डोमेक्स फ्लोअर क्लिनरने मुंबईच्या लाईफलाईनला एकप्रकारचं जीवनदानच दिलं.

मुंबईची लोकल ट्रेन मुंबईची लाइफलाइन आहे. जगभरात एकट्या मुंबईमध्ये ट्रेननं प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. कोरोना येण्यापूर्वी ७५ लाख प्रवाशांच्या सेवेसाठी दररोज २ हजार ३०० लोकल सोडल्या जायच्या. मुंबईतला प्रत्येक वर्ग, मग त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार वर्ग, व्यापारी, रोजंदारी कामगार, कारकून, बांधकाम कामगार, मुंबईच्या डबेवाल्यांपासून ते गृहिणींपर्यत सर्वच जण या लोकलवर अवलंबून होते. पण कोरोनाच्या उद्रेकानं ही लाईफलाईन थांबली होती.

लोकलमधून प्रवास करणाऱ्या या सर्व लोकांच्या आरोग्याची चिंता वाढली होती. याचवेळी डोमेक्सने एंट्री मारली. प्रभावी निर्जंतुकीकरण प्रदान करुन डोमेक्सने मुंबईच्या लाईफलाईनला एकप्रकारचं जीवनदानच दिलं. 

खरं कसं ? 

एका अभ्यासानुसार डोमेक्स जंतुनाशक फ्लोअर क्लीनर करोना व्हायरस नष्ट करतो हे सिद्ध झालं. या डोमेक्समध्ये ०.५% सोडियम हायपोक्लोराइट आहे, जे केवळ १० सेकंदातच करोना व्हायरस नष्ट करत असल्याचं सिद्ध झालं. यासाठी अमेरिकेतील मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत याच्या स्वतंत्र चाचण्या करण्यात आल्या.

जगभरातल्या हेल्थ रिलेटेड सर्व कंपन्यांनी कोरोनापासून फ्लोअर निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराइटची शिफारस केली होती.

झालं तर मग, मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना डोमेक्स कोरोनाविरोधातील लढाईत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (एमसीजीएम) समर्थनार्थ उभं राहिलं आहे.

पण हे डोमेक्स आहे कुठलं? याचा मालक कोण? भारतातलंच आहे का? असे शभंरशे साठ प्रश्न तुम्हाला पडले असतील. मग भिडूने याचा शोध सुरु केला, तर सापडला डोमेक्सचा मालक.

सध्या तरी हिंदुस्थान युनिलिव्हर याचा मालक आहे. पण या आधीचा मालक होता
विल्फ्रीड ऑगस्टीन हँडली. आणि पेशाने तो होता, दंतचिकित्सिक म्हणजे डेंटिस्ट.. आणि डोमेक्सचं सुरुवातीचं नाव डोमेस्टोस होतं बरं का..

तर या डोमेस्टोसचे पहिलं उत्पादन १९२९ च्या सुमारास विल्फ्रीड ऑगस्टीन हँडली यांनी केले होते. इंग्लंडच्या ईशान्येकडच्या टायने येथील न्यू कॅसलच्या भागात हे उत्पादन सुरु करण्यात आले होते. हे किचन क्लिनर होत जे सोडियम हायपोक्लोराइट नावाच्या एका रसायनापासून तयार करण्यात आलं होतं.

खरं तर हे एक केमिकल ब्लिचच होतं. ज्याचा वापर टॉयलेट क्लीन करण्यासाठी केला जायचा. पण या डेंटिस्ट महाशयांनी ते कॉन्सन्ट्रेटेड रसायन थोडं डायल्युट केलं. आणि विकायला सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्यात विल्फ्रीडने हे उत्पादन घरोघरी, दारोदारी जाऊन विकलं.

पण खरी कंपनी वाढवली लिव्हर ब्रदर्सने. त्याच झालं असं की, १९६१ मध्ये डोमेस्टॉस ही कंपनी लीव्हर ब्रदर्सने विकत घेतली. त्यानंतर कंपनीने मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली. 

१९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० च्या सुरुवातीला, डोमेस्टॉसच्या जाहिराती खूप फेमस झाल्या. या जाहिरातींमध्ये तेव्हाच फेमस कॅरेक्टर बिग बॅड जॉनच एक दृश्य घेतलं होत. ज्यात डोमेस्टॉसची बॉटल काऊबॉय स्टाईल मध्ये अक्ख्या बाथरुमभर फिरते. आणि सर्व जंतूंचा नाश करते. ही बाटली “बिग बॅड डोम” च्या नावाखाली फेमस झाली.

जाहिरात सीजीआय वापरुन तयार केली गेली होती. या जाहिरातीत “Kills all known germs. Dead.” तर त्या पूर्वीची जाहिरातीत “Domestos kills 99% of all household germs.” हे स्लोगन वापरण्यात आले.

या डोमेस्टॉसची अनेक देशात अनेक नाव आहेत. 

हे प्रॉडक्ट जगभरातल्या ३५ देशांमध्ये विकलं जात. भारत, बांग्लादेश, फिलिपाईन आणि श्रीलंकेत डोमेस्टॉसला ‘डोमेक्स’ नावाने ओळखलं जात. या देशात ‘वन स्टेप सोल्युशन’ म्हणून हे डोमेक्स फेमस आहे. यात फ्लोअर क्लिनर, किचन क्लिनर, बाथरुम क्लीनर अशी वेगवेगळी व्हरायटी आहे.

जपान मध्ये याला ‘डोमेसुटो’ म्हणतात. आणि तिकडे जास्त चलती टॉयलेट क्लिनरची आहे. नेदरलँड मध्ये डोमेस्टॉस ‘ग्लोरिक्स’ या नावाने विकलं जातं. तर व्हिएतनाम, अर्जेंटिना, ब्राझील या देशात ‘व्हिम’ आणि ‘क्लिनेक्स’ हे नाव आहे. रशिया, ग्रीस, बल्गेरिया, कझाकिस्तान या देशात ‘ग्लोरिक्स’ आणि ‘क्लिनेक्स’ नावाने डोमेस्टॉसची ओळख आहे.

अशा या डोमेस्टॉस म्हणजेच आपल्या डोमेक्सने लाखो मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक जागांवर स्वच्छता आणि सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न केला. आणि मुंबईला पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत केली आहे. डोमेक्सवर वर्षानुवर्षे ग्राहकांचा विश्वास आहे आणि या ब्रँडचे जंतुनाशक आपल्या घरातल्या फरशीवरचे कोरोनाचे किटाणू मारण्यासाठी योग्य आहेत हे सिद्ध झालंय.

आता कोरोनाचे किटाणू जरी मरत असले तरी आपण लक्षात ठेवले पाहिजे, की कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही.

त्यामुळं घरीच रहा, सुरक्षित रहा..

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.