अजय देवगण खांद्यावर बसून देवदर्शनाला गेला आणि लोकांना ‘फूल और काटे’ची आठवण झाली

अजय देवगण म्हणजे लय जणांच्या काळजातला विषय. आमच्या आळीतलं एक पोरगं, ब्रेकअप झाल्यावर केसांना ब्लेड मारुन सेम अजय देवगण स्टाईल मारायचं. त्याला हे अजिबात चांगलं दिसत नव्हतं, पण तरी भावानं हेअरस्टाईल बदलली नाही. कारण सिम्पल होतं ती अजय देवगणसारखी हेअरस्टाईल होती… बास विषय संपला.

तसं ते पोरगं, वयानं लय मोठं पण आम्ही सगळे त्याला दिलजले आवाज द्यायचो. एकदा दिलजलेला विचारलं, ”भावा कॉलेजचा पहिला दिवस आहे, कॉलेजमध्ये हवा होईल अशी कायतरी एंट्री झाली पाहिजे. जरा कायतर टीप दे की.” भावानं आम्हाला एक फोटो दाखवला…

अजय देवगण दोन वेगळ्या गाड्यांवर पाय फाकवुन बसलाय- हा तोच फुल और कांटे वाला.

आता आम्ही त्याला येड्यात काढलं खरं, पण दिलजले कधी कॉलेजला गेलाच नव्हता, त्याच्या जिंदगीत एकच विषय, एकच शिक्षक आणि एकच टॉपिक अजय देवगण. त्यानंतर गोलमाल सिरीजमध्ये देवगण शेठ आधी दोन सुपरबाइकवर पाय टाकून आले, मग दोन हमरमध्ये पाय टाकून आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये थेट वाकड्या कारवर उभा राहून, तिन्ही पिक्चर आपण विसरू पण अजय देवगणची एंट्री अजिबात नाही.

तुम्ही म्हणाल भिडू त्याचे हे पिक्चर येऊन एवढे दिवस झाले, तुला आज कशी काय आठवण आली. तर आठवण यायचं कारण म्हणजे सध्या देवगण शेठ ट्रेंडिंगमध्ये आहेत, ते त्यांच्या शबरीमला भेटीमुळं. आता शबरीमला मंदिर हे अनेकांचं श्रद्धास्थान, तसंच अजय देवगणचंही.

तिकडं दर्शनाला जाणं काय सोपं नसतं, अनेक भक्त तिकडं दर्शनासाठी जाण्याचं व्रत पण पाळतात. माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तांनुसार अजयनंही व्रत पाळलं. सलग अकरा दिवस तो चटईवर झोपला. फक्त काळे कपडे घातले, दिवसातून दोनदा अय्यपा पूजा केली. कांदा लसूण नसलेलं व्हेजीटेरीयन जेवण खाल्लं. कुठंही जाताना भावानं पायात चप्पल घातली नाही. घामानं अंग भरलं, तरी परफ्युम वापरला नाही आणि दारुच्या थेंबालाही स्पर्श केला नाही.

हे वाचून सगळ्यांना वाटलं असणार, काय धार्मिक माणूस आहे. सगळी पथ्य पाळतोय. मग तरी दंगा का सुरु झालाय? तर भाऊ ज्या पद्धतीनं दर्शनाला गेला, ते काय लोकांना आवडलं नाही. म्हणजे झालं असं की, जसं फूल और कांटेमध्ये देवगण गाडीच्या सीटावर उभा राहून येतो, तसं हा दर्शनाला जाताना लोकांच्या खांद्यावर झोळीटाईप असतंय त्यात बसून गेला.

आता आपण पडलो लई दिलदार लोकं, आपण विचार केला की बाबा याचे हात, पाय दुखत असतील, याला अशक्तपणा आला असेल. पण शेठ सोशल मीडियावर बाकीची लोकं उखडली ना. लोकांचं म्हणणं होतं, की पिक्चरमध्ये हा लई टनाटना उड्या मारत पळत असतो? मग मंदिरात जायला काय धाड भरली? एक कार्यकर्ता म्हणला, एवढं नाटक करायचं होतं, तर ऑनलाईनच दर्शन घ्यायचं ना… एकानं डायरेक्ट विवेक ओबेरॉयशी तुलना केली. तो गडी लई पेटलेला वाटला, तो म्हणाला… ‘मायाभाई गेली अठरा वर्ष इकडं येतोय, तो दरवेळी चालत जातोय. मग या सिंघमला काय चालता येत नव्हतं?’

थोडक्यात काय, तर कुठलाही पिक्चर येत नसताना अजय देवगण लय शिव्या खातोय. आणि कारण काय तर एंट्री, याच गोष्टीमुळं तो एकदा लई फेमस झाला होता आणि आज बघा. 

आता ही स्टोरी आम्ही आमच्या दिलजलेला सांगितली, तो म्हणला, ‘भावा मला सगळं माहितीये.’ आम्ही पडलो मीडियावाले आम्ही त्याला विचारलं, ‘कसं वाटतंय?’

नेट गंडलं असेल तर इथं अजय देवगण रडतोय असं इमॅजिन कर भिडू
त्यानं आम्हाला हा फोटो दाखवला

 विषयच संपला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.