९ करोडच्या बिटकॉइनसाठी हरियाणाचा पोलिस ऑफिसर किडनॅपर बनला
क्रिप्टो करेंसीच्या जगतात बिटकॉइन तेच महत्त्व आहे जे आपल्या व्यावहारिक नोटेच डॉलर मध्ये आहे. हे डिजिटल नाणं एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे हा बिटकॉइन मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार आहेत म्हणजे एखाद्याचा जीव घेऊ शकतात असाच एक किस्सा आहे हरियाणाचा. हरियाणाच्या एका पोलिस कर्मचाऱ्यांनी हा बिटकॉइन चा खजाना मिळवण्यासाठी किडनॅपर बनण्यापर्यंत मजल मारली होती.
हरियाणाच्या सोनीपत मधल्या एका एएसआय शिवकुमार या अधिकाऱ्याने आपल्या चार सहकार्यांसोबत एका नव्या घटनेला सुरुवात केली आणि ही घटना संपूर्ण भारत भर गाजली.
या एएसआय शिवकुमार या अधिकाऱ्याने नऊ करोडचे बिटकॉइन हडप करण्यासाठी जयपूरच्या एका व्यक्तीच अपहरण केलं. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी एएसआय शिवकुमार पोलीस कर्मचारी मोनू आणि तीन अज्ञात लोकांविरुद्ध अपहरण आणि जबरदस्तीने खंडणी वसूल करण्याचा कट रचला अशी तक्रार दाखल केली .
शिवकुमारवर आरोप करण्यात आले होते की त्यांनी जयपूरच्या एका व्यक्तीच अपहरण केलं आणि त्याच्या मोबाईल मधून ९ करोड किमतीचे सुमारे तीस बिटकॉइन दुसरे अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. असंही सांगितलं गेलं की ए एस आय जयपुर मधून त्या व्यक्तीला आणि त्याच्या दोस्ताला सोनीपत मध्ये किडनॅप करून आणलं होतं आणि त्याला बंदी बनवून ठेवलं होतं हा पराक्रम केला होता शिवकुमार आणि त्याच्या अधिकाऱ्यांनी.
या सगळ्या घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना राजस्थान मधल्या सिकर जिल्ह्यातल्या मूळ निवासी शशिकांत यांनी दिली. शशिकांत ही तीच व्यक्ती आहे जिचे शिवकुमारने अपहरण केले आणि नंतर तो पळून गेला होता. शिवकुमार च्या तावडीतून सुटल्यानंतर शशिकांत यांनी सगळ्यात आधी जाऊन पोलिसात तक्रार केली पोलिसांच्या चौकशी दरम्यान शशिकांत मी सांगितलं की तो डिजिटल क्रीप्टॉकरेन्सी मध्ये काम करतो. याच काळात त्याची ओळख ए एस आय शिवकुमार आणि मोनू यांच्याशी झाली होती आणि या दोघांनी शशिकांतचा गेम केला होता.
शशिकांत यांच्या मते २२ जानेवारीला ते जयपूर मध्ये आपला मित्र गौरव याच्या फ्लॅटवर होते. त्यावेळी दोन पोलीस वाले आपल्या सहकाऱ्यांसह त्या फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी शशिकांत यांना किडनॅप केलं यानंतर त्यांना मुसक्या आवळून एका फार्महाऊसवर बांधून आणण्यात आले.
शशिकांत पुढे या घटनेची हकीकत सांगतात की त्यांना बंदिवान बनवल्यानंतर शिवकुमारने त्यांच्या पत्नीकडे पंचवीस बिटकॉइन ची खंडणी मागितली. यासोबतच त्याने शशिकांत यांच्या मोबाईल द्वारे तीस बिटकॉइन दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले. आज घडीला या बिटकॉइनची किंमत करोड रुपये आहे. ही सगळी लुट थोडक्यात बिटकॉइन लूट एकदम फिल्मी स्टाइल झाली.
पण पापाचा घडा उशिराने का होईना भरतो तसा शिव कुमार चा पापाचा घडा भरला आणि तो गजाआड झाला. डिजिटल जगात अशा घटना होणे स्वाभाविकच आहे त्याला आळा घालण्या कडे पोलीस प्रशासन कायम भर देत असतात.
हे ही वाच भिडू :
- एका किरकोळ कंपनीमुळे जॅक डोर्सीला ट्वीटरचा राजीनामा द्यायला लागलाय..
- कुमारस्वामी म्हणतायत, बिटकॉईन घोटाळ्यात जनधन खात्यातुन ६००० कोटी गायब झालेत
- बिटकॉइन वगैरे विसरा, आता RBI सुद्धा भारतात पहिली डिजिटल करन्सी आणतय..
- तीन महिन्यापूर्वी तूम्ही १,००० रुपये लावले असते तर आज त्याचे १७ हजार झाले असते…