कधीही चर्चेत न आलेले कै. बिंदुमाधव ठाकरे हे निहार अंकिताच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. बातमी प्रकाशित झाली तेच बिंदूमाधव यांचा मुलगा या मथळ्याखाली.

त्यामळे आज बऱ्याच दिवसांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दिवंगत चिरंजीवाचं नाव चर्चेत आलं. तसं तर कधीच, अगदी कोणत्याच कारणाने चर्चेत आलं नसलेल नाव म्हणजे बिंदुमाधव.

जून १९४८  मध्ये २१ वर्षांचे बाळ ठाकरे यांनी सोळा वर्षांच्या सरला वैद्य यांच्याशी विवाह केला. लग्नानंतरचे त्यांचे नाव मीना किंवा मीनाताई असे ठरले आणि घरगुती नाव माँ पुढे झालं. या दांपत्याला तीन मुले झाली. उद्धव यांचा जन्म २७ जुलै १९६० साली झाला. त्यांचे थोरले भाऊ बिंदुमाधव उर्फ बिंदा आणि जयदेव होते. बिंदाचा  जन्म १९५२ आणि जयदेव यांचा जन्म १९५५ साली झाला. या सगळ्या मुलांची अधिकृत नाव त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी ठेवली.

बाळ ठाकरे यांचे थोरले चिरंजीव बिंदा यांनी मुद्रण तंत्रज्ञानातील पदविका संपादन केली आणि नंतर चित्रपट व्यवसायात उडी घेतली. तसेच ते उपहारगृहाचा व्यवसायातही सक्रिय झाले. ताडदेव इथं ड्रम्स बीट रेस्टॉरंट आणि कांदिवलीत एक हॉटेल त्यांनी सुरू केलं. 

बिंदाटोन या ब्रांड नावाने त्यांनी संगीताच्या काही कॅसेट काढल्या. समुद्र व्हिडिओ या नावाचे एक निर्मिती केंद्र ही चालू केले. नदीम-श्रवण यांचा एक म्युझिक अल्बम त्यांनी काढला आणि नाना पाटेकर मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका असलेला अग्निसाक्षी या चित्रपटाची निर्मिती सुद्धा बिंदा यांनी केली.

ठाकरे कुटुंबीय एकत्र राहत असले तरी बिंदा त्यांच्यापासून वेगळे राहत. पुढे २० एप्रिल १९९६ रोजी लोणावळा इथं एका मोटार अपघातात बिंदा यांचा मृत्यू झाला. बिंदांच्या आईच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच ही दुर्घटना घडली.  त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता.

आता त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निहार ठाकरे यांच लग्न अंकिता पाटील यांच्याशी ठरलं आहे. निहारच एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे.

तर अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

२०१४ च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

१९९५ सालात पहिल्यांदा आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील निवडून तर आलेच आणि शिवसेना भाजप युतीच्या सरकारात सहयोगी मंत्री म्हणून सामील झाले होते. पुढे त्यांचा प्रवास हा काँग्रेस व्हाया भाजप असा असला तरी अंकीता आणि निहार यांच्या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे व पाटील घराण्याचे संबंध दृढ होताना दिसत आहेत.

हे ही वाच भिडू.

English Summary: Ankita, daughter of former minister of Indapur in Pune district and BJP leader Harshvardhan Patil, will be married to Nihar, son of late Bindu Madhav Thackeray, son of Shiv Sena chief Balasaheb Thackeray.

Web Title: Bindumadhav Thackeray’s son Nihar Thackeray will get-marry to Ankita-Patil

1 Comment
  1. Bhushan says

    उत्तर महाराष्ट्र बद्दल काही लिहा..

Leave A Reply

Your email address will not be published.