जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० व्हिस्की ; यातल्या बऱ्याच खिश्याला परवडू शकतात

Whiskey, like a beautiful woman, demands appreciation. You gaze first, then it’s time to drink.

वरचे दिव्य शब्द आहेत हारुकी मुराकामी नावाच्या एका मोठ्ठ्या जपानी लेखकाचे. आता तुम्ही म्हणाल भिडू कायतर मराठी किंवा गेलाबाजार उर्दूत तरी लिहायचं. पण कसंय दरवेळी दोन घोट पोटात गेल्यावरच इंग्लिश बोलायचं असा काय नियम नसतोय.

जो पोटात द्रव नसतानाही इंग्लिश बोलू शकतो, तोच खरा धडाकेबाज.

आम्ही एवढा जोर इंग्लिशवर देतोय, कारण आजचा विषय व्हिस्कीचा आहे. ओल्ड मंक म्हणलं की, तुम्हाला सोडून गेलेली किंवा न मिळालेली प्रेयसी आठवणार. मॅजिक मोमेंट्स म्हणलं की तिच्या आनंदासाठी सोबत पिलेली बाटली आठवते.

पण व्हिस्की म्हणलं, की प्रॉपर हॉटेल, प्रॉपर टेबल, चकण्याला काजू फ्राय, चिकन तंदुरी सगळा फॉर्मल कारभार.

सगळं जग व्हिस्की पितंय, आपल्याला पण वाटतं व्हिस्की म्हणजे इंग्लिश. पिऊन फॉरेनर झाल्यासारखं वाटतंय, म्हणजे जगात खपत पण इंग्लिश व्हिस्कीच असतील? आम्ही शोधलं आणि तुमच्यासाठी एक लिस्ट घेऊन आलो.

जगभरात सर्वाधिक खपाच्या टॉप १० व्हिस्की

नंबर १० – 8 PM

40202837 3 8pm premium black whisky

आपल्या भारतात 8 PM या वेळेचं एक वेगळंच महत्त्व आहे, आठवत नसेल तर रात्री आठ वाजता टीव्हीवर भाषण आहे, हे कानावर पडलंय असं समजा. विषय तो नाही, 8 PM हा भारतीय ब्रँड आहे. ४२.८ टक्के अल्कोहोल असलेली ही व्हिस्की माणसाला किरकोळीत बाद करु शकते. कडक असली तरी ही एकदम स्मूथ जाते असं एक भिडू सांगत होता. २०२० च्या आकडेवारीनुसार विक्री झालीये ८५०० केसेस.

आता हे विक्रीचं गणित एकदाच डोक्यात फिट करुन घ्या, १००० चा आकडा म्हणजे १० लाख केसेस विकल्या गेल्या. १० लाख केसेचची टोटल बसते ९० लाख लिटरला. गणित अवघड आहे, पण तुम्ही फक्त आकडे बघत जा.

नंबर ९ – Haywards Fine

haywards fine

नाव घेऊया विजय मल्ल्याचे, कारण हा ब्रॅण्ड आहे मल्ल्याचा. किंग ऑफ गुड टाईम्स असणाऱ्या मल्ल्याच्या युनायटेड स्पिरीट्सची हि व्हिस्की ४२.८ टक्क्यात जगाच्या पाठीवर कुठंही असताना गोव्याचा फील देऊ शकते. यांनी केसेस विकल्यात ९६००.

नंबर ८ – Jim Beam

Jim Beam

नुकतीच एका हिरॉईननं याची जाहीरात केलेली बघितली. याचा फोटो असा नुसती ग्लासात व्हिस्की असा दिसतच नाही. वरती लिंबू वैगेरे एकदम क्लासिक फील. यात अल्कोहोल असतंय ४० टक्के. या लिस्टमध्ये असलेला हा पहिला अमेरिकन ब्रँड. यांनी केसेस विकल्यात १० हजार ४००.

नंबर ७ – Original Choice

WhatsApp Image 2022 04 29 at 9.32.47 PM

या नंबरवर सत्ता गाजवणारी हि व्हिस्की लय पटकन आठवत नाय, तुम्हाला आठवली असेल तर तुम्हीच खरे शौकीन. हा ब्रँड स्वतः भारताचा आहे. सोनेरी रंग, ४२.८ टक्क्यांचा प्रमाणबद्ध आकडा. तुमच्या आमच्यासाठी फेमस नसली, तरी १२ हजार ७०० केसेस विकल्या गेल्यात. तुम्ही हायसा कुठं? बकेट लिस्टमध्ये टाकून ठेवा.

नंबर सहा – Jack Daniels

Jack Daniels and mixer 768x512 1
credits: WhiskyBon

आहा, आता कसं नाव घेतलं. शांत म्युझिक, चकण्याला चीज चेरी पायनापल आणि ऑन द रॉक्स जॅक डॅनियल्स, आमंत्रण देत नाहीये इमॅजिनेशनमध्ये नेतोय. या अमेरिकन ब्रँडनं वर्षाला १३ हजार ४०० केसेस विकल्यात. निम्म्या तर आपल्याकडच्या गाभड्यांनीच मागवल्या असतील. कारण जॅक डॅनियल्स म्हणजे रॉयल कारभार. इथं अल्कोहोल पर्सेंटेज मॅटर नाही करत, फील महत्त्वाचा.

नंबर पाच – Johnnie Walker

Johnnie Walker
credits: Whiskywash

ओळखीचं नाव, ओळखीची चव (कित्येकांसाठी.) यांच्या लोगोप्रमाणं आपण वाकडे चालत राहतो आणि हा ब्रँड काय विसरत नाही. ४० टक्के अल्कोहोल, ब्लेंडेड आणि स्मोकी चव, बजेटला चंदन लावणारी किंमत तरीही खप किती, तर १८ हजार ४०० केसेस. स्कॉटलंडमध्ये बनणारी ही व्हिस्की आपल्या जन्मदात्याचं नाव रोशन करतीये.

नंबर चार – Royal Stag

RS
Credits: raymassey

खिशाला कडकी ए आणि ओल्ड मंक पचणार नाय, अशावेळी मदतीला येतं रॉयल स्टॅग. अस्सल भारतीय ब्रँड जो भारतात फेमस आहेच, पण जगातही हवा करतोय. कुठं फॉरेनला गेलात आणि कुणी आरएसची ऑर्डर दिली, तर चिंग होऊ नका. ब्रँड इज ब्रँड, कारण रॉयल स्टॅगनं वर्षाला केसेस विकल्यात २२ हजार. चपटीपासून रॉयल वाटणाऱ्या खंब्यापर्यंत यात सगळं काही येतंय, म्हणून मार्केट हलतंय.

नंबर तीन – Imperial Blue

imperial blue
Credits: pernod-ricard

प्यार की राह में चलना सीख… गजल गाता गाता आणि आपल्याला म्युझिक सिडीची जाहिरात दाखवता दाखवता या गड्यांनी लय मार्केट खाल्लंय. ‘एक आयबी द्या’ असं म्हणणाऱ्यांनी आकडा कुठवर पोहोचवलाय माहिती का? २६ हजार ३०० केसेस. आणखी डीप विषय म्हणजे रॉयल स्टॅग आणि आयबी दोन्ही ब्रँड परनॉड रिकार्ड या एकाच भारतीय कंपनीच्या मालकीच्या आहेत. पैसा वढायचा नुसता, हाय काय अन नाय काय.

नंबर दोन – Officers Choice

officers choice

आता किती ऑफिसर्स हा ब्रँड वापरतात हे माहित नाय. पण ब्रँड खपतो वर्षाला ३० हजार ६०० केसेस (जवळपास २७ कोटी लिटर.) पाण्यागत खप ओ. भारतीय ब्रँड, सोनेरी रंग, अल्कोहोलचं प्रमाण ४२.८ टक्के. अजिबात मापात पाप नाही.

नंबर एक – McDowells

40199189 3 mcdowells no1 luxury premium whisky

पहिल्या नंबरसाठी तुम्ही फॉरेनच्या ब्रँडचा विचार केला असणार, पण इथं हवा कुणाची आहे? तर विजयभाऊ मल्ल्या. जगात सगळ्यात जास्त विकली जाणारी व्हिस्की भारतीय ब्रँड बनवतो. याचा खप आहे, ३० हजार ७०० केसेस. नाद नाहीच, अजिबात नाही. वर्षाला २७ कोटींपेक्षा जास्त दारू विकायची म्हणजे चेष्टाय का? पण मॅकडॉवेल्सनं करुन दाखवलंय.

आता दहापैकी सात ब्रँड भारतीय आहेत, म्हणजे बघा. आपण फक्त पिण्यात नाय, पाजण्यात पण लय पुढं गेलोय. सगळ्या जगाच्या गोवा करू शकतोय आपण… विषय एन्ड!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.