्वे दारिद्र्य होते. कुटुंबाला सतत प्रचंड गरिबीचा आणि भुकेचा सामना करावा लागत होता.

इंग्रजांची छावणी त्यांच्या घराला लागूनच होती. त्यामुळे इंग्रजांच्या बऱ्या वाईट गोष्टी त्यांना आपोआपच समजून आल्या. सामान्य जनतेशी इंग्रज अतिशय वाईट प्रकारचा व्यवहार करायचे. त्याच्याशी अजीमुल्लाखान यांचा चांगला परिचय होता.

म्हणूनच नंतरच्या लढाईत आपला पक्ष निवडताना त्यांना कुठलीही अडचण आली नाही.

एकदा अजीमुल्लाखान यांच्या वडिलांना एका इंग्रज अधिकाऱ्याने घोड्यांची पागा साफ करण्याचा आदेश दिला होता. यावर नकार दिल्यानंतर अजीमुल्लाखान यांच्या वडिलांना या इंग्रज अधिकाऱ्याने चक्क छतावरून खाली फेकून दिले. तरीही नंतर ते जिवंत राहिले म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये वीट फेकून मारली.

यामुळे त्यांचे वडील सहा महिने झोपूनच होते. घरात खायला आणणारा एकमेव माणूस अंथरुणाला खिळल्याने घरात खाण्यापिण्याचीही दैना उडाली.

आठ वर्षाचे असतानाच लहानग्या अजीमुल्लाखान यांना दुसऱ्यांच्या घरी कामे करण्यासाठी गडी म्हणून जावे लागले.

पण माणसाला त्याचे नशीब कुठे नेते बघा. त्यांचे एक शेजारी माणिकचंद यांनी या परिवाराची परिस्थिती ओळखली. त्यांच्या ओळखीचा एक इंग्रज अधिकारी हीलर्सडन याच्या घरी साफसफाईच्या कामासाठी नेमून दिले. दोन वर्षातच त्यांची आई सुद्धा वारली. त्यामुळे आता अजीमुल्लाखान हे आपले घर सोडून या इंग्रज अधिकाऱ्याच्या घरात राहायला लागले.

सुदैवाने हा इंग्रज अधिकारी आणि त्याची पत्नी ही चांगली माणसे होती. त्यांनी अजीमुल्ला यांना आपल्या नोकऱ्या प्रमाणे न वागवता घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे वागणूक द्यायला सुरुवात केली. घरकाम करता करताच अजीमुल्लाखान यांनी अभ्यासातही रस दाखवला. घरातील लहान मुलांकडून ते फ्रेंच आणि इंग्रजी भाषा शिकू लागले.

याच्यानंतर या इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांनी शाळेतही आपले नाव नोंदवले. केवळ अपघातानेच त्यांना ही संधी मिळाली होती. पण अजीमुल्लाखान यांनी या संधीचे सोने केले.

आपले शालेय शिक्षण त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. एका अतिशय गरीब घरातील मुलगा एकोणिसाव्या शतकात इंग्रजी भाषा शिकवणारा अध्यापक बनला. ही त्या काळात फार मोठी गोष्ट होती.

ते जिथे नोकरी करायचे तिथे इतर बहुतांश शिक्षक हे ब्राह्मण होते. त्यामुळे तेथे असताना त्यांनी उर्दू आणि संस्कृत या भाषांचा खोलवर अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी इतिहास या विषयाचाही चांगला अभ्यास केला.

देशातील सध्याचे राजकीय वातावरण कसे आहेत याची त्यांनी माहिती घेतली. भारताची अर्थव्यवस्था जुन्या काळात नेमकी कशी होती, इंग्रज आल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत काय परिणाम झाले, सध्याच्या शासनाने कोणत्या तरतुदी करून शेतकऱ्यांना नाडले आहे याचा चांगला परिचय त्यांना या काळात झाला.

भारत देशाचा उज्वल इतिहास त्यांना समजला. इंग्रज येण्यापूर्वी भारत देशात अतिशय मोठी सुबत्ता होती पण नंतरच्या काळात इंग्रजांच्या धोरणामुळे भारतात इतकी प्रचंड दयनीय अवस्था झाली. या गोष्टीचे भान आल्यानंतर त्यांचे मन पेटून उठले.

अज़ीमुल्लाह ख़ाँ यांच्यासोबत कानपूर शहरामध्ये अनेक मोठमोठे कवी आणि अभ्यासक राहायचे. यापैकी मौलवी निसार अहमद आणि पंडित गजानन मिश्र ही नावे मोठी प्रसिद्ध होती.

हे सर्व लोक एकत्र येऊन भारत देशासंदर्भात अनेक चर्चा करत. कानपूरमध्ये त्यांचे नाव विद्वानांमध्ये घेतले जाऊ लागले होते. तसेही शहरात इंग्रजी येणारे अनेक असे लोक होते.

पण स्वतः इंग्रजी येत असूनही फक्त इंग्रजांची गुलामी न करता राष्ट्रभक्तीची चाड असणारा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती. त्यामुळे त्यांची किर्ती कानपुर जवळ राहणाऱ्या नानासाहेब पेशवे यांच्यापर्यंत पोहोचली.

नानासाहेब पेशवे हा दुसर्‍या बाजीरावचा दत्तकपुत्र होता. आधीच इंग्रज सरकार दत्तक विधान नाकारून अनेक संस्थाने आपल्या राज्यात विलीन करू पाहत होती.

त्यामुळे नानासाहेब यांना सरकारने पेन्शन द्यायला नकार दिला. ही पेन्शन तेव्हा आठ लाख रुपये दर वर्ष इतकी होती. बिठूर या गावांमध्ये नानासाहेब यांचा मुक्काम होता.

इंग्रज अधिकारी गवर्नर-जनरल लॉर्ड डलहौज़ी याने नानासाहेब पेशवे यांची कोणतीच गोष्ट ऐकायला स्पष्ट शब्दात नकार दिला. भारतातील एकेक इंग्रज अधिकार्‍याचे दफ्तर फिरून पेशवे हैराण झाले होते. राजधानीमधील कित्येक लोकांशी संपर्क करूनही काही उपयोग झाला नाही.

तेव्हा नानासाहेब पेशवे यांच्या कानावर खान यांची ख्याती आली हा माणूस आपल्याला मदत करू शकतो म्हणून त्यांनी अमीनूल्ला खान यांना बोलावून घेतले. या भेटीचा पेशव्यावर अजून मोठा परिणाम झाला म्हणून

त्यांनी अमानुल्ला खान यांची नेमणूक थेट आपल्या राज्याचा दिवाण म्हणून केली.

या पदावर काम करताना आम्ही उल्ला खान यांना देशाच्या राजकारणात थेट भाग घेत आला. आपल्या या कार्यकाळात ते युद्ध कलेचा अभ्यास करण्यात व्यग्र झाले.
त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि थेट युद्धाचा प्रचंड अभ्यास केला. या सर्व गोष्टींमध्ये ते पारंगत झाले.

इंग्लंडमध्ये असताना त्यांची ओळख रंगो बापू यांच्याशी झाली. बापूसाहेब हे साताऱ्याच्या गादीचे काम पाहत होते, उल्ला खान यांच्याप्रमाणेच सातारच्या गादी साठी ही वाद सुरू होता. हा वाद लंडन पर्यंत पोहोचला होता साताऱ्याच्या गादी ने केलेला दावा ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टरस ने पूर्णपणे खोडून काढला.

यावरूनच अजीमुल्लाखान यांना आपल्या खटल्यासंदर्भात काय होणार याचा पूर्ण अंदाज आला होता.

जरी ते पूर्ण तयारी करून इंग्लंडमध्ये गेले होते तरीही पेन्शन देणे हे इंग्रजांच्या मनातच नव्हते म्हणून आपल्याला इथे कागदे फडकावून काहीच होणार नाही यासाठी इंग्रजांशी थेट लढावे लागेल असा विचार त्यांच्या मनात पक्का झाला

रंगो बापू हेदेखील या विषयात त्यांच्याशी सहमत होते. मराठी सत्ता त्यांच्या पाठीमागे उभी राहील असा विश्वास त्यांना होता. हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून इंग्रजांसोबत लढायचे अशी योजना करूनच ते भारतात परत आले.

अजीमुल्ला खाँ यांनी भारतात येण्यापूर्वी युरोपातील अनेक देशांचा दौरा केला. तेथे राहून युरोपचा राजकारणावर त्यांनी अभ्यास केला. तेथील एकूण आर्थिक व्यवहारांचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतालाही युरोपच्या देशांसारखे नव्या वाटेवर कसे नेता येईल या संदर्भात त्यांचे म्हणून चिंतन सुरू होते. या गोष्टी नीट समजून घेण्यासाठीच ते माल्टा या गावी जाऊन पोहोचले. माल्टा येथे त्यावेळी प्रचंड मोठे युद्ध सुरू होते . इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या विरुद्ध रशिया लढत होता. पण त्या दोघांनी एकत्र लढूनही रशियाच्या विरोधात इंग्रज सैन्य पराभव स्वीकारत होते.

ब्रिटिश भारतात दाखवतात ते तेवढे हुशार आणि शूरवीर नाहीत हे त्यांना समजून चुकले.

1857 साली भारतात जो सैनिकांचा प्रचंड उठाव झाला त्यामागे सर्व नियोजन हे अजीमुल्लाखान यांचे होते.

सैन्याची संपुर्ण संरचना त्यांनीच केली होती ते युरोप मध्ये असताना रशिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये प्रचंड युद्ध सुरू होते.

असं म्हणतात की अजीमुल्लाखान यांनी रशियाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रजांविरुद्ध लढण्यास रशियाच्या झार राजाकडून काही मदत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. भारतात परतताच त्यांनी 1857 चा क्रांतिकारी उठाव करण्याची तयारी सुरू केली.

देशातील विविध लोकांना व संस्थांना उठावाची माहिती देण्यात आली. अनेक लोकांच्या सहभागासाठी त्यांना निमंत्रणे देण्यात आली.

टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांना योजना आखण्यात अजीमुल्लाखान यांनी मोलाची मदत केली. सैन्याची सगळी रणनीती ही त्यांच्या खांद्यावर सोपवली होती. या लढाईत ते स्वतः देखील उतरले. आपल्या शौर्याचा परिचय त्यांनी या युद्धामध्ये दिला.

या लढाईत त्यांना वीरमरण आले. कानपूर जवळ अहीराणा या गावाजवळ त्यांचा मृत्यू झाला.

काही लोकांच्या मते नानासाहेब पेशवे बरोबर ते नेपाळला गेले होते. तेथेच त्यांचा आजारपणाने मृत्यू झाला असेही म्हणतात. या अनुसार त्यांच्या मृत्यूची तारीख 1859 सांगितली जाते. या वेळी त्यांचे वय 39 वर्षे एवढे होते.

इंग्रजी कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव आरोपींच्या यादीत फार वरच्या क्रमांकावर लिहिलेले होते त्यांना इंग्रजांनी एका कागदामध्ये भारताच्या इतिहासातील सर्वात हुशार आणि तितकेच क्रूर म्हणून उल्लेख केला आहे.

अज़ीमुल्ला खाँ यांनी भारत देशाचे राष्ट्रगीत लिहीले –

‘हम हैं इसके मालिक, हिंदुस्तान हमारा!
पाक वतन है कौम का, जन्नत से भी प्यारा!‘

अठराशे सत्तावन्नच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे गीत अनेक ठिकाणी गायले गेले. त्या काळात बंड करणाऱ्या सैनिकांनी एक वृत्तपत्र सुरू केले होते याचे नाव होते ‘पयामे-आज़ादी’! या गाण्याने भारतातील लोकांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली.

भारताचे हे राष्ट्रगीत खास बोल भिडूच्या वाचकांसाठी:

हम है इसके मालिक, हिन्दुस्तान हमारा,
पाक वतन है कौम का, जन्नत से भी प्यारा!
(पाक म्हणजे पवित्र)

ये है हमारी मिल्कियत, हिन्दुस्तान हमारा,
इसकी रूहानियत से, रौशन है जग सारा!
(रूहानियत- अध्यात्म)

कितना कदीम कितना नईम! सब दुनिया से न्यारा…
करती है जरखेज़ जिसे, गंगो-जमन की धारा!

ऊपर बर्फ़ीला पर्वत, पहरेदार हमारा,
नीचे साहिल पर बजता, सागर का नकारा!

इसकी खानें उगल रही, सोना, हीरा, पारा,
इसकी शानो शौकत का, दुनिया में जयकारा!

आया फ़िरंगी दूर से, ऐसा मन्तर मारा,
लूटा दोनों हाथ से, प्यारा वतन हमारा!

आज शहीदों ने है तुमको, अहले वतन पुकारा,
तोड़ो गुलामी की जंजीरें, बरसाओ अंगारा!

हिन्दू, मुसलमां, सिख हमारा भाई-भाई प्यारा,
ये है आजादी का झन्डा, इसे सलाम हमारा!

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Abhay Tambe says

    Bhidu,ajimulla khan chi mahiti mast,actually all your content is awesome, kindly correct date of birth of Ajimulla khan

    Thanks

Leave A Reply

Your email address will not be published.