भाजप आणि कॉंग्रेस जिच्यासाठी भांडत आहेत त्या सपना चौधरीचा संपुर्ण बायोडेटा आणला आहे.

गेल्या आठवडाभरापासून देशाच्या राजकीय वर्तुळात एका नावाची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे सपना चौधरी.

तसंही भिडूनो तुम्ही लई हुशारेत. तुम्ही युट्युबवर तीला शोधून तिच्या गाण्याचा पार बुकना पाडला असेल. म्हणजे तुम्हांस्नी एकदंर कळलच असेल ती हरियाणाची प्रसिद्ध अशी डान्सर आहे.

त्यामुळे ज्या गोष्टी माहित हाईत त्या सांगून काय फायदा. खास तुमच्यासाठी आम्ही तिच्या आयुष्यातील वेगळ्या काही गोष्टी शोधल्यात. कारण आपल्या भिडू कार्यकर्त्यांचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे त्याच्या रिकाम्या खोपडीत नवीन माहितीची भर पडली पाहिजे हा आमचा हेतूय.

sapna 11

सपना चौधरी कोण आहे?

सपना चौधरी ही मुळची हरियाणाची. 25 डिसेंबर 1990 हा तिचा जन्मदिवस. सपनाचे वडिल एका खासगी कंपनीत कामाला होते. मात्र सपना 12 वर्षाची असतांना त्याचं अचानक निधन झालं. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सपनावर पडली.

गाणं गात आणि डान्स करत तीनं आपल्या कुटुबांची जबाबदारी उचलली आणि स्वत:ची ओळखही प्राप्त केली.

आपल्या महाराष्ट्रात जशी लावणी प्रसिद्ध आहे. तसं हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये हरियाणी डान्सला महत्व आहे. याच डान्सच्या जिवावर तीनं अनेक तरूणांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

sapna55

सपना चौधरी कधी प्रकाशझोतात आली.

तीन वर्षापूर्वी साॅलेड बाॅडी नावाचं गाणं रिलीज झालं आणि तीनं या गाण्यावर हटके डान्स केला. ती रातोरात प्रकाशझोतात आली.

ते गाणं पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर हरियाणा उत्तरप्रदेश, पंजाब, दिल्ली अशा अनेक राज्यात तीच्या गाण्याचे कार्यक्रम व्हायला लागले. अनेक लोकांनी तीच्यावर अक्षरशा जीव ओवाळून टाकला. एखाद्या सेलिब्रीटीला लाजवेल एवढा मोठा तीचा फॅनफोलोवर्स वाढत होता. त्यातच नवनवीन गाणे आणि पिक्चरच्या ऑफर तीला येत होत्या.

sapna33

 

मात्र, मागच्या वर्षी खास तीच्या शोसाठी तयार केलेल्या एका गाण्यानं तीला प्रगतीच्या शिखरावर पोहचवलं. या

गाण्यामधला तीचा डान्स, तीच्या अदा आणि ठुमक्यानं अख्ख पब्लिक बेहोश होऊ लागलं.

खाली क्लिक करून ते जबराट गाणंही पाहा.

अशा पद्धतीनं सपना दिवसेंदिवस फेमस होत होती. अनेक राज्यात तीचे चाहते झाले होते.

सपना चौधरीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

2016 मध्ये गुरगांवमधील एका कार्यक्रमात गाणं गातांना तीनं दलित समाजाचा अपमान केला. असा आरोप तीच्यावर ठेवण्यात आला होता. तिच्याविरोधात तक्रारही करण्यात आली होती.

तसंच तिला सातत्याने याबाबत कॉल येत होते. अशा

सगळ्यांना कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सपनानं केला होता.

असं तीनं बोलतांना सांगितलं होतं.

बिग बाॅसमध्ये एंन्ट्री.

सपना चौधरी फेमस झाली होती. त्यामुळे बिग बाँसच्या 11 व्या सिझनमध्ये सपनाला ऑफर आली होती. दिवाळीच्या दिवसातच तीनं बिग बॉसमध्ये एंन्ट्री केली. त्यावेळेस ती एका एपीसोडचे 1 लाख रूपये घ्यायची. अशा पद्धतीनं ती मोठी नॅशनल सेलिब्रीटी झाली होती.

बिग बॉसमधून आल्यानंतर ती पुर्ण चेंज झाली होती. त्यामुळे तिचा नवीन लुक काही चाहत्यांना आवडला नव्हता. तर काही जाम खूश झालेले. पण हे चालायचंच.

sapana22

महाराष्ट्रातही सपनाचे फोलोवर्स आहेत-

गणपतीच्या दिवसात परळीतील कार्यक्रमात सपना चौधरी आली होती. तेव्हा तीला पाहण्यासाठी आपल्या लोकांची पार झुंबड उडाली होती. असं भी ऐकलं होतं. की ह्या सपनाच्या चाहत्याला पोलिसांनी झोडपून शांत केलेलं. ते काहीही असेना पण सपनाचे चाहते आपल्या महाराष्ट्रात हाईत.

sapna444

सपनाला पक्षात घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची ओढाताण

उत्तरप्रदेशमधील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज गब्बर यांनी प्रियांका गांधी आणि सपना चौधरीचा फोटो टाकला आणि सपना चौधरीचं काँग्रेस पक्षात स्वागत आहे असं ट्विट केलं. त्यानंत बीजेपी अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासोबतही सपना चौधरीचा फोटो दिसला.

त्यानंतर सपनानं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे की, मी कोणत्याच पक्षात सामिल होँणार नाही. मी कलाकार आहे. मात्र तुम्ही मला राजकीय प्रश्न विचारताय आणि नेता म्हणताय तर तुमच्या तोंडात साखर पडो.

sapna66

मात्र, असं सगळं असलं तरी भाजप आणि काँग्रेस सपनाला पक्षात घेण्यासाठी उत्सुक आहेत. कारण सपना चौधरीचा हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब या भागात फँन फोलोवर्स मोठा आहे. लोक जमवण्याासठी सपना चौधरीचा नक्कीच फायदा होईल. असं दोन्ही पक्षांना सध्या तरी वाटतंय.

पण म्हणतात ना राजकारण हे भौतिकशास्रापेक्षा अवघड असतं. त्यामुळे ‘कल क्या होगा ये किसने जाना’! 

 

1 Comment
  1. vilaram jadhav says

    very nice dance

Leave A Reply

Your email address will not be published.