या बॉम्बस्फोटाच्या एका घटनेमुळे पाकिस्तान आणि चीनच्या फ्रेंडशिपवर परिणाम झाला आहे.

पाकिस्तान आणि चीनची सदाबहार मैत्री संपूर्ण जगालाच माहिती आहे. 

पण आता यांच्यात ब्रेकअप होतं कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण अलीकडेच पाकिस्तानमध्ये एक स्फोट झाला आहे आणि त्यात चीनी नागरिक मारले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत आता वितुष्ट आले आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये गेलेल्या एका बसमध्ये चीनचे ४० नागरिक होते त्यातले काही चिनी इंजिनिअर तर काही मजूर प्रवास करत होते. त्यातील 9 चीनी नागरिक आणि फ्रंटियर कॉर्पसच्या दोन सैनिकांसह एकूण 13 जण या स्फोटात ठार झाले आहेत.

 चिनी अभियंता आणि कामगार घेऊन जाणाऱ्या बसचा स्फोट झाला.

त्याचवेळी या अपघातात अन्य 39 लोकं जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की स्फोट झाल्यानंतर हि बस एका खोल दरीत कोसळली.

पण हा स्फोट घडवून आणला नाही तर गॅस गळतीमुळे स्फोट झाला असं पाकिस्तानने म्हटले आहे, तर चीनने मात्र या स्फोटावर संशय व्यक्त केला आहे.  चीनच्या म्हणण्याप्रमाणे दहशतवादी हल्ल्यानंतर चीनचा सदाहरित मित्र पाकिस्तानवरील विश्वास गमावला आहे.

या स्फोटात आपले नागरिक बळी गेले यामुळे चीन मात्र आता सतर्क झाला आहे.

आता चीन त्यामार्गाने पावले उचलण्यास सुरुवात करत आहे. एका अहवालानुसार चीनने झालेल्या  स्फोटाची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानला विशेष तपास पथक पाठविले आहे. एवढेच नाही तर दोन्ही देशांमध्ये होणारी महत्त्वाची सीपीईसी बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचा पाकिस्तान सरकारला धक्का बसला आहे.

चीनच्या या निर्णयांनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आता गोंधळ उडाला आहे.

थोडक्यात चीनचा हे तपास पाठक पाठवण्याचा उद्देश असा आहे कि,  चीन पाकिस्तानचे वास्तव समोर आणू शकेल, बस स्फोटात नागरिकांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले, एकंदरीत चीन या प्रकरणाची सत्यता जाणू इच्छित आहे.

चीनचे बीजिंगमधले परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान हे या स्फोट प्रकरणावर पत्रकार परिषदेत म्हणाले, “चीनचा एक तपास करणारा संघ पाकिस्तानकडे रवाना केला जाईल. स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेतला जाईल. आम्ही पाकिस्तान सरकार देखील या प्रकरणात सखोलपणे विचार करण्यास सांगितले आहे, अपेक्षा आहे जी सरकार आम्हाला या तपासात सहकार्य करेल. त्यात बेकिंगमध्ये साखर नागरिकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जाईल.

या दहशतवादी हल्ल्यानंतर चीन आणि पाकिस्तानच्या संबंधांवर याचा गहन प्रभाव पडला आहे. दोन देशांदरम्यान सीपीईसीची महत्त्वपूर्ण बैठक रद्द केली गेली आहे. चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर अर्थात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर व पाकिस्तान लष्कराचे प्रमुख माजी प्रवक्ते मेजर जनरल असीम बाजवा यांनी ट्वीट केले याबद्दल ते म्हणाले की, सी.पी.ई.सी. ही बैठक आता ईदनंतरच होईल. पहिल्या सीपीईसी जेसीसी -10 ची बैठक 16 जुलै 2021 रोजी होणार होती, मात्र  आता ईदनंतर येणाऱ्या तारखा पाहून ठरविण्यात येईल.

लवकरच या बैठकीसाठी एक नवीन तारीख अंतिम करण्यात येईल असंही ते म्हणाले.

चीनची भूमिका पाहून आता पाकिस्तानही आता आपले तेवर बदलतो आहे. पाकिस्तान सरकार ने या ह्या अपघाताची प्राथमिक चौकशी केली आणि त्यातून असा निष्कर्ष दिला कि, आमच्या पथकाला बसमध्ये स्फोटक सामग्रीचे तुकडे सापडले आहेत त्यामुळे आताहि दहशतवादी घटना असल्याचे नाकारता येत नाही. तुम्हाला हवी ती चौकशी करू शकता”.

परंतु आधी पाकिस्तानचा दृष्टीकोन असा होता कि, हा निव्वळ अपघात आहे मात्र आता त्यांचा सूर  बदलला आहे जेव्हा चीनने असे म्हटले आहे की ते या स्फोटाची चौकशी करण्यासाठी चीन स्वतःची एक टीम पाठवेल.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.