कधीकाळी याच रुग्णालयात अटलबिहारी आणिबाणी विरोधात मैफिल रंगवायचे.

अटलबिहारी वाजपेयींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. देशभर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली जात आहे. वाजपेयी सध्या ज्या रुग्णालयात आहेत तेच रुग्णालय हसत खेळत्या वाजपेयींच्या पार्टीचं देखील साक्षीदार ठरलं होतं हे सांगितल तर अनेकांना विश्वास बसणं देखील कठिण होईल. 

हा किस्सा आहे तेव्हाचा जेव्हा देशभर इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लागू केली होती. 

देशभर इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावली होती. आपल्या विरोधात बोलणाऱ्या वर्तमानपत्रांपासून ते राजकिय नेत्यांपर्यन्त सर्वांवरच दडपशाहीच धोरणं या आणिबाणीमध्ये लागू करण्यात आलं होतं. याच काळात इंदिरा गांधी यांनी आणिबाणीला विरोध करणाऱ्या नेत्यांना अटक करुन बंगलोरच्या जेलमध्ये कैद केलं होतं. 

देशभरातल्या इंदिरा विरोधी नेत्यांमध्ये अटल बिहारी यांच नाव खूपच वरचं होतं. त्यांना देखील इतर नेत्यांबरोबर बंगलोरच्या जेलमध्येच कैद करण्यात आलं होतं. मात्र अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे अटलबिहारींना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. अटल बिहारी एम्स रुग्णालयात दाखल झाले. 

Screen Shot 2018 06 12 at 3.04.42 PM

याच रुग्णालयातील त्यांच्या खोलीच्या शेजारी डीपी तिवारी यांना दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा झाली.  वाजपेयी खाण्यापिण्याचे शौकिन असल्यानं त्यांनी आपला मोर्चा डीपी तिवारी यांच्या खोलीकडे नेला. डिपी तिवारी यांच्या खोलीत शिरतच वाजपेयींनी त्यांना विचारलं, क्या देवी प्रसाद शाम के लिएं क्या व्यवस्था हैं ? डिपी तिवारी यांना वाजपेयींच्या या प्रश्नाचा रोख लगेच समजला. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना निरोप देवून व्हिस्कीची बाटली मागवून घेतली. 

रात्र झाली आणि चिकण आणि व्हिस्कीच्या घोटामध्ये अटल बिहारी यांची पार्टी रंगली. याच एम्सच्या भितींनी वाजपेयींच हास्य ऐकलं, कविता ऐकल्या. इंदिरा गांधीच्या आणिबाणीच्या विरोधात रंगलेल्या गप्पांची मैफिल देखील ऐकली. 

Leave A Reply

Your email address will not be published.