राष्ट्रगीत घोषित होण्याआधी जन-गण-मन एका कॉलेजची सकाळची प्रार्थना होती…

आज भारत आपला ७५ वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या स्वातंत्र्यदिनी अख्ख्या देशात उत्साहाचं वातावरण , आणि असणारचं भिडू. शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षांनंतर हे स्वातंत्र मिळालं होत. महत्वाचं म्हणजे यावर्षीचा स्वातंत्र्य दिन ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्ह्णून साजरा केलं जाणार आहे.

आता स्वातंत्र्यदिन म्हंटल कि, आकाशात अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि त्या तिरंग्याकडं पाहून तोंडातून आपसूकचं निघालेले राष्ट्रगीताचे बोल. हे राष्ट्रगीत कानी पडताच हर एक भारतीय सन्मानाने उभा राहतो. यामागचं कारणही तसंच आहे.

देशाच्या स्वातंत्र्याप्रमाणे या राष्ट्रगीताचा सुद्धा स्वतःचा इतिहास आहे.

तर २७ जानेवारी १९११ रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात ‘जन-मन-गण अधिनायक जय हे’ गायले गेले होते. नोबेल पुरस्कार विजेते आणि राष्ट्रगीताचे लेखक रवींद्रनाथ टागोर यांची भाची सरला यांनी हे पहिल्यांदा गायले होते. सरला यांनी शालेय मुलांसोबत बंगाली आणि हिंदी भाषेत हे गाणे गायले.

याच वर्षी रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत रचले होते. टागोरांनी हे राष्ट्रगीत आधी बंगालीमध्ये लिहिलं होत, नंतर सुभाषचंद्र बोस यांच्या विनंतीवरून आबिद अली यांनी ते हिंदी आणि उर्दूमध्ये रुपांतरित केले. ज्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान सभेत हे राष्ट्रगीत म्ह्णून घोषित करण्यात आले.

दरम्यान, ‘जन-गण-मन’ हे आपलं राष्ट्रगीत म्ह्णून घोषित होण्याच्या कित्येक वर्ष आधीच हे गीत गायलं गेलं होत. १९४४ च्या ‘हमराही’ या चित्रपटात याचा पहिल्यांदा वापर केला गेला होता. रवींद्रनाथ टागोरांनी १९१९ मध्ये आंध्र प्रदेशातील बेसंट थिओसॉफिकल कॉलेजमध्ये हे गायले होते. यानंतर बेझंट थिओसॉफिकल कॉलेजच्या प्रशासनाने ती कॉलेजची सकाळची प्रार्थना म्हणून स्वीकारली.

स्वातंत्र्यानंतर, राष्ट्रगीत घोषित होण्यापूर्वी जन गण मन हे देहरादूनच्या द दून स्कूलमध्ये अधिकृत गीत बनवले गेले होते.

राष्ट्रगीत गातानाची चूक पडू शकते महागात 

फार कमी लोकांना माहिती असेल कि, राष्ट्रगीत गाण्याचेही काही नियम आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रगीत फक्त ५२ सेकंदात गायले पाहिजे. त्याच वेळी, त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या ओळी गाण्यासाठी २० सेकंद लागतात. जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

तसेच, जेव्हा जेव्हा राष्ट्रगीत वाजवले जाते, तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की जर तो कुठेतरी बसला असेल तर त्या ठिकाणी  सावध पवित्रामध्ये उभे राहायचे. यासह नागरिकांनी राष्ट्रगीताची पुनरावृत्ती करणेही अपेक्षित आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर, १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री पहिल्यांदा संविधान सभेची सांगता या राष्ट्रगीताने झाली. त्याच वेळी, १९४७ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारतीय शिष्टमंडळाकडून राष्ट्रगीताबद्दल माहिती मागितली गेली, त्यानंतर जन-गण-मनचे रेकॉर्डिंग महासभेला देण्यात आले.

या संपूर्ण राष्ट्रगीतात संस्कृतकृत बंगाली भाषेतील ५ श्लोक आहेत जे भारताची संस्कृती, मूल्ये आणि स्वातंत्र्य संग्राम प्रतिबिंबित करतात आणि १९०५ मध्ये तत्त्वबोधिनी पत्रिकेत पहिल्यांदा हे राष्ट्रगीत प्रकाशित झाले होते.

राष्ट्रगीताचा ‘भारतो भाग्यो बिधाता’ हा पहिला श्लोक २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेने अधिकृतपणे भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला आणि ११ सप्टेंबर १९४२ रोजी जर्मनीच्या हॅम्बर्ग येथे प्रथम सादर करण्यात आला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.