JNU मधले राडे ज्यांच्या काळात झाले त्या कुलगुरुंची UGCच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेय

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू ममिदला जगदिश कुमार यांची शुक्रवारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा तो ६५वर्षांचा होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते करण्यात आले आहे.

 जेएनयू व्ही-सी म्हणून कुमार यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जानेवारीमध्ये संपला होता, परंतु जोपर्यंत त्यांचा उत्तराधिकारी निवडला जात नाही तोपर्यंत त्यांना राहण्यास सांगितले होते. नवीन JNU V-C निवडण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. आता हि झाली बातमी. पण आपलं काम दुसरं आहे. तुम्ही ओळखलं असेलच.

तर पहिल्यांदा  विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसी बद्दल सांगतो. तर नावा वरूनच तुमच्यापैकी काही जणांनी ओळखलं असेल. 

विदयापीठ आयोग हे देशातील शैक्षणिक संस्थांना विद्यापीठांचा दर्जा देणे, त्यांना निधी पुरवणे अशी कामे करते.  

विद्यपीठांच्या कामकाजावर विद्यापीठ अनुदान आयोग मोठा प्रभाव टाकू शकते असं जाणकार सांगतात.

आणि या एवढ्या महत्वाच्या जागेवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू ममिदला जगदिश कुमार यांची निवड झाली आहे. जगदीश कुमार यांचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) मधला कार्यकाळ चांगलाच वादळी ठरला होता. त्यात त्यांनी सरकारच्या बाजूने राहत विद्यार्थ्यंनावर अन्याय केला असाही आरोप त्यांना आपल्या कार्यकाळात सहन करावा लागला होता.

IIT मद्रास मधून इलेक्ट्रिक इंजिनीरिंग केलेल्या कुमार यांची नियुक्ती तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जानेवारी २०१६ मध्ये जेएनयूचे कुलगुरू म्हणून केली होती.

कुमार तेव्हा IIT-दिल्लीच्या इलेक्ट्रिक विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २०१६ पासून २०२२ पर्यंतचा त्यांचा कार्यकाळ खूप वादळी ठरला होता.

याची सुरवात झाली ९ फेब्रुवारी २०१६ पासून. अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात जेएनयूमध्ये विद्यार्थी आंदोलन करत होते तेव्हा अनेक देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोपही झाला होता. 

कन्हैया कुमार, उमर खालिद ही नाव याच आंदोलांमुळं पहिल्यांदा देशापुढे आली होती.

ऑक्टोबर २०१७ मध्ये, JNU मध्ये जोरदार निदर्शने सुरू झाली होती. कारण होतं नजीब अहमद जो एक एमएससीचा विद्यार्थी होता आणि तो RSS-संलग्न ABVP मधील काही विद्यार्थ्यांशी भांडण झाल्याच्या एका दिवसानंतर कॅम्पसमधून बेपत्ता झाला होता.

त्या नंतरचा राडा झाला नोव्हेंबर २०१९ मध्ये, तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी कॅम्पसमध्ये तीन तासांहून अधिक काळ अडकून पडले होते कारण फी वाढीच्या विरोधात कॅम्पसमध्ये जोरदार निदर्शने झाली होती.

रीसेन्ट राडा झाला होता जानेवारी २०२० मध्ये. निदर्शने सुरू असताना, जेएनयू कॅम्पस चेहरा झाकलेली लोकं घुसली आणि त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

या हल्यामध्ये जेएनयूची विद्यार्थी नेती आयेशी घोष हिचा रक्तबंबाळ झालेल्या चेहऱ्याचा फोटो सगळीकडे पसरला आणि जेएनयूच्या प्रशासनावर टीकेची झोड उठली. 

या सगळ्या राड्यांमध्ये कुलुरू जगदीश यांनी विद्यार्थ्यांची बाजू ना घेता सरकारचा अजेंडा राबवला असा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यामुळं आता यूजीसीच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची नेमणूक किती वादळी ठरते हे येणाऱ्या दिवसातच कळेल.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.