या लाजिरवाण्या पराभवानंतर अमरिंदर सिंग काँग्रेस मध्ये परतले होते

कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या राजकारणातलं आणि घराणेशाहीतलं महत्वाचं नाव. माजी मुख्यमंत्री असलेले कॅप्टन एकेकाळी पंजाब काँग्रेसचा चेहरा मानले जायचे. त्यांनी दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलाय. काँग्रेस हायकमांडचा सगळ्यात विश्वासू नेता म्हणून त्यांची ओळख होती.

पण यंदा निवणुकीच्या ऐन टायमाला पक्षांतर्गत वाद झाले आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागलं, एवढंच नाही तर त्यांनी पक्षाला सुद्धा रामराम ठोकला. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कॅप्टन भाजपमध्ये सामील होणार अश्या चर्चा होत्या, पण त्यांनी कुठल्याही पक्षात सामील न होता स्वतःचा वेगळा ‘पंजाब लोक काँग्रेस’ हा पक्ष सतःपण केला.

आता त्यांनी आपल्या ना नव्या पक्षासोबत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, पण तरीसुद्धा त्यांच्यापुढं मोठं राजकीय आव्हान आहे. पण तस पाहिलं तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ही काही पहिली वेळ नाही. त्यांचा राजकीय प्रवास पहिला तर बऱ्याचदा चढ- उत्तर पाहायला मिळालेत. 

तर त्यांच्या  सुरुवात झाली १९८० दशकांत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून अमरिंदर सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसला पंजाबमध्ये चेहऱ्याची गरज होती आणि कॅप्टनलाही जोरदार सुरुवात हवी होती. अशा परिस्थितीत राजीव गांधींनी आपला ‘मित्र’ अमरिंदरवर विश्वास व्यक्त केला आणि अमरिंदरने तो विश्वास कायमचा जिंकून घेतला.

पण त्यानंतर चार वर्षांनंतर सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई झाली तेव्हा कॅप्टन काँग्रेसवरच चिडले. त्यांचा राग एवढा होता की त्यांनी एका झटक्यात काँग्रेस पक्ष सोडला आणि अकाली दलात प्रवेश केला.

 पण कॅप्टन यांचा सिक्का अकाली दलात जास्त वेळ चालला नाही.  अकाली सरकारमध्ये ते मंत्री नक्कीच झाले, पण स्वप्ने मोठी होती. या कारणास्तव, पंजाबच्या राजकारणात स्वत: ला स्थापित करण्यासाठी, कॅप्टनने १९९२ मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला. नाव ठेवलं अकाली दल पंथक. ६ वर्षे अमरिंदर सिंग या पक्षाच्या माध्यमातून स्वतःला पंजाबचा राजा बनवण्याचा प्रयत्न करत राहिले. पण राजा होण्यापासून दूर राहिल्याने त्यांच्या राजकारणाची सर्वात मोठी पडझड त्या काळात दिसून आली.

१९९८ ते साल जेव्हा कॅप्टन अमरिंदर पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या जोरावर सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहत होते. स्वतः कॅप्टनने पटियाला मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. ते विजयाचा झेंडा फडकावतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्या समोर शिरोमणी अकाली दलाचे प्राध्यापक प्रेमसिंह चंदूमाजरा उभे होते. काटे कि टक्कर पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात होते. पण मतमोजणीच्या दिवशी सर्वचं अंदाज फोल ठरले.

प्रोफेसर प्रेमसिंग चंदूमाजरा इतक्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले की कॅप्टनला त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता निवडणूक हरणे ही काही मोठी गोष्ट नव्हती. पण त्या निवडणुकीत कॅप्टनच्या पक्षाचा फक्त पराभवच झाला नव्हता, तर त्यांना फक्त ७५६ मते मिळालेली. हे चित्र सर्वांनासाठीच आश्चर्याचा धक्का देणारं होत. खुद्द कॅप्टन यांना सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसणं अवघड झालं होत.

पण  कॅप्टन अमरिंदर सिंग यांना तो पराभव मोठा धडा देऊन गेला. त्यांनतर कॅप्टन यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यानंतर त्या पक्षाच्या मदतीने पंजाबच्या राजकारणात त्यांचा दर्जा वाढवला. जस कि आधी सांगितलं, ते दोन वेळा मुख्यमंत्री झाले, पंजाब काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आणि अनेक प्रसंगी पक्षाला अडचणीत साथ सुद्धा दिली. 

हे ही वाच भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.