साऊथवाले गुटखा-दारूची जाहिरात करत नाही अन् दुसरीकडे आहेत पद्मश्रीप्राप्त बॉलिवूडवाले

“देखते है कौन नया खिलाडी आया है. उसे अच्छेसे समझायेंगे, वो भी अपनी जुबाँ में.” माफियाचं गेटअप असणारे दोन व्यक्ती गाडीमध्ये बसून एका ठिकाणी जाताना हे बोलत असतात. थोड्या वेळात जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा तिसरा व्यक्ती एंट्री घेतो. एंट्री घेताना तो अगदी तलवारीने एक पुडी फोडतो आणि खातो. हे बघून इतर दोघे म्हणतात “ये तो अपनी जुबाँ का है.”

मग तिसरा व्यक्ती म्हणतो “जुबाँ एक हो तो दिल भी एक होने चाहिए” इतकं म्हणून तिन्ही व्यक्ती कॅमेऱ्याकडे बघतात आणि म्हणतात…

बोलो जुबाँ केसरी

इथवर येईपर्यंत तुम्हाला कळलं असेलच की, आम्ही कशाबद्दल बोलतोय. हो, विमल हाच ब्रँड आहे आणि ही एकदम नवी ॲडव्हर्टाइज आहे. ॲडमधले ऍक्टर्स आहेत अजय देवगण, शाहरुख खान आणि अक्षय कुमार. मात्र जेव्हापासून ही ॲड आली आहे, तेव्हापासून त्यांना खूप ट्रॉल केलं जात आहे. कारण साहजिकच आहे की, त्यांनी ‘तंबाखू’ची जाहिरात केलीये.

पैशांसाठी बॉलिवूडचे अभिनेते कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात, असं म्हणत सोशल मीडियावर त्यांचा बाजार उठवला आहे. 

तर दुसरीकडे मात्र साऊथच्या इंडस्ट्रीचा खूप कौतुक केलं जात आहे. याला कारण आहे, साऊथच्या अक्टर्सनं अशा चुकीचा संदेश देणाऱ्या जाहिराती नाकारणं. नुकतंच  साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने  हे सिद्ध करून दाखवलं आहे. फक्त अल्लू अर्जुनच नाही तर इतर देखील या रांगेत आहे. 

हे व्यक्ती कोण आहेत? कधी त्यांनी अशा जाहिराती नाकारल्या आहेत, जाणून घेऊया… 

सुरुवात करूया अल्लू अर्जुनपासून…

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याला आलेली ६ करोडची ड नाकारली आहे. साफ ‘नाही’ असं अल्लू अर्जुन म्हणालाय. आता अल्लू अर्जुनकडे कित्येक ड असतील. कदाचित यापेक्षा जास्त पैसे त्याला हवे असतील, म्हणून नाही म्हणाला असेल, असं वाटत असेल तर थांबा. याचं कारण फक्त एक होतं. 

तर ही ड होती ‘तंबाखू’ची. 

“मी माझ्या चाहत्यांपर्यंत चुकीचा संदेश कधीच पोहोचवणार नाही” असं एक साधं वाक्य म्हणत अल्लू अर्जुनने ही  सोडली. वाक्य साधं असलं तरी अल्लू अर्जुनाच्या लेखी त्याचं महत्व खूप जास्त आहे. कारण कुणाचाही रोल मॉडेल असणं मोठी जबाबदारी असते, त्यातही लोक तुमच्या कृतींना फोलो करत असतील तर अजूनच विश्वासानं आणि भानावर राहत वागावं लागतं. 

म्हणून मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत तसा मेसेज माझ्या फॅन्सपर्यंत पोहोचवणार नाही, असं अल्लू अर्जुन म्हणालाय. 

या एका छोट्या कृतीमुळे त्याची देशभरात वाहवाही होतीये. एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं, हे अल्लू अर्जुननं दाखवून दिलंय, असं म्हणत फॅन्सचं तोंड दुखत नाहीये. 

तर याआधी अशीच कृती साउथ क्वीन ‘साई पल्लवी’ हिने देखील केली आहे. 

२०१५ मध्ये आलेल्या ‘प्रेमम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या साई पल्लवीने २०१९ मध्ये एका फेअरनेस क्रीमची व्हर्टाइज नाकारली होती. २ कोटी रुपये तेव्हा तिला ऑफर करण्यात आले होते. मात्र तरी तिने नकार दिला होता. एका मुलाखतीत तिने आपला निर्णय स्पष्ट करताना म्हटलं होतं की…

“हा भारतीय रंग आहे. आपण परदेशी लोकांकडे जाऊन त्यांना विचारू शकत नाही की ते गोरे का आहेत. आपण त्यांच्याकडे बघून आपल्यालाही ते हवे आहे, असा विचार करू शकत नाही. तो त्यांच्या त्वचेचा रंग आहे आणि हा आपला आहे. आफ्रिकन लोकांचाही स्वतःचा रंग आहे आणि ते सुंदर आहेत.”

असं होतं साई पल्लवीचं उत्तर. डंके की चोट पे तिने दाखवलं होतं की, उगाच ती कित्येक तरुणांची क्रश नाहीये.

तिसरे आहेत लोकप्रिय ज्येष्ठ तेलगू अभिनेते ‘नंदामुरी बालाकृष्णा’ 

भवानी द टायगर, सिम्हा असे अनेक चित्रपट फेम बालाकृष्णा यांनी तर आजपर्यंत कोणत्याच ब्रँडची  केलेली नाहीये. ते अशा कलाकारांपैकी एक आहेत जे कधीही कोणत्याही टीव्ही किंवा प्रिंट जाहिरातीत दिसले नाहीत. तर सोशल मीडियावरही कोणत्याही ब्रँडची जाहिरात केली नाही.

एका मुलाखतीत त्यांनी याबद्द्ल सांगितलं होतं की, ते अशा लोकांपैकी एक नाही जे आपल्या चाहत्यांचा आणि तेलगू लोकांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करतात आणि त्यातून पैसे कमवतात. एक अभिनेता म्हणून, माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी आयुष्यभर ते करत राहीन. 

माझं काम कोणत्याही ब्रँडची जाहिरात करत माझ्या फॅन्सला भुलावणं हे नाहीये, असं त्यांचं म्हणणं राहिलंय. 

एकीकडे आहेत अल्लू अर्जुन, साई पल्लवी आणि नंदामुरी बालाकृष्णा यांच्यासारखे साऊथ कलाकार ज्यांनी नैतिकता जाणत चुकीच्या गोष्टीला समर्थन कधीच केलं नाहीये. जेव्हा एखादं असं व्यक्तिमत्व ज्याला सामान्य लोक फॉलो करत असतात तेव्हा कोणत्याही गोष्टीचं ब्रँडिंग करताना विचार करावा लागतो. आदर्श असणं आणि ते जपणं, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलंय. 

तर दुसरीकडे आहेत तीन पद्मश्री बॉलिवूड अभिनेते, जे सर्रास तांबखूची ॲ करतायेत. 

साऊथ अभिनेते ज्यांनी अशा चुकीच्या ॲला डायरेक्ट नकार दिलाय. यातच दडलंय त्या प्रश्नाचं उत्तर जो आजकाल खूप विचारला जातोय की, लोक का साऊथ चित्रपट आणि अभिनेत्यांकडे आकर्षित होतायेत.

तुम्हाला या प्रकारणाबद्दल काय वाटतं? कुणाची भूमिका योग्य वाटते? आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.