हा साधा इतिहास नाही तर आत्तापर्यंत टेस्ट क्रिकेटमधली सर्वात भारी इनिंग आहे.

केविन पीटरसन पासून ते क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर पर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू इंग्लंडच्या बेन स्टोक्सचे अभिनंदन करत आहेत. होय तोच बेन स्टोक्स ज्याने इंग्लंडला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचवून इंग्लंडला विश्वविजेता बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तोच बेन स्टोक्स ज्याने फायनलमध्ये अंपायरच्या चुकीने मिळालेल्या ओवर थ्रो बद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. तेव्हा सुद्धा क्रिकेटपंडितांनी त्याच्या या खिलाडू वृत्तीची प्रशंसा केली होती. पण यावेळी कसली चूक झालेली नसून त्याने ज्याप्रकारे बॅटिंग केलीय तिने इतिहास घडवलाय.

साधा इतिहास नाही तर आत्ता पर्यंत टेस्ट क्रिकेटमधली जगातील सर्वात भारी इनिंग असं या इनिंगला म्हटल जातंय.

तसं बघायला गेलं तर कसोटी क्रिकेटला खर क्रिकेट म्हटल जात. यात डॉन ब्रॅडमन पासून ते राहुल द्रविडपर्यंत अनेकांनी जबरदस्त इनिंग खेळल्या आहेत. लाराने ठोकलेल्या चारशे धावा, सेहवागच्या झटपट ३००, लक्ष्मणने काढलेल्या फॉलोओन नंतरच्या २८३ अशा अनेक इनिंग आहेत ज्यांना आपण कधीच विसरू शकलेलो नाही.

मग बेन स्टोक्सने काय असा चमत्कार केला की सगळेजण त्याला आत्ता पर्यंतची सर्वोत्कृष्ट इनिंग म्हणत आहेत?

तर सध्या क्रिकेट मधील सर्वात कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वात मोठी आणि तितकीच वादग्रस्त असलेली अॅशेस सिरीज सुरुय. आता या अशेस सिरीजचा इतिहास सांगण्याची वेगळी गरज नाही. यात खेळाडू तर एकमेकांना स्लेजिंग करतातच पण सोबत स्टेडीयम मधी उभी लोकं पण काय कमी नसतात. बोन्ड्रीवर उभ्या  असलेल्या विरुद्ध टीमच्या प्लेयरला मोक्कार शिव्या देतात, टोमणे मारतातचं. पण जर आपल्या देशाची टीम हरत असेल आणि त्यात खराब कामगिरी केलेला प्लेयर बोन्ड्रीवर आला तर ती लोकं त्यालासुद्धा सोडत नाहित.

इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या पाच टेस्ट सिरीजच्या पहिल्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा दणकून पराभव केला. त्यानंतर २२ ऑगस्टपासून दुसरी टेस्ट मॅच सुरु झाली. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॉलींग करण्याच्या निर्णय घेतला. कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडच्या बोलर्सनी ऑस्ट्रेलियाचा डाव १७९ रन्स मध्ये गुंडाळला. हि मॅच इंग्लंड जिंकेल अशी आशा निर्माण होत असतानाच १७९ रन्सचा पाठलाग करण्यास आलेली इंग्लंडची टीम अवघ्या ६७ रन्सवर गारद झाली. इथेच इंग्लंड हरल्याची चिन्ह दिसू लागली होती.

दुसऱ्या इंनिंगमध्ये ११२ रन्सची बढत मिळालेल्या ऑस्ट्रेलियाने २४६ रन्स बनवून इंग्लड पुढे ३५९ रन्सचे विशाल आव्हान ठेवले. इंग्लंडची मागील कामगिरी बघता हे अशक्य वाटत होत. आणि झालं ही तसच. इंग्लंडची टॉप ऑर्डर २००च्या आतच कोसळली.

पहिल्या ४ विकेट्स गेल्यावर ५व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यास आला बेन स्टोक्स. त्याने हळूहळू डाव सावरण्यास सुरुवात केली. एकीकडे बेन स्टोक्स टिकून असतांना दुसरीकडे विकेट्सची गळती चालूच होती. बघता बघता इंग्लंडच्या ९ विकेट्स पडल्या आणि स्कोअर बोर्डवर २८६/९ असा आकडा आला.

इंग्लंडला जिंकण्यासाठी अजून ७३ रन्स हवे होते आणि हातात फक्त एक विकेट बाकी होती. तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी फक्त १ विकेट हवी होती आणि हातात अजून एक पूर्ण दिवस होता. त्यामुळे त्यांना काही फारस टेन्शन नव्हत. दहाव्या क्रमांकावर स्पिनर जॅक लीच खेळायला आला. एका टोकावर लीच टिकून खेळण्यास सुरुवात केली तर दुसऱ्या टोकावर असलेल्या बेन स्टोक्सने लीचकडे कमी स्ट्राईक जाऊ देत फटकेबाजी चालू केली.

आणि हा हा म्हणता त्याने ४२ बॉल्समध्ये ४ चौके आणि ७ सिक्सर मारत ७४ रन्स वसूल केले. लिचने दुसऱ्या साईडला फक्त एक रन काढली. तरी देखील लिचने काढलेली एक रन सुद्धा महत्वाची आहेच. त्यापेक्षाही त्याने शेवटपर्यंत बेन स्टोक्सची साथ सोडली नाही हे जास्त महत्वाच.

कम्निसच्या चौथ्या बॉलवर चौका मारून स्टोक्सने थाटात इंग्लंडच्या विजयावर शिक्का मोर्बत केला. या चित्तथरारक मॅचमध्ये इंग्लंड केवळ १ विकेटने जिंकला. याच सार श्रेय जात ते बेन स्टोक्स आणि जॅक लिचच्या ७६ धावांच्या जबरदस्त पार्टनरशिपला.

स्टोक्सने २१९ बॉल्समध्ये १३५ रन्स काढलेले. याचसोबत त्याने पहिल्या इंनिंगमध्ये एक तर दुसऱ्या इंनिंगमध्ये ३ विकेट्स सुद्धा घेतलेल्या. आ ॅल राउंडर कामगिरीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ देण्यात आला. त्याच्या या खेळीचे जगभरातून कौतुक होत आहे. ही मॅच क्रिकेटच्या अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.