फडणवीसांना पाहताच वाजपेयी म्हणाले, “व्वा व्वा ! क्या स्मार्ट मॉडेल है ये…” 

देवेंद्र फडणवीस यांनी मॉडेल म्हणून काम केल आहे हा किस्सा आपल्या सर्वांना आत्तापर्यन्तच माहितच झाला असेल. माहित नसणाऱ्यांसाठी थोडक्यात सांगायच झालं तर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यावेळेस आमदार झाले तेव्हा त्यांचे पोश्टर एका कपड्यांच्या जाहिरातीमध्ये संपुर्ण नागपूर शहरात झळकले होते. मॉडेल आमदार म्हणून वर्तमान पत्रांचे रकाने च्या रकाने भरले होते. 

बऱ्यापैकी देवेंद्र फडणवीसांचे किस्से माहित असणाऱ्यांना हा किस्सा नक्कीच माहित आहे पण त्यानंतर काय झालं हे सांगितल आहे सुषमा नवलखे यांनी. 

सुषमा नवलखे यांनी “देवेंद्र फडणवीस” या पुस्तकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अनोख्या शैलीत त्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. याच पुस्तकातील  हा किस्सा त्या सांगतात. 

त्या म्हणतात, “देवेंद्रजी दिसायला चांगले आहेत. जुन्या हिंदी चित्रपटातील संसारी पण रोमॅटिक हिरोसारखे ते दिसतात. तसेच त्यांना मॉडेलिंग करणायलाही आवडते.”

या संदर्भातला किस्सा ते देवेंद्र फडणवीस यांचे जुने मित्र शैलश जोगळेर यांचा संदर्भ देवून सांगतात. त्या म्हणतात. साधारण २००४ चा हा प्रसंग आहे. तेव्हा नागपुरमधील चौकांमध्ये जाहिरातींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातील मॉडेलचा चेहरा पाहिल्यावर सुरवातील प्रत्येकजण बुचकळ्यात पडला होता. प्रत्येकजण पोश्टर पाहिल्यानंतर म्हणायचा. 

अरे हा तर आपला देवेंद्रभाऊ… 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकीची पहिली टर्म सुरू होती. नागपुरमधील ख्यातनाम फोटोग्राफर विवेक रानडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची काही छायाचित्र शुट केली होती. नागपुरमधील रेडिमेड कपड्यांच्या एका फर्मच्या मालकांना ती अतिशय आवडली. त्यांनी ती आपल्या जाहिरातीत वापरण्याची परवानगी मागितली आणि संपुर्ण नागपुर शहरात कपड्यांच्या जाहिरातीचे फलक झळकू लागले. 

त्याच वेळी केंद्रामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ चे सरकार होते. वाजपेयीं याचे स्नेही नागपूरचे अॅड. अप्पासाहेब घटाटे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांची किर्ती थेट वाजपेयींच्या कानावर गेली. 

वाजपेयींना देवेंद्रे फडणवीसांची माहिती मिळताच त्यांनी या मॉडेल आमदारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. थेट पंतप्रधान अटल बिहारींचे निमंत्रण मिळताच घटाटे. शैलेश जोगळेकर आणि देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला दिल्लीला गेले. 

तेथे देवेंद्र फडणवीस यांना पाहिल्यानंतर वाजपेयी म्हणाले,

“व्वा व्वा ! क्या स्मार्ट मॉडेल हैं ये…”

अशी आठवण जोगळेकर यांनी सुषमा नवलखे यांना सांगितली आहे. 

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.