फॉर्ब्सची सर्वात श्रीमंतांच्या यादीत या भारतीय महिलांनी आपला डंका वाजवलाय…

स्त्री शक्ती काय काय करू शकते याचे अनेक उदाहरणं आपण ऐकले पाहिलेले आहेत. व्यावसायिक क्षेत्रातसुद्धा महिलांचा हात कुणी धरू शकत नाही इतक्या वेगाने महिला सक्रिय झालेल्या आहेत. जागतिक पातळीवर सुद्धा भारतीय महिलांचा बोलबाला आहे. आज फॉर्ब्सच्या यादीत असलेल्या टॉप 6 भारतीय महिलांविषयी आपण जाणून घेऊया. ‘फोर्ब्स’ इंडिया हे फॉर्ब्सचच एक इंडियन एडिशन आहे. ज्याला रिलायन्स इंडस्ट्रीजचा मीडिया ग्रुप नेटवर्क 18 सांभाळतो.

दरवर्षी ते भारतातल्या 100 सगळ्यात श्रीमंत लोकांची लिस्ट जाहीर करत असतात. या वर्षी फॉर्ब्ज इंडियाने 100 सगळ्यात जास्त श्रीमंत भारतीय लोकांची यादी जाहीर केली आहे आणि त्यात 6 भारतीय महिलांची नावे आहेत. तर जाणून घेऊया या 6 श्रीमंत भारतीय महिलांबद्दल.

 सावित्री जिंदल

फॉर्ब्सच्या लिस्टमध्ये सगळ्यात श्रीमंत महिलांपैकी पहिल्या क्रमांकावर आहेत ओ पी जिंदल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदल. व्यावसायिक क्षेत्रात जिंदाल ग्रुप हा सगळ्यात श्रीमंत मानला जातो. सावित्री जिंदल यांची एकूण संपत्ती 18 बिलियन डॉलर आहे म्हणजे जवळपास 13. 46 लाख करोड रुपये इतकी आहे. मागच्या एक वर्षाच्या कालावधीत त्यांच्या संपत्तीत 13 बिलियनची वाढ झाली आहे.

विनोद रॉय गुप्ता

फॉर्ब्सच्या लिस्टमधल्या सगळ्यात श्रीमंत महिलांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे भारताच्या विनोद रॉय गुप्ता. ज्या हॅवल्स ग्रुपच्या अधिकारीपदी आहेत. यांची एकूण संपत्ती आहे 7.6 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 5.68 लाख करोड रुपये नोंदवण्यात आलेली आहे. जागतिक फॉर्ब्सच्या यादीत विनोद रॉय गुप्ता या 24 व्या स्थानी आहेत.

 लीना तिवारी

भारताच्या तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत लीना तिवारी. जो USV private limited च्या चेअरपर्सन आहेत. जागतिक फॉर्ब्सच्या यादीत लीना तिवारी या 43 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती आहे 4.4 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 3.28 लाख करोड रुपये इतकी आहे.

 दिव्या गोकुलनाथ

सगळ्यात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे दिव्या गोकुलनाथ. दिव्या गोकुलनाथ या बायजुसच्या को फाउंडर आहेत सोबतच फॉर्ब्सच्या ऑल ओव्हर लिस्टमध्ये 47 व्या स्थानावर त्या आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती आहे 4.5 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 3.2 लाख करोड इतकी.

किरण मुजुमदार शॉ

श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे किरण मुजुमदार शॉ. फॉर्ब्सच्या ओव्हर ऑल रँकिंगमध्ये मुजुमदार यांचा क्रमांक हा 53 व्या लागतो. त्यांची एकूण संपत्ती ही 3.9 डॉलर इतकी आहे. म्हणजे जवळपास 2. 91 लाख करोड रुपये. किरण मुजुमदार या biocon च्या चेअरपर्सन आहेत.

 मल्लिका श्रीनिवासन

सहाव्या क्रमांकावर आहे मल्लिका श्रीनिवासन. त्या ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड ( TAFE ) च्या चेअर पर्सन आहेत आणि सोबतच मॅनेजींग डायरेक्टरसुद्धा आहेत. मल्लिका श्रीनिवासन यांची एकूण संपत्ती आहे 2.89 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 2.16 लाख करोड रुपये.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.