ऑफिसच्या कॅन्टिनमधल्या गप्पा मनावर घेतल्या आणि कंप्युटरची टॉपची कंपनी उभारली

कँटीन मग ते ऑफिसचं असू दे की कॉलेजचं टाईमपाससाठी आपल्या सगळ्यांची पहिली चॉईस. आज तुमच्यापैकी कित्येक जणांना कॉलेज पेक्षा कॅन्टीनच्याच मेमरी लक्षात असतील. अश्याच कंपनीच्या कॅन्टीनमध्ये शिव नाडर आणि त्यांचे मित्र दुपारच्या जेवणानंतर बसले होते.

दिल्ली क्लाथ मिल्सच्या कॅंटीनमध्ये बसलेले ते सगळे एकाच वयाचे होते.

रोजचाच ९-५ टायमिंग, आठवड्याभर बघायची रविवारची वाट अशा जनरल गप्पा झाल्यानंतर  मग गप्पा आल्या ते काम करत असलेल्या क्षेत्रावर . इंजिनअर असलेल्या चांगली नोकरी होती, ज्याने वेळेवर पगार दिला होता, परंतु त्यांचं बोलणं आता वेगळ्याच दिशेनं चाललं होतं.

दिल्ली क्लाथ मिल्सच्या कॅल्कुलेटर डिव्हिजनमध्ये समस्यांवर बोलता बोलता या तरुणांनी डायरेक्ट पर्सनल कंप्युटर बनवायचा निर्णय घेतला होता. 

डीसीएमच्या कॅल्क्युलेटर विभागात काम करताना त्यांनी तांत्रिक कौशल्य संपादन केले होते, परंतु सर्व स्टार्ट-अप्सप्रमाणे, निधी उभारणे ही एक मोठी समस्या होती.मात्र शिव नाडर यांची त्यांच्या ड्रीम कंपनीबद्दलची आवड आणि त्याच्या सहकाऱ्यांचा फुल सपोर्ट यामुळे हे काम खूप सोपे झाले.

त्यांनी Microcomp Limited नावाची कंपनी स्थापन केली – ज्याद्वारे टेलिडिजिटल कॅल्क्युलेटर विकण्याची योजना होती.  

पुढे मग भारतातच कंप्युटर बनवण्याचे ठरवलेल्या नाडर यांना  या पाऊलामुळे  खूप मदत झाली. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेश सरकारचाही पाठिंबा मिळाला होता. नाडर आणि त्याच्या साथीदारांनी २० लाख रुपये उभे केले आणि येथूनच एचसीएलचा म्हणजे हिंदुस्थान कंप्युटर लिमिटेडचा जन्म झाला.

सरकारी धोरणांतील बदलतील संधी ओळखण्याच्या नादार यांच्या कौशल्यामुळे त्यांना आपली कंपनी वाढवण्यात खूप फायदा झाला.

१९७७ मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री झाले तेव्हा काही भारतीय उद्योगपती आनंदात होते. पण कोका-कोला आणि आयबीएम भारत सोडून गेल्याने परदेशी उद्योगपती खूश नव्हते. आयबीएमच्या जाण्याने बाजारपेठेत मोठी पोकळी निर्माण झाली आणि याच पोकळीत शिव नाडर यांनी संधी ओळखली. अवघ्या दोन वर्षात त्यांनी १६ बिट प्रोसेसर एचसीएलनं बनवला.

१९८४ मध्ये राजीव गांधी यांच्या काळात भारत सरकारने एक नवीन धोरण जाहीर केले जे संपूर्ण संगणक उद्योगाचे नशीब बदलणार होते. 

सरकारने संगणक बाजार उघडला आणि तंत्रज्ञान आयात करण्यास परवानगी दिली. नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांसह, HCL ला स्वतःचा पर्सनल कंप्युटर लॉन्च करण्याची संधी मिळाली. पर्सनल कॉम्प्युटरची मागणी भारतीय बाजारपेठेत हळूहळू पण निश्चितपणे वाढत होती आणि त्याचबरोबर HCL नं पण ग्रोथ पकडली होती.

आज HCL भारतातील ५९९बिलियन रुपयांची नेटवर्थ असलेली HCL आज भारतातली कॅम्पुटर क्षेत्रातील टॉपची कंपनी आहे. तर शिव नाडर सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक. त्यामुळं नेक्स्ट टाइम कॅन्टीनमध्ये बसल्यावर बघा काय कामाचं भेटतंय का?

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.