उभी दिल्ली भाजीवाल्या शकीलाच्या नावाने चळचळ कापायची.

डॉन म्हंटल कि डोळ्यापुढं येतो तो अमिताभ बच्चन आणि दाऊद. आणि लेडी डॉन म्हंटल कि मग मुंबईतल्या काही अंडरवर्ल्डच्या हसीना समोर येतील. जस कि गंगुबाई काठियावाड, हसीना पारकर आणि अजून बऱ्याच. पण शेवटी दाऊदच मुंबई अंडरवर्ल्डचा सर्वेसर्वा होता.

दिल्लीत पण  एक लेडी डॉन होती. अशीच… अगदी दाऊदसारखी.

संपूर्ण दिल्ली या शकीलच्या नावाने घाबरायची. लोकच काय तर अगदी पोलीस सुद्धा तिच्या नावाला घाबरायचे. दिल्ली पोलिसांच्या फायलींमध्ये तिच्यावर दाखल असलेले १०० च्यावर आहेत. तिला दिल्लीची ‘लेडी डॉन’ म्हटलं जातं. गुन्हेगारीच्या दुनियेत तिचे असे कारनामे आहेत, जे ऐकून तुमचे होश उडण छू होतील. 53 वर्षाची हि लेडी गँगस्टर म्हणजे शकीला.

गुन्हेगारीच्या दुनियेत शकीलाच्या एन्ट्रीची कहाणी एखाद्या पिक्चरच्या स्क्रिप्टपेक्षा कमी नव्हती एवढं मात्र निश्चित.

एक काळ असा होता की दिल्लीत या शकीलाच भाजीपाल्याचं दुकान खूप फेमस होत. इथं शकीला बसून रोज भाजी विकायची. भाजीपाला विकून मिळणाऱ्या कमाईतून तिला चार पैसे मिळायचे, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. सगळं कस निवांत सुरु होतं. पण अशातच शकीलाला जुगाराचा नाद लागला. आणि इथून थरार सुरु झाला.

भाजीपाला विकता विकता, त्या दुकानातच शकीलाने जुगाराचा धंदा सुरू केला. तिच्या दुकानात आजूबाजूच्या परिसरातले छोटे-मोठे गुन्हेगार जुगार खेळायला यायला लागले. यात एक अट्टल बदमाश चेनू पहेलवान याच्याशी शकीला चांगलीच जमायची. छेनू पहेलवानच्या आश्रयाखाली शकीलाने हळूहळू तिचा व्यवसाय वाढवायला सुरुवात केली आणि एक दिवस ती दिल्लीची लेडी डॉन बनली.

तिचा धंदाच एवढा वाढला कि, शकीलाचे नाव जुगार आणि दारूच्या अवैध धंद्यात वारंवार पुढं येऊ लागल. शकरपूर पोलिस स्टेशनच्या नोंदीनुसार, ‘बॅड करेक्टर’ म्हणून ओळखली जाणारी शकीला पूर्वी भाजी विकायची, पण हळूहळू तिने जुगार आणि अवैध दारूचा व्यवसाय करायला सुरुवात केली. खरे तर छेनुच्या टोळीचे गुंड तिच्याअड्ड्यावर सारखेच यायला लागले होते आणि त्यातूनच तिचा धंदा फुलला फळला होता.

आता यामुळे काय झालं तर दिल्लीत टोळी युद्ध वाढू लागली. लोक दहशतीखाली वावरू लागले. त्यामुळे २०१४ साली, जिल्हा आयुक्तांनी एक आदेश काढला केला होता ,ज्यानुसार शकीलाच्या दिल्लीतील प्रवेशावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. थोडक्यात शकिलाला तडीपार करण्यात आलं होत. मात्र, उच्च न्यायालयाने आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती.

यानंतरही शकीलाविरुद्धचे गुन्हे कमी झाले नाहीत. तिच्यावर २१ गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर जुगार अड्डा चालवणे, तस्करी, हल्ला, खुनाचा प्रयत्न अशी प्रकरणेही आहेत. तिच्या गॅंग मध्ये तिचा भाऊ मन्नू उर्फ ​​अनिश खान हा देखील या व्यवसायात आला. आज तो तडीपार आहे आणि त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस आहे.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.