अफगाणिस्तानमध्ये दोन वेळच्या जेवणासाठी पोटची पोरं विकायची वेळ आलेय

खालिद हुसेनी यांच्या द काईट रनर, थाऊझन स्प्लेंडीड सन हि पुस्तक वाचल्यानंतर तालिबान राजवटीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीचं जे वर्णन डोळ्यापुढं उभं राहतं त्यानं तुमच्यापैकी अनेकांचं मन पिळवटून निघालं असेल. मध्यंतरी तालिबान राजवट गेल्यानंतर अफगाणी लोकांच्या जीवनात थोडातरी शांतता, स्थौर्य लाभेल अशी अशा वाटत होती. 

मात्र अमेरिकेने तडकाफडकीत सैन्य माघारी घेतलं आणि अफगाणिस्तानतल्या जनतेला पुन्हा नरक यातना सोसण्यास सोडून दिलं.

मिडियानं पण सुरवातीला  दिवसरात्र तालिबान चालवलं आणि विषय ट्रेण्डिंगमधून गेला की अफगाणिस्तानात आता काय चालूय याकडं कुणाचंच लक्ष नाहीये.  अफगाणीस्तानची परिस्तिथी दिवसेंदिवस खराबच होत चाललेय. अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकट देशासमोर आ वासून उभी आहेत.

अनेक वर्षांच्या संघर्षाच्या झाला सोसलेला फगाणिस्तान दुष्काळ, महामारी, आणि गरिबी यांच्याशी झुंज देत आहे.

 सुमारे २४ दशलक्ष लोक अन्नधान्यच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. या हिवाळ्यात निम्म्याहून अधिक लोकसंख्येला उपासमारीचा सामना करावा लागणार आहे. अफगाणिस्तान मध्ये या वर्षी ९७ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली येऊ शकते. अशी माहिती युनाइटेड नेशनच्या वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचे अध्यक्ष डेव्हिड बेसली यांनी दिली आहे.

“अफगाणिस्तान आता ज्या संकटाचा  सामना करत आहे ते आपत्तीजनक आहे. अफगाणिस्तानच्या एकूण ४० दशलक्ष लोकसंख्येपैकी २४दशलक्ष लोकसंख्या आज उपासमारीच्या उंबरठयावर उभी आहे” असं डेव्हिड बेसली यांनी म्हटलं आहे.

आणि इतर कोणत्याही संघर्षाप्रमाणे अफगाणिस्तानच्या या भयावह परीस्ठीच्या सगळ्यात जास्त झळा पोहचत आहेत स्त्रिया आणि लहान मुलांना. 

दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून आता या स्त्रियांना आपला पोटाची पोरं विकावी लागत आहेत. विकत घेणारा किमान त्यांना खायला तरी घालेल अशा आशेवर या महिला आपली मुले पैश्याच्या बदल्यात दुसऱ्याकडे सोपवत आहेत.

एका  मुलाखतीत, बेसली यांनी अफगाणिस्तानमध्ये त्यांना भेटलेल्या एका महिलेची गोष्ट सांगितली ज्यामध्ये त्या महिलेला तिच्या मुलीला किमान  चांगले खायला मिळेल या आशेने दुसऱ्या कुटुंबाला विकण्यास भाग पाडले गेले.

सध्याच्या उपासमारीचे संकट सोडवण्यासाठी बेसली यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना मदतीचे आव्हान केले आहे.

 “कोविडच्या काळात जगातील अब्जाधीशांनी अभूतपूर्व पैसा कमावला आहे. त्यांनी प्रतिदिन $5.2 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त निव्वळ संपत्ती वाढली आहे. त्यामुळं अफगाणिस्तानातील या अल्पकालीन संकटांना तोंड देण्यासाठी या धनाढ्य व्यक्तींनी किमान आपल्या एक दिवसाची संपत्ती वाढ दिली तर पुरेसी आहे ” असे बेसलीयांचे म्हणणे आहे.

त्यामुळं अफगाणीस्तानाच्या या परिस्तिथीकडं बघून आता तरी जगातल्या श्रीमंत व्यक्ती आणि देश समोर येतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अफगाणिस्तानच्या आजच्या परिस्थितीला अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इतर मित्रराष्ट्रांनी लादलेलं युद्धही तितकंच जबबाबदार आहे. त्यामुळे अश्यावेळी अफगाणिस्तानला मदत करणं या देशांची जबाबदारी असल्याचंही जाणकारांचं  म्हणणं आहे. आणि जर या देशांनी मदत केली नाही तर अफगाणिस्तानातून स्तलांतराचे लोंढे या देशांकडे मदतीसाठी बाहेर पडतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  

 हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.