लीना यांना एमबीए करण्यासाठी वडिलांची मनधरणी करावी लागली होती

आपल्या भारतीय वंशाच्या कित्येक नागरिकांनी वेगवेगळ्या देशात आपल्या भारताचं नाव गाजवलयं. कोणी राजकारणात एन्ट्री मारून देशाचा पदभार सांभाळतयं, तर कोणी बड्या कंपनीचा.याचं यादीत आता आणखीन एक नाव जोडलं जाणार आहे. ते म्हणजे लीना नायर यांचं.

भारतीय वंशाच्या लीना नायर यांना मंगळवारी फ्रांसच्या लक्झरी ग्रुप शनेलने (Chanel) लंडनमध्ये आपली ग्लोबल चीफ एग्जिक्युटिव म्हणून नियुक्त केलयं. 

याआधी त्या युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) होत्या, पण आता त्यांनी राजीनामा दिला आहे. लीना नायर नवीन वर्षापासून या ग्रुपमध्ये सामील होणार असल्याचं समजतयं.

शनेलशी जोडलं गेल्यानंतर लीना म्हणाल्या,

“एका प्रतिष्ठित आणि प्रशंसनीय कंपनीची जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचा मला सन्मान वाटतो.”

महत्त्वाचं म्हणजे लीना नायर यांचा सगळ्या देशाला अभिमान तर आहेच, पण त्यातल्यात्यात त्यांच्या या कामगिरीमूळं आपल्या कोल्हापूरची सुद्धा शान वाढलीये. 

कारण लीना नायर या मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांनी आपलं सुरुवातीचं शिक्षण कोल्हापुरातल्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून केलं. सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग केलं.

आता त्यांना एमबीए करायचं होतं. पण एमबीए पूर्ण करताना त्यांना वडिलांचा आधी विरोध सहन करावा लागला. जमशेदपूरला अभ्यासासाठी जायचं होतं, जिथं ट्रेनने पोहोचायला जवळपास ४८ तास लागायचे. ही गोष्ट वडिलांना पटवून देणं मोठं अवघड काम ज्यासाठी त्यांना बरीच मनधरणी करावी लागली.

पण शेवटी वडिलांनी त्यांचं म्हणणं ऐकलं. आणि 1990-92 च्या दरम्यान जमशेदपूरच्या झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले.

आपलं शिक्षण पूर्ण करून 2013 मध्ये लीना लंडनला गेल्या. त्या वेळी, त्यांना अँग्लो-डच कंपनीच्या लंडन मुख्यालयात नेतृत्व आणि संघटना विकासाचे जागतिक उपाध्यक्ष बनवण्यात आले. यानंतर, 2016 मध्ये, त्या युनिलिव्हरच्या पहिल्या महिला, पहिल्या आशियायी आणि सर्वात तरुण CHRO बनल्या.

नायर यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक एचआर इंटरवेशन केले. त्यापैकी करिअर बाय चॉईस हा उपक्रम सर्वाधिक कौतुकास्पद ठरला. तिचं त्यांच्यावर 1.50 लाख कर्मचाऱ्यांची जबाबदारी होती.

विशेष म्हणजे लीना नायर सीईओ म्हणून एखाद्या ग्लोबल कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला होणार आहे. या यादीत पहिले नाव म्हणजे इंद्रा नूयी. ज्यांनी पेप्सिकोचे सीईओ म्हणून नेतृत्व केले.

Fortune च्या 2021 च्या सर्वात पॉवरफुल महिलांच्या यादीत सुद्धा त्यांनी नावं मिळवलयं.

आता त्या शनेलच्या सीईओ बनल्यानंतर त्यांचं देशभरात कौतूक होते. लीना यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले –

शनेलमध्ये सीईओ म्हणून काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. शनेल ही नामांकित कंपनी आहे. मी युनिलिव्हरमध्ये काम केले याचा मला नेहमीच अभिमान वाटेल. युनिलिव्हरकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे.

“तसचं मी सोशल मीडियावर सगळ्यांच्या कमेंट वाचतेयं. मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही, पण तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद,” असं म्हणता लीना यांनी सर्वांचं आभार मानलयं.

अजून तरी त्यांनी आपला पदभार स्वीकारला नाही, पण लीना नायर यांच्यामुळे पुन्हा एकदा भारताचा डंका अख्ख्या जगभरात गाजलायं, एवढं मात्र नक्की.

हे ही वाचा भिडू :

English Summary: French luxury fashion house Chanel has named Leena Nair, who previously served as Unilever’s top HR executive, as its new global CEO. With this, Nair has joined a growing list of Indian-origin executives who have taken up top roles in some of the world’s biggest companies in recent years.

 

WebTitle: Chanel New CEO: Indian Origin Chanel CEO Leena Nair had to persuade her father for MBA

Leave A Reply

Your email address will not be published.