स्वातंत्र चळवळ ते आजच्या मंदिर मशिदीपर्यन्त भारताची भोंग्याची गरज “आहुजा” भागवतेत

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा नारा देण्यात येत होता. मात्र, ज्या भोंग्यांवरून हा नारा देण्यात येत असे तो परदेशी असायचे. सभा कुठलीही असली तरी परदेशातून आणलेल्या स्पीकर, भोंग्याची मदत घ्यावी लागायची.

एका देशभक्त व्यापाऱ्याने ही गोष्ट हेरली. 

ही वेळ होती जेव्हा भारताचा आणि तंत्रज्ञानाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता. भोंगे, स्पीकर मागवणे आर्थिक दृष्ट्या अवघड होतेच. एकदा नादुरुस्त झाले म्हणजे फेकण्याची वेळ यायची. अशावेळी आपल्याच देशात भोंगे, स्पीकर का बनवले जाऊ नये, जे की स्वस्त आणि स्वदेशी असेल. अशी संकल्पना दिल्लीतील एक व्यापाराला सुचली आणि त्यावर काम केले. 

स्वदेशी भोंगे, स्पीकर असायला हवे अशी संकल्पना सुचणारे व्यापारी होते अमरनाथ आहुजा

एक वेळ होता सभेतील आवाज सगळ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी परदेशी भोंग्यांशिवाय पर्याय नव्हता. १९४० मध्ये अहुजा रेडिओचे संस्थापक अमरनाथ आहुजा यांनी हे चॅलेंज स्वीकारले. साऊंड सिस्टीमच्या बाबतीत भारत जगाच्या नकाशावर झळकेल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली.

१९४० मध्ये केवळ भारतीयांना सोबत घेऊन आहुजा कंपनीची मुहूर्तवेढ रोवली. लाखोंची सभा जरी असेल त्यांच्या पर्यंत पोचणार आवाज हा भारतीय स्पीकर मधला असायला हवा असं निश्चय करूनच अमरनाथ आहुजा कामाला लागले होते. 

आहुजानी स्वदेशी साऊंड सिस्टीम क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवले.  

भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आहुजाच्या पहिल्या फॅक्टीचे उदघाटन केले.

आहुजा कंपनीची पहिली फॅक्टरी उत्तरप्रदेश मधील नोयडा येथे तब्बल ३८ हजार स्क्वेअर फुट उभी करण्यात आली होती. १९५८ मध्ये तिचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Jawaharlal Nehru visits the Ahuja Factory

यानंतर आहुजा कंपनीच्या प्रोडक्ट भारतभर प्रसिद्ध झाले होते. त्यांना चांगलीच मागणी वाढली होती. ही फॅक्टरी कमी पडू लागली होती. त्यामुळे १९७० मध्ये दुसरी ५२ हजार स्क्वेअर फुटची फॅक्टरी सुरु करण्यात आली. 

आताच्या फॅक्टरीचा विचार केला तर ती तब्बल २ लाख ५० हजार स्क्वेअर फुट जागेवर उभी आहे.  

पुढे १९९१  ग्लोबलायजेशनच वार आलं आणि परदेशी कंपन्यांना देशात मोकळं रान मिळाल. जगप्रसिद्धजेबीएल सारख्या कंपन्या भारतात येऊ लागल्या होत्या. मात्र, याचा आहुजाला काही फरक पडला नाही. स्पीकर आणि अॅम्प्लीफाय बनवणाऱ्या आहुजाने पुढच्या कार्यकाळात वेळेनुसार बदल करून घेतले. 

भारत सरकाच्या वतीने २००६ मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार देऊन आहुजाला गौरविण्यात आले होते. 

इतर देशांमध्ये आवाजाच्या बाबतीत नियम कडक आहेत. यावर आहुजाची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टिमने काम केले. आंतरराष्ट्रीय नियमांचा अभ्यास करून आपले प्रोडक्ट तयार केले. त्यामळे आहुजाला  जगभरात निर्यात करता आली. ५ खंड आणि ५० पेक्षा जास्त देशांमध्ये आहुजाचे प्रोडक्ट निर्यात होतात. २००१ मध्ये भारतातून सर्वाधिक इलेकट्रोनिक वस्तू  करणारी कंपनी म्हणून आहुजाला गौरविण्यात आले होते.   

वक्ता कितीही भारी असून चालत नाही, लोकांपर्यंत आवाज पोहोचविणारी सिस्टीम पण कडक पाहिजे.

मागची ८० वर्ष हे काम आहुजा करत आहे. 

कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो वा घरगुती जिकडे पाहावं तिकडे आहुजाची सिस्टीम असते. मागच्या ८० वर्षांपासून आहुजा सिस्टीमने मोदींपासून ते तुमचा – आमचा आवाज लोकांपर्यत पोहचविण्याचं काम केलं आहे.   

ॲम्प्लीफायर्स, मिक्सर, मायक्रोफोन, स्पीकर्स, पॉवर स्पीकर, कॉन्फरन्स सिस्टम या सगळ्यात बाप कंपनी म्हणून आहुजा ओळखली जाते. आजच्या घडीला देशात ७०० पेक्षा अधिक डीलर आहुजाचे आहेत. कंपनीची खासियत म्हणजे मार्केट मध्ये एवढा बोलबाला असतांना तिची कुठलीही जाहिरात करण्यात येत नाही. लोक अजूनही माऊथ पब्लिसिटीवर आहुजाच्या प्रोडक्ट घेत असतात. 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.