पराक्रम गाजवणारी INS विक्रांत भंगारात गेली पण स्टोरी संपली नाही..

“भारतीय नौदलाची विमाने रात्रंदिवस आमच्यावर मारा करत होती. आम्हाला धड पाळायचं कळत नव्हतं”

कॉक्स बाजार, चित्तगाँव आणि खुलना विक्रांतच्या सी हॉक्स विमानांनी तेव्हाच्या ईस्ट पाकिस्तानमधली ही शहरं झोडपून काढली होती. या सी हॉक्सच्या हवाई हल्ल्याने बेजार झालेल्या पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी नौदल कमांडरने ही टिपनी केली होती.

सध्या किरीट सोमैय्या यांच्यावर या INS विक्रांतच्या संवर्धनसाठी निधी जमा करून त्यात भ्रष्टाचार केला म्हणून आरोप होत आहे. त्यामुळे भारताची ही पहिली युद्धनौका INS विक्रांत सध्या न्यूजमध्ये आहे. पण या आरोपांमुळे चर्चेत येण्याच्या आधी विक्रांत तिने देलेल्या सेवेसाठी भारताच्या इतिहासात अजरामर झाली  आहे.

त्यामुळं बघूया आधी या युद्धनौकेचा इतिहास.

तर ही युद्धनौका आपण ब्रिटिशांकडून  विकत घेतली होती. ब्रिटिशांकडे असताना या युद्धनौकेचं नाव होतं हरक्यूलिसदुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल नेव्हीसाठी बांधण्यात आलेल्या सहा मॅजेस्टिक क्लास विमानवाहू (मॅजेस्टिक, टेरिबल, मॅग्निफिसेंट, पॉवरफुल, हरक्यूलिस आणि लेव्हियाथन) मालिकेतील हरक्यूलिस हे पाचवे जहाज होते.

दुसऱ्या महायुद्धातधुमाकूळ घालणाऱ्या जर्मन आणि जपानी नौदलाला आव्हान देण्याचा त्यांचा हेतू होता. पण सीन असा झाला की त्यापैकी एकाही जहाजाला रॉयल नेव्हीमध्ये सेवा देता आली नाही. कारण ही  जहाजं कमिशन होईपर्यंत युद्ध संपलं होतं.

त्यामुळं सर्व सहा जहाजांचे काम थांबले. मग जहाजांपैकी त्यातली प्रत्येकी दोन कॅनेडियन आणि ऑस्ट्रेलियन नौदलाने विकत घेतली.

आणि पाचवे, हरक्यूलिस, भारतीय नौदलाने विकत घेतलं आणि त्याचे नाव विक्रांत असं ठेवण्यात आलं.

तर सहावं लेव्हियाथन भंगारात काढण्यात आलं.

मे १९४६ मध्ये जहाजावरील काम थांबवण्यात आलं होतं तेव्हा जवळजवळ ७५% बांधकाम पूर्ण झालं होतं.  मग आयर्लंडमधील बेलफास्ट, हार्लंड आणि वुल्फ यार्ड येथे चार वर्षांची दुरुस्ती करण्यात आली. 

आणि मग ०४ मार्च १९६१ रोजी बेलफास्ट येथे यूकेमधील तत्कालीन भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांचे हस्ते INS विक्रांतला भारतीय नौदलात औपचारिकपणे  नियुक्त करण्यात आलं.

कॅप्टन प्रीतम सिंग हे विक्रांतचे पहिले कमांडिंग ऑफिसर होते. या विमाहनवाहक नौकेच्या  सुरवातीच्या चाचण्या  यूकेच्या आसपासच्या पाण्यातच घेतल्या गेल्या.  १८ मे १९६१ रोजी नौकेवर पहिल्या जेट विमानाचे लँडिंग  करण्यातआलं . ही कामगिरी करण्याचा मान लेफ्टनंट (नंतर अॅडमिरल आणि नौदल प्रमुख) आर एच ताहिलियानी यांना मिळाला.

पुढे ३ नोव्हेंबर १९६१ रोजी मुंबई इथं भारतीय नौदल ताफ्यात जेव्हा विक्रांत युद्धनौकेला औपचारिकपणे सामीलकरण्यात आला तेव्हा स्वागतासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तिथं जातीने उपस्थित होते.

१९७१ च्या भारत-पाक युद्धापर्यंत विक्रांतवरनं क्वचितच एकाधी गोळी झाडली गेली असेल. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान आसाममधील एअरफील्डवरून ऑपरेट होण्यासाठी विक्रांत वरील सीहॉक जेट विमान उत्तरेकडे पाठवण्यात येण्याची चर्चा होती. मात्र तास निर्णय झाला नाही.

१९६५ च्या भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान विक्रांतची डॉकमध्ये डागडुगुजी चालली होती. युद्धात विक्रांत दिसत नाही हे बघून पाकिस्तानी नौदलाने नौका बुडवल्याच्या अफवाही पसरवाल्या होत्या.

पुढे मग १९७१ च्या युद्धात याचा विक्रांतीने पाकिस्तानची दाणादाण उडवली होती. बांगलादेशला स्वतंत्र करण्याच्या या युद्धात त्याच्या बॉयलरला तडे गेले असतानाही युद्धनौकेने निर्णायक भूमिका बजावली होती.

ईस्ट पाकिस्तानची बंगालच्या उपसागरवरील सगळी बंदरं विक्रांतमधून होणाऱ्या माऱ्यापुढं होरपळून निघाली होती. एकवेळ तर विक्रांतच्या बॉईलरला तडे गेले होते. मात्र तरीही युद्धात नौकेला पुढे नेण्याची रिस्क घेण्यात आली. आणि विक्रांतने आपले काम बरोबर पार पाडले.

बांगलादेशच्या मुक्तीमध्ये या जहाजाच्या या कामगिरीला दोन महावीर चक्र आणि बारा वीर चक्र मिळाले होते.

युद्धातल्या कामगिरीनंतर मद्रासला परतल्यावर विक्रांतचे जल्लोषात स्वागत झाले. तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील नागरी प्रशासनाने, ११०० च्या संपूर्ण क्रूसाठी जेट्टीवर, केळीच्या पानांवर जेवणाचे विशेष आयोजन केले होते.

जेव्हा हे जहाज एकदा बंदर अब्बास इथं गेलं होतं तेव्हा इराणच्या शाहने आपल्या अधिकाऱ्यांना खास स्वागतासाठी पाठवलं होतं. पश्चिम आशियामध्ये, जिथे लोकांनी पाहिलेली एकमेव विमानवाहू युद्धनौका ही अमेरिकेची होती तिथं आशियातला देश अशी नौका आणू शकतो हे बघून आश्यर्य वाटलं होतं.

भारतीय नौदलातील ३६ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ३१ जानेवारी १९९७ रोजी विक्रांतला पदमुक्त करण्यात आले. तिने 499,066 नॉटिकलअंतर प्रवास केला होता जे जगाला १५ वेळा वेढा घालण्याच्या बरोबरीचे आहे.

मात्र सेवेतून निवृत्त झाल्यांनतर युद्धनौका भंगारात काढल्या जातात. मात्र विक्रांतची कामगिरी पाहता तिला भंगारात नं काढता तिचे म्युझियम बनवण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यासाठी महाराष्ट्रही पुढं आला होता. १९९८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे तत्कालीन सेना-भाजप सरकारने युद्धनौकेच्या दुरुस्तीसाठी ६.५ कोटी रुपये मंजूर केले होते.

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार १९९९ मध्ये एनडीएच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हे जहाज महाराष्ट्राला हुतात्मा संग्रहालयात रुपांतरित करण्यासाठी भेट दिलं होतं. तसेच पर्मनंट सोल्युशन काढेपर्यंत तिथं छोटेखानं म्युझियम पण बनवण्यात आलं होतं.

आपल्या न्यायालयीन प्रतिज्ञापत्रात, नौदलाने दावा केला होता की त्यांनी INS विक्रांतच्या देखभालीसाठी २२ कोटी रुपये खर्च केले होते आणि एक संग्रहालय उभारलं होतं. २००१ ते मध्ये लोकांसाठी खुलं  करण्यात आलं होत. तथापि,२०१२मध्ये जहाज असुरक्षित झाल्याचे सांगून ते संग्रहालय नागरिकांसाठी बंद करण्यात आलं होतं.

याच काळात महाराष्ट्र राज्य सरकारने पण युद्धनौकेच्या संवर्धनासाठी काही अयशस्वी पावलं उचलली होती. महाराष्ट्र सरकारने या जहाजाचे कन्व्हेन्शन सेंटर, रेस्टॉरंट आणि कदाचित मॉल असलेल्या संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी एका खाजगी संस्थेला नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला होता. यासाठी अनेक बोली आणल्या होत्या मात्र त्यापैकी एकही पूर्णत्वास गेली नाही.

दिवसेंदिवस जहाज सवांदरणासाठीचा खरंच वाढत होता आणि त्यावर कोणता निर्णयही घेतला जात नव्हता. अखेर २०१३ मध्ये, जहाज भंगार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२०१४ मध्ये ऑनलाइन लिलावात हे जहाज शिप ब्रेकरला 60 कोटी रुपयांना विकले गेले. 

विक्रीला आव्हान दिले जात असताना, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये जहाज भंगारात टाकण्यात आले.

पुढे हे भंगार बजाजने गाडी बनवण्यासाठी घेतले. २०१६ मध्ये बजाज कंपनीने ‘In all due honor of INS Vikrant : स्पोर्ट्स बाईकV15 ‘ ही भेटीला आणली. ही गाडी विक्रांतच्याच मेटलपासून बनलेली होती. एक महाकाय युद्ध नौका ते युद्ध स्मारक ते दुचाकी गाडी असा विक्रांतचा प्रवास झाला.

आणि याच दरम्यान झाली किरीट सोमय्यांची एंट्री.

जहाज जेव्हा भंगारात काढलं जात होतं , तेव्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. ऐतिहासिक युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या संवर्धनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तेव्हा सोमय्या म्हणाले होते की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार बंद केलेल्या युद्धनौकेचा खासगी कंपन्यांच्या हवाली करून आर्थिक लाभ मिळवत आहे.

“जेव्हा २००४ मध्ये काँग्रेस -राष्ट्रवादी सरकार पुन्हा सत्तेवर आले, तेव्हा युद्धनौकेचे व्यापारीकरण करण्याचे वारंवार प्रयत्न केले गेले. माजी मुख्यमंत्री (दिवंगत) विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांनी मंत्रालयाला अनेक वेळा पत्र लिहिले, परंतु विद्यमान ए.के. अँटोनींसह संरक्षण मंत्र्यांनी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मार्गाला कधीही पाठिंबा दिला नाही. हे मॉडेल काही नसून २०० कोटी रुपयांचा कमिशन घोटाळा आहे,”

असं  सोमय्या २०१३ मध्ये म्हणाले होते.

लोकांच्या भावना या जहाजाच्या संवर्ध करण्याचा बाजूने आहेत. त्यामुळे जहाजाचे व्यापारीकरण किंवा तिला भंगारात नं करता तिचे स्मारक म्हणून जातं करण्यात यावे अशी मागणी त्यावेळी सोमैय्या यांनी केली होती. आणि त्यासाठी मी निधी जमा करून देतो असं म्हणत सोमय्यांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात केली.

त्यासाठी किरीट सोमय्यांनी ५७ करोड जमा केल्याचं सांगण्यात येतं.

तसेच संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार हा जमा केलेला पैसा राजभवनात जमा करण्यात आलेला नाहीये. आणि सॊमय्यानी यात भ्रष्टाचार केला असं म्हटलं गेलं.

त्यामुळे आता याच प्रकरणात FIR दाखल झाला आहे. लष्करातील माजी सैनिक असलेल्या बबन भोसले यांच्या तक्रारीच्या आधारे, ट्रॉम्बे पोलीस स्टेशनने सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्यावर भारतीय दंड संहितेचा कलम ४२० (मालमत्तेच्या वितरणासह फसवणूक आणि अप्रामाणिकपणा) ४०६ (गुन्हेगारी विश्वासभंगाची शिक्षा) आणि  34 (सामान्य हेतू). कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. 

आणि किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीनही नाकारण्यात आला आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.