द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?

रशिया युक्रेन युद्ध वर्ल्ड वॉर २ नंतरच्या सर्वात भयानक युद्धांपैकी एक मध्ये गणले जाऊ लागलंय. युद्धाला जवळपास ११ दिवस उलटून गेले आहेत.रशियन आक्रमणापुढे युक्रेन अजून जरी उभं असलं तरी नागरिकांना युद्धात उतरावल्याने जीवितहानीचा आकडा वाढतच आहे. यामुळंच इंटरनॅशनल मीडिया युद्धाबद्दल काय म्हणतेय ते एकदा बघूया.

द वॉशिंग्टन पोस्ट 

Annotation 6

वॉशिंग्टन पोस्टची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे अमेरिकेने युक्रेनच गव्हर्नमेंट इन एक्झाइल स्थापना करण्यासाठी चालूय केलेली तयारी. 

यामागील प्रमुख कारण आहे ते म्हणजे रशियापुढे जरी युक्रेन तग धरून असलं तरी ते युद्ध जिंकेल याची अमेरिकेला शक्यता वाटत नाहीये. त्यामुळे झेलेन्स्की यांना युक्रेनच्या बाहेर काढून त्यांच्या अध्यक्षतेखाली पोलंडमध्ये गव्हर्नमेंट इन  एक्झाइल स्थापन करता येइल अशी शक्यात अमेरिकन अधिकारी बोलून दाखवत आहेत. रशियाने जरी युक्रेनचा ताबा मिळवला तरी लढाऊ बाण्याचे युक्रेनियन त्यांचा लढा चालूच ठेवतील. आणि या लढ्याला लीड करण्यासाठी पोलंड मध्ये झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा अमेरिकेची यॊजना आहे.

 मात्र तूर्तास तरी झेलन्स्की यांनी आपला देश सोडून आपण कुठेही जाणार नसल्याचं म्हटलं आहे.

पोस्टची मुख्य हेडलाईन आहे युद्धात सामान्य नागरिकांची बळी जाण्याची संख्या दिवेसंदिवस वाढत आहे. मात्र हा आकडा नेमका किती आहे हे मात्र सांगण्यात आलेलं नाहीये. युद्ध विशेषतः युक्रेनच्या प्रमुख शहरांवर येऊन ठेपलं असल्याने हा आकडा एथू पुढे वाढतच जाईल.

अजून एक महत्वाची हेडलाईन म्हणजे रशियाने आत युक्रेनची प्रमुख विमानतळं टार्गेट करायला सुरवात केली आहे. त्यामुळं रशियाच्या विरोधात उभं राह्यण्यासाठी प्रेसिडेंट झेलन्स्की यांनी आता युरोपिअन देश आणि अमेरिका यांच्याकडून फायटर जेट्सची मागणी केली आहे.

अल जझीरा 

3

मॉस्कोवर म्हणजेच रशियावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकन सरकार रशियाकडून तेलावर बंदी घालण्याचा चालू आहे. रशिया नाही म्हटलं तरी जगताला ३ रा मोठा ऑइल पुरवठादार असल्याने ही बंदी घालणं सोपं नसणार आहे. तसेच युरोपियन देश मोठ्या प्रमाणात रशियातून येणाऱ्या इंधनावर डिपेंड असल्याने त्यांची पण भूमिका यासाठी अमेरिकेला विचारात घ्यावी लागणार आहे.

तसेच रशियन सैन्य नेमकं किती आत घुसलं आहे याचा मॅप अल-जझीराने प्रकशित केला आहे.

1

त्यानुसार किव्ह, खार्कीवसह सर्व प्रमुख शहरांना वेढा घातल्यानंतर रशियन सैन्य आता पूर्व आणि दक्षिणेकडून पुढे सरकत चालले आहे.

त्याचबरोबर अनेक पाश्चिमात्य देश जरी ग्राउंडवर युक्रेनच्या बरोबर उतरत नसले तरी हत्यारे मात्र भरभरून देत आहेत. अल जझिराच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाने गेल्या आठवड्यात युक्रेनला रशियन आक्रमकांशी लढण्यासाठी क्षेपणास्त्रे, दारुगोळा आणि इतर लष्करी उपकरणे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोमवारी सांगितलयं की “आमची क्षेपणास्त्रे आता जमिनीवर आहेत.”

द मॉस्को टाइम्स

मॉस्को टाइम्स जे एक रशियन इंडिपेंडेंट न्यूज एजन्सी आहे ते युद्धाबद्दल आणि रशियावर लागलेल्या आर्थिक निर्बंधांवर रशियात कोणते परिणावं होतायेत यावर काय छापतंय ते एकदा बघू.

यूएस अधिकारी म्हणतायेत रशिया युक्रेनमध्ये लढण्यासाठी सीरियन लोकांची भरती करत आहे  असं वृत्त मॉस्को टाइम्सने  वॉल स्ट्रीट जर्नलच्या हवाल्याने दिले आहे. यूएस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार रशिया युक्रेनवर हल्ला वाढवत असताना शहरी लढाईत अनुभवी सीरियन सैनिकांची भरती करत आहे. सीरियातून अशा सैनिकांची भरती केली जात आहे की ज्यांची  कीव ताब्यात घेण्यास मदत होईल.

युक्रेनमध्ये मॉस्कोच्या लष्करी कारवाईच्या विरोधात रविवारी झालेल्या निदर्शनेदरम्यान रशियातील शहरांमधील ४६०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचंही मॉस्को टाइम्स ने म्हटलंय.

युक्रेनमधील युद्धातील मंद प्रगती आणि तीव्र प्रतिकार रशियन आक्रमणास प्रवृत्त करू शकतो. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  पुतिन यांना जलद विजय मिळवण्यात अपयश आल्याने ते चेचन्या आणि सीरियामध्ये शेवटच्या वेळी पाहिलेल्या कठोर डावपेचांचा अवलंब करू शकतात असं सांगण्यात येतंय.

रशियावरील निर्बंधांचे परिणाम सामान्य नागरिकांवरही जाणवायला लागले असून किरकोळ विक्रेत्यांनी साठेमारी रोखण्यासाठी ग्राहकांना एक ठरविक कोठा ठरवून द्यावा असा आदेश रशियन सरकारने काढला आहे.

तसेच रशियातले अनेक उद्योगपती त्यांच्या व्यवसायात होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील हानीमुळे चिंतेत असल्याचंही मॉस्को टाइम्सच्या बातम्यांवरून दिसून येतं.

ग्लोबल टाइम्स 

Capture GH

ग्लोबल टाइम्स युद्ध मागे सोडून युद्धाचा विषय मागे सोडून पुन्हा सरकारचं गुणगान करण्यास व्यस्त झालंय. एका अमेरिकेन सिनेटरने रशियन लोकांनी व्लादिमिर पुतीन यांची हत्या करावी असं व्यक्तव्य केलं होतं. या वक्त्यव्यावरून या चिनी वृत्तपत्रानं ग्लोबल टाइम्सवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.

द गार्डियन 

FNMtNmeXMAQJ7O9?format=jpg&name=small

रशियाने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असलं तरी युद्धग्रस्त भागातून सामान्य नागरिकांना बाहेर पडण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी असं द गार्डीयनच्या बातमीत म्हटलं  आहे. तसेच UN ने पहिल्या महायुद्धानंतरचा सगळ्यात मोठा स्थालांतराचा प्रश्न असणार आहे असं म्हटलं आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे स्थलांतरितांचा आकडा ४० लाखांपर्यंत पोहचू शकतो असं सांगण्यात येतंय.

म्हणजे एकंदरीतच परिस्तिथी अजूनच भयावह झाली आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.