क्रिकेट खेळणारे खूप असतात, खेळाला वळण लावणारा भिडू म्हणजे विराट कोहली…

नेपोलियन रेखाटायचा असेल तर तुमच्या आत थोडा नेपोलियन असावा लागतो –  जॉर्ज बर्नार्ड शॉ.

कोहली तसाच आहे. बालपणात खडे रुतलेली माणसे आयुष्यभर लंगडत चालतात. कोहलीच्या टिनएजमध्ये ऑस्ट्रेलिया टीम काय होती याचा कोहलीचा खेळाडू आणि लीडर म्हणून घडण्यामध्ये मोठा वाटा आहे. अंडर-१९ पासून तो चर्चेत होता. त्या वर्ल्डकपमध्ये संत केन विल्यमसन यांना त्यानेच बाद केले होते. वडलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी नाबाद ९० प्लस धावा देऊन दिल्लीसाठी सामना वाचवला इथूनच त्याची कमिटमेंट लक्षात आली.

सुरुवातीला एक नवा खेळाडू चांगला बॅट्समन आहे असेच वाटत राहिले. हे खूप वेगळे रसायन आहे हे होबर्टमध्ये कॉमनवेल्थ बँक सीरिज मध्ये कळले. मलिंगाच्या एकाच ओव्हर मध्ये २४ धावा कुटल्या. अँड अ स्टार इज बॉर्न.

२०१२-१३ च्या आयपीएल नंतर एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. त्याने आपला फिटनेस वेगळ्याच लेव्हलला नेला. एका वेल ट्राय आणि कॅच यातला फरक सांगताना तो तीन दिवस आधी झोप किती घेतली याला जबाबदार ठरवतो तेव्हा त्याची खेळाप्रतीची टोकाची कमिटमेंट दिसून येते. ही कमिटमेंट पूर्वी सचिनमध्ये, द्रविडमध्ये दिसून आली होती. सचिन जेव्हा सिंगल घ्यायचा तेव्हा लहान मुलासारखा इगरनेस त्यात असायचा.

 बिशन सिंग बेदी ज्याला जूनून आणि सुकून म्हणतो तो कोहली मध्येच दिसतो. 

वेड्यासारखे कष्ट करत राहायचे आणि त्यातच मनःशांती मिळवायची हे त्याचे वैशिष्ट्य आहे. बॅटिंग करताना झेन मोड मध्ये जातो. लाईक लुजिंग इन वन्स ओन परफेक्शन. गॉड गिफ्टेड प्रतिभा असणे ही वेगळी गोष्ट आणि त्याला तासून तासून परत परत वारंवार त्याचे अभूतपूर्व प्रदर्शन करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रोहित शर्मा टेक्निकली त्याच्या पेक्षा साऊंड बॅटसमन आहे. त्याचे टायमिंगचे चाहते झहीर अब्बास आहेत यातच सगळे काय ते आले. पण रोहितला ती कनसिस्टन्सी कधीच दाखवता आली नाही आणि फिटनेस पण.

कोहली हा रिचर्ड्स यांच्या घराण्यातील माणूस आहे. जेव्हा रिचर्ड्स म्हंटला की तुझा एक शॉट माझ्या भात्यात असता तर मला खूप बरे वाटले असते त्या दिवशी कोहली स्वतःवर सर्वाधिक खुश झाला असेल. रिचर्ड्सचे एक वाक्य आहे तुम्ही बेस्ट आहात हे तुम्हीच स्वतःला सांगावे लागते मग लोकं त्यावर विश्वास ठेवतील. नार्सीसिस्ट वाटले तरी हेच खरे आहे. तुम्ही स्वतः ठरवत असता की लोकांनी तुम्हाला कसे ट्रीट करावं. म्हणुन टीम मध्ये येऊन सहा महिने होताच हरभजन त्याला म्हणतो की एक दिवस तू भारताचा कॅप्टन होणार. सर्वोत्कृष्ट कॅप्टन पैकी एक होणार हे तेव्हाच ठरलेले असते.

क्रिकेट खूप लोकं खेळतात, खूप लोकं महान बनतात. पण खेळाला वळण लावणारे खूप कमी लोक असतात. त्यांनाच जग जीनियस म्हणून लक्षात ठेवते. कॅप्टनशिप ही लीगसी असणारी गोष्ट गांगुली, द्रविडने जे खेळाडू निवडले ते धोनीला पुरले. धोनी, कुंबळेने जे  निवडले ते कोहलीला पुरले. कोहलीने जी पेस बॅटरी दिली ती पुढे नक्कीच पुरेल. परदेशी सीरिज जिंकायची सवय लावली ती ही पुरेल.

आज कॅप्टन पद सोडतोय. काय काय आणि किती आठवावे. मोहाली, होबर्ट, ॲडलेड, सेंच्युरीअन, पोर्ट ऑफ स्पेन, सिडनी, आणि अजून कितीतरी… स्टीव्हन स्पेंडर म्हंटला होता living is in the letting go.. तेच खरे आहे.

सचिन रिटायर झाल्यावर काही लोकांनी क्रिकेट बघायचे सोडले. ज्यांनी गावस्कर विश्वनाथला पाहिले त्यांना तेंडुलकर द्रविड मध्ये मजा येत नाही. ज्यांनी तेंडुलकर, लारा पाहिले त्यांना कोहली, विल्यमसन मध्ये मजा येत नाही. हा मुद्दा मजेचा नसतो. मी घालवलेला काळ हा तुमच्या काळापेक्षा चांगला होता असे वय झाल्यावर सांगायचे असते इतकंच.

 हा निर्णय पण वनडे, टी-ट्वेंटीची कॅप्टनशिप सोडण्यासारखा झटकन घेतला असणार. असाच एक दिवस झटकन तो क्रिकेट पण सोडणार. मायकल होल्डिंग गेल्या वर्षीच त्याला म्हणाला होता, ‘He is a Mustang, it’s hard to tell a Mustang to trot. He’s going to gallop.’

  • भिडू अजित देशमुख

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.