पवारांनी चरखा चिन्ह मिळवण्यासाठी चांगल डोकं लावलेलं पण तरिही गेम फसला..

सोनिया गांधी यांच्या हातात काँग्रेस गेल्यानंतर पवार आणि त्यांच्या खटके उडू लागले होते. काँग्रेस पक्षानं निलंबन केल्यानंतर शरद पवार यांनी तारिक अन्वर, पी. एम. संगमा यांच्या साथीने  १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. 

राष्ट्रवादीच्या पहिल्या अधिवेशनात लावण्यात आलेल्या बॅनरवर सुद्धा चरखा पक्ष चिन्ह असल्याचे पाहायला मिळते.

Screenshot 2022 08 03 at 7.33.13 PM

मात्र, पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत पक्ष चिन्ह घड्याळ कसे झाले ? पक्षाची इच्छा चरखा हे पक्ष चिन्ह असायला हवी अशीच होते.

मात्र, कुठल्या कारणामुळे राष्ट्रवादीला चरख्या ऐवजी घड्याळ चिन्ह स्वीकारावं लागलं ?

झाले असे की, आणीबाणी नंतर इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनमत तयार झाले होते. तसेच पक्षात दोन गट पडले होते. यशवंतराव चव्हाण यांनी रेड्डी कॉंग्रेसची स्थापना केली. शरद पवार हे रेड्डी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९७८ साली विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात रेड्डी कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे सरकार फक्त १ वर्ष चालेल. 

शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग करून वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले होते. पुलोद स्थापन करण्यापूर्वी शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. जनता दल, कम्युनिस्ट पक्षाला सोबत घेऊन शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. मात्र आणीबाणी नंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. त्यानंतर गांधी यांनी पुलोदचं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 

त्यापूर्वी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री डी देवराज उर्स यांनी इंदिरा गांधी यांच्या सोबत झालेल्या वादानंतर काँग्रेस पक्ष सोडून १९७८ मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तो पक्ष काँग्रेस (सेक्युलर) म्हणून सुद्धा ओळखला जात होता.  

या पक्षाचे निवडणूक चिन्ह हे चरखा होते.

त्याकाळी चरखा फार फेमस होता. यात शरद पवार यांच्यासह ए के अँटनी, देव कांत बरुहा, सरत चंद्र सिंहा, के. पी. उणिकृष्णन या सारख्या मोठे नेते समाजवादी काँग्रेस पक्षात सामील झाले होते. 

ऑक्टोबर १९८१ मध्ये शरद पवार समाजवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले होते.

१९८५ मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी काँग्रेस पक्षाने ५४ जागा जिंकल्या होत्या. शरद पवार विरोधी पक्षनेते झाले होते. राजीव गांधी यांच्या हातात काँग्रेसचे नेतृत्व आल्यानंतर शरद पवार यांनी १९८६ परत काँग्रेस मध्ये आले. 

यावेळी शरद पवार यांनी राज्यातील समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करून घेतली. त्यापूर्वीच १९८४ मध्ये समाजवादी काँग्रेस मध्ये २ गट पडले होते.

समाजवादी काँग्रेस पक्ष –सरत चंद्र सिंहा या दुसरा गट पडला होता. तसेच या गटाने समाजवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह असलेल्या चरख्यावर आपला हक्क दाखवला होता. 

हा वाद अगोदर सर्वोच्च न्यायालायात आणि नंतर निवडणूक आयोगाकडे गेला होता. समाजवादी काँग्रेस मधील एका गटाचे नेतृत्व के. पी. उणिकृष्णन तर दुसरा गट सरत चंद्र सिंहा यांचा होता. जेव्हा हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला तेव्हा के. पी. उणिकृष्णन आणि सिंहा यांनी आपणच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येत होते. 

तसेच निवडणूक आयोगाकडे पक्षाने दिलेल्या कागदपत्रामंध्ये सरत चंद्रा सिंहा हे अध्यक्ष, के. पी. उणिकृष्णन आणि एस. धाबे हे जनरल सेक्रेटरी असल्याची नोंद होती. 

तर के. पी. उणिकृष्णन यांनी सरत यांना पक्षाने निलंबित करण्यात आल्याचा दावा निवडणुक आयोगापुढे केला होता. मात्र उणिकृष्णन हे सिद्ध करू शकले नाही. पक्षाने आयोगाकडे दिलेले कागदपत्रे आणि करण्यात येणारे आर्ग्युमेंट यात तफावत होती.

यामुळे निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला तुम्ही करून ठेवलेल्या गोंधळामुळे काही समजत नसल्याचे सांगितले होते. 

बऱ्याच वादानंतर शेवटी १९९५ मध्ये सरत चंद्र सिंहा हेच समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे पक्ष चिन्ह हे सरत यांच्या कडेच राहिले होते.  

१९९९ काँग्रेस पक्षानं निलंबन केल्यानंतर शरद पवार यांनी तारिक अन्वर, पी. एम. संगमा यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. याच वेळी सरत चंद्र सिंहा यांनी आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन करण्यात येत असल्याची घोषणा केली. आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह राष्ट्रवादीला देत असल्याचे सुद्धा सांगितले होते. 

त्यामुळे १० जून रोजी पक्ष स्थापनेवेळी पक्षाच्या बॅनरवर चरख्याचे चिन्ह छापण्यात आले होते. पक्षाला विश्वास होता की आपल्याला निवडणूक चिन्ह म्हणून चरखाच मिळेल.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे चरखा हे निवडणूक चिन्ह मिळावा म्हणून अर्ज केला होता.    

यावर उत्तर देतांना निवडणूक आयोग म्हणाले होते की, 

समाजवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन झाल्याने त्या पक्षाची ओळख पुसली गेली आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्ह विलीन झाल्याने निवडणूक चिन्हावर दावा करता येणार नाही. ते चिन्ह गोठविण्यात आले आहे. 

समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर निवडणूक आयोगाने चरखा हे चिन्ह पक्षाला दिले होते. आता हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन झाल्याने निवडणूक चिन्ह मिळावे म्हणून आयोगाला विनंती केली होती. यावर काँग्रेस पक्षाने सुद्धा आक्षेप घेतला होता. 

लोकांच्या मनात गेल्या १०० वर्षांपासून ‘चरखा’ हा काँग्रेसशी संबंधित आहे. काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्याचे चरख्याचे चिन्ह म्हणून वापर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला चरखा हे चिन्ह देऊ नये अशी मागणी केली होती.  

यानंतर आयोगाने दिलेला निकालात म्हटले होते की, 

एखादा पक्ष फुटून दुसरा पक्ष तयार झाला असेल त्याने नवीन पक्ष म्हणून नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर निवडणुका लढवाव्या. निवडणुकीत कामगिरीनुसार लोकांमध्ये ओळख निर्माण होईल. 

आयोगाने सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. अंदमान निकोबार इथे होत असलेल्या निवडणुकीत सगळ्या उमेदवारांना देण्यात येईल. यासाठी पक्षाने तीन चिन्हाची यादी सादर करायला सांगितले होते.   

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते. 

मात्र, मतदार घड्याळ हे चिन्ह मतदार स्विकारातील का अशी भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. पक्ष स्थानेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे ५८ आमदार निवडून आले होते. 

हे ही वाच भिडू   

Leave A Reply

Your email address will not be published.