सावधान ! चीनने अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्याचा रिपोर्ट आलाय.

मागच्या जानेवारीमधील घटना आहे. सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला होता कि, लडाखनंतर चिनने ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये घुसखोरी केली होती. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने एक गाव वसवले असल्याची बातमी समोर आली होती. 

मग त्याच्या बरोबर १० महिन्यांनी पुन्हा तिच बातमी समोर येते कि, चीनने घुसखोरी करत अरुणाचल प्रदेशात एक गाव वसवलंय.

पेंटागॉन हे जे यूएस संरक्षण विभागाचे मुख्यालय आहे. अलीकडेच पेंटागॉनने भारतात चीनच्या घुसखोरीचा अहवाल दिला होता. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या वादग्रस्त भागात चीन गाव बांधत असल्याचा दावा करण्यात आला होता. 

चीनचे हे गाव वसवून भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण केला आहे. तर दुसरीकडे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी चीनने भारतीय भूमीवर कब्जा केल्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले होते आणि आता पुन्हा हा मुद्दा पेटला आहे. कारण अमेरिकेच्या संरक्षण विभाग चा पेंटागॉनच्या अहवाल आला आहे , या अहवालात अरुणाचल प्रदेशात चीनने केलेल्या बंदोबस्ताच्या दाव्यावर भारतीय सुरक्षा विभागाने तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. 

काय म्हंटले आहे या अहवालात ???

यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स किंवा पेंटागॉनने या अहवालात नमूद केलं की, चीनने अरुणाचल प्रदेशशी संलग्न वास्तविक नियंत्रण रेषेजवळ एलएसी पूर्वेकडील भागात एक मोठे गाव बांधले आहे.  गाव अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात हे गाव आहे. अहवालात पेंटागॉनने म्हटले आहे की, हा भाग तिबेट स्वायत्त प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये येतो. चीनने सुमारे साडेचार किलोमीटर आत घुसून येथे या गावात सुमारे १०० हून अधिक घरेही बांधण्यात आली आहेत, असा दावाही पेंटागॉनने केला आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या  पेंटागॉनच्या अहवालात म्हणलंय कि, अरुणाचल सेक्टरमधील एलएसीवर चिनने बांधलेले हे गाव चीनच्या ताब्यात आहे. या आधीच एकदा अरुणाचल प्रदेशच्या खासदाराने हे गाव असल्याचा इशारा दिला होता. 

तर इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुबनसिरी नावाचा परिसर, जिथे हे गाव वसले आहे, तो भाग सहा दशकांपूर्वी चीनच्या ताब्यात होता. संरक्षण प्रकरणाशी संबंधित एका सरकारी सूत्राने माध्यमांना सांगितले की, १९५९ मध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीने पीएलए आसाम रायफल पोस्टवर कब्जा केला आणि हा भाग ताब्यात घेतला.

पण हे गाव १९५९ पासूनच चीनने वसवलंय……

पण काही अशीही माहिती समोर आलीये कि, १९५९ मध्ये ज्या भागात चिनी सैन्याने कब्जा केला होता त्या भागात हे गाव चीनने वसवले आहे. १९५९ मध्ये, चिनी सैन्याने एका हल्ल्यानंतर अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात केलेल्या कारवाईत आसाम रायफल्सची चौकी ताब्यात घेतली. ही घटना लाँगजू म्हणून ओळखली जाते. त्यानंतरच चीनने या भागात गाव वसवले. काही संदर्भानुसार, अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील वादग्रस्त सीमेवरील गाव चीनच्या ताब्यात आहे. त्या भागात त्यांनी बराच काळ लष्कराची चौकी बांधली असून हे बांधकाम अचानक झालेले नाहीये तर चीन हि अशी घुसखोरी बऱ्याच  काळापासून करत आआला आहे.

आता या अहवालावर भारताची प्रतिक्रिया आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पेंटागॉनच्या अहवालाकडे लक्ष दिलं असल्याचं म्हणलं आहे.  परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “भारत सरकारने राजनैतिक माध्यमांतून अशा कारवायांचा नेहमीच कडाडून विरोध केला आहे. आणि भविष्यातही असेच करत राहीन.त्यामुळे चिंता नसी भारत सरकार लवकर याचा बंदोबस्त करणार असल्याची तयारी असल्याचं म्हणलं आहे”.  

 

भारत आपल्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या आणि धोका ठरणाऱ्या सर्व घडामोडींवर सतत नजर ठेवतो आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करतो.

याशिवाय भारत चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागात रस्ते आणि पूल बांधण्याचे काम वेगाने सुरू करत असल्याचे देखील अरिंदम बागची यांनी सांगितले आहे. याशिवाय पायाभूत सुविधांशी संबंधित इतर बांधकामांनाही गती देण्यात आली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे यामुळे सीमेवरील स्थानिक लोकांशी संपर्क सुलभ होईल.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.